agriculture news in marathi, Middle man on hunger strike in Latur APMC | Agrowon

लातूर :थकित पैशांसाठी अडत्यांचे उपोषण
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 मे 2019

लातूर : लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजर समितीच्या अडत बाजारातील व्यापारी व अडत्यांतील संघर्ष मिटण्याची स्थिती नाही. वारंवार आंदोलन केले जात आहेत. अडत्यांना एका व्यापाऱ्यांकडून पेमेंट मिळत नसल्याने २६ अडत्यांनी बाजारा समितीच्या आवारात उपोषण सुरू केले आहे.

लातूर : लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजर समितीच्या अडत बाजारातील व्यापारी व अडत्यांतील संघर्ष मिटण्याची स्थिती नाही. वारंवार आंदोलन केले जात आहेत. अडत्यांना एका व्यापाऱ्यांकडून पेमेंट मिळत नसल्याने २६ अडत्यांनी बाजारा समितीच्या आवारात उपोषण सुरू केले आहे.

ईनाममधील व्यवहारातून झालेले हे एक कोटीवरचे पेमेंट थकले आहे. गेल्या वर्षीच्या अखेरीस या अडत बाजारातील तीन व्यापाऱ्यांनी अडत्यांकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीन व हरभऱ्याची खरेदी केली होती. हे सर्व व्यवहार ईनाममधून करण्यात आले होते. पण तीन मोठ्या व्यापाऱ्यांनी अडत्यांना पेमेंटच केले नव्हते. त्यामुळे अडत्यांनी आंदोलन सुरू केले. 

अडत बाजार बंद पाडला होता. यात बाजार समितीने याची दखल घेत आतापर्यंत दोन व्यापाऱ्यांचे पेमेंट कसे तरी करून घेतले. काहींना याचे धनादेशही देण्यात आले. पण गोवर्धन पल्लोड या व्यापाऱ्याकडे मात्र २६ अडत्यांचे कोटीवर पेमेंट राहिले आहे. त्यामुळे अडते आर्थिक अडचणीत सापडले आहेत. हा व्यापारी शहर सोडून गेला. त्यामुळे अडत व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून वारंवार मागणी करून बाजार समिती याकडे लक्ष देत नाही. म्हणून हे उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे बाजारात शुकशुकाटच राहिला.

सोमवारी (ता.२०) सकाळी अडत बाजारात हालकी वाजवून फेरी काढण्यात आली. त्यानंतर हे उपोषण सुरू करण्यात आले. बाजार समितीने या व्यापाऱ्यावर, त्याच्या जामिनदारावर कारवाई करावी, अशी मागणी या अडत्यांची आहे.

या व्यवहारात गजानन काळे, मदनलाल बंग, विठ्ठलराव वीर, गणपतराव जाधव, पांडूरंग बेडदे, ऋषिकेश चव्हाण, श्रीकिशन चव्हाण, यशवंत बडे, श्रीनिवास तापडे, प्रेमचंद काबरा, नामदेव शिवणे, रामगोपाल बजाज, शेषेराव रुकमे, सुनील जगताप, शांतेश्वर मुक्ता, नरसिंग शिंदे, शरद शिंदे, राजेंद्र आलमले, उद्धव ओनामे, विजय गुणाले या अडत्यांचे पेमेंट थकले आहे. 

इतर बातम्या
मॉन्सूनने अलिबाग, मालेगावपर्यंतचा भाग...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी...
‘म्हैसाळ’पासून जतचा पूर्व भाग वंचितसांगली : जत तालुक्याच्या पूर्व भागातील ६४ गावाला...
विकासकामांचे सूक्ष्म नियोजन करा :...परभणी : जिल्ह्यतील विविध विकास कामांचे सूक्ष्म...
पूर्व विदर्भात दमदार पाऊसनागपूर : पश्चिम आणि दक्षिणेकडून मॉन्सून येणे...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...
ऊस बिलावरून शेतकरी आक्रमकनाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना...
येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यात...नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) पावसाला सुरवात...
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे...देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री...
कोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पाऊसकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली...कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार...
अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी...अकोला  ः आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
नगर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात...नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने...
मराठवाड्यातील ५८ तालुक्यांत पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यामध्ये रविवारी (...
शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना...नगर   ः विमा योजनेत घोटाळा झाला...
पीकविम्यातील हलगर्जीपणा; कृषी...पुणे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेची कामे करताना...
मॉन्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यतापुणे : राज्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने आगमन...
औरंगाबाद, कोपरगाव, येवल्यात धोधो पाऊसपुणे : कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील...
`गुणनियंत्रण`चा चेंडू आता ‘एसीबी’च्या...पुणे : राज्याच्या कृषी विभागातील गुणनियंत्रण...
फिरत्या पशुचिकित्सालयामार्फत पशूंवर...बुलडाणा  : महाराष्ट्र विधानसभेत काल सादर...