सांगली जिल्ह्यात धग वाढतेय

कोल्हापुरात हिंसक वळण
कोल्हापुरात हिंसक वळण

सांगली : जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी ही दूध दराच्या मागणीसाठीचे आंदोलन सुरू होते. कवठेमहांकाळ तालुक्‍यातील चार चिलिंग सेंटरवर संकलन झालेले दूध किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ओतले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन लगेच सोडण्यात आले. जिल्ह्यात दूध दराबाबत आंदोलनाची धग वाढू लागली आहे.

जिल्ह्यात बुधवारी (ता. १८) दूध संकलन करण्यासाठी चिलिंग सेंटर मालक फिरू लागले आहेत. जिल्ह्यात सकाळच्या टप्प्यात १ लाख ३८ हजार ९३८ लिटर इतके दूध संकलन झाले. तर मंगळवारी (ता. १७) दिवसभरात ६७ हजार ५०० लिटर दुधाचे संकलन झाले असल्याची माहिती शासकीय दूध संघाच्या सूत्रांनी दिली. जिल्ह्यात दूध संकलन होऊ लागले आहे. याची खबर शेतकरी संघटना आणि किसान सभेच्या कार्यकर्त्यांपर्यत पोचू लागल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्ते गनिमी काव्याचा वापर करून संकलन थांबवू लागले आहेत.

कवठेमहांकाळ तालुक्‍यातील चिलिंग सेंटरवरील जमा झालेले दुधाचे कॅन आणि दूध घेऊन जाणाऱ्या गाड्या अडविण्यात आल्या. गाड्यातून कॅन काढून दूध रस्त्यावर ओतले. तर जिल्ह्यातील काही ठिकाणी दुधाचे वाटप करण्यात आले. आरग येथील दूध संकलन केंद्रात दूध आणू नका, असे निरोप शेतकऱ्यांपर्यंत पोचू लागले आहेत. वाळवा तालुक्‍यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गाय दुधाला प्रति लिटर पाचर रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा, या मागणीसाठी मंगळवारी (ता. १७) मोर्चा काढण्यात आला. तर तासगाव तालुक्‍यात तालुक्‍यातून दूध संकलन पूर्णपणे बंद होते. मंगळवारी (ता. १७) सिद्धेश्‍वर चौकात कार्यकर्त्यांनी दुग्धविकास राज्यमंत्री जानकर यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करून घोषणा दिल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com