खानदेशात मका, ज्वारीवर लष्करी अळी

दीड एकर मका लष्करी अळीमुळे काढावी लागली. त्यात मोठे नुकसान झाले. पुढे मका लागवड करायची नाही, असा निर्णय घेतला आहे. कारण या अळीवर उपाय करणे कठीण आहे. - दिलीप पाटील, शेतकरी, चोपडा
खानदेशात मका, ज्वारीवर लष्करी अळी
खानदेशात मका, ज्वारीवर लष्करी अळी

जळगाव : खानदेशात मका, आगाप ज्वारीवर लष्करी अळीचा मोठा प्रकोप झाल्याने ही पिके काढण्याची वेळ अनेक शेतकऱ्यांवर आली आहे. या अळीच्या भीतीने मका व ज्वारीची पेरणी शेतकरी टाळत असून, यामुळे पुढे मका व ज्वारीचा चारा व उत्पादन कमी असेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.  

खानदेशात ज्वारी व मक्‍याची रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात पेरणी शेतकरी करतात. डिसेंबरमध्ये पूर्वहंगामी कापसाचे पीक काढून त्यावर मका लागवड शहादा, तळोदा, चोपडा, जळगाव, यावल भागात केली जाते. चारा व धान्याच्या उत्पादनासाठी कमी पाण्यात येणाऱ्या संकरित ज्वारीलाही पसंती दिली जाते. खानदेशात ज्वारीची जवळपास एक लाख व मक्‍याचीदेखील जवळपास एक ते सव्वा लाख हेक्‍टरवर लागवड केली जाते. परंतु लष्करी अळीमुळे ज्वारीसह मक्‍याचे आतोनात नुकसान झाले असून, अक्षरशः पीक काढावे लागले आहे. नुकसानग्रस्त पिकावर जळगाव, धरणगाव, चोपडा, यावल, शहादा भागात शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर फिरविले आहेत.

लागवडीखालील क्षेत्र नुकसानीमुळे रिकामे होत आहे. नवीन लागवड किंवा पेरणी होत नसल्याची स्थिती आहे. यामुळे मक्‍यासह ज्वारीचे क्षेत्र ६० ते ६५ टक्‍क्‍यांनी खानदेशात घटेल, अशी स्थिती आहे. कृषी विभागाकडून या संदर्भात कोणतीही कार्यवाही होत नसल्याची स्थिती आहे. काय उपाय करावेत, याचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना हवे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com