दूध दरप्रश्‍नी लाखगंगात आंदोलन सुरूच

दूध दरप्रश्‍नी लाखगंगात आंदोलन सुरूच
दूध दरप्रश्‍नी लाखगंगात आंदोलन सुरूच

लाखगंगा, जि. औरंगाबाद : ग्रामदैवत मारुतीराया समोर भजन, मोफत दूध वाटपासह विकलेल्या दुधाची पावती न घेण्याची भूमिका लाखगंगा येथील ग्रामस्थांनी सोमवरीही (ता. ७) कायम ठेवली. गेल्या पाच दिवसांपासून येथे मोफत दूध वाटप आंदोलन सुरू आहे.  वैजापूर तालुक्यातील लाखगंगा येथील ग्रामसभेतून खर्चाला परवडणारे दर मिळत नसल्याने फुकट दूध वाटप व संकलन केंद्रांना मोफत घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ३ मेपर्यंत शासनाने दूध दरविषयी कोणतीही भूमिका न घेतल्याने अखेर लाखगंगा येथे मोफत दूध वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. लाखगंगाच्या पंचक्रोशीतील गावांनीही यामध्ये सहभाग नोंदविण्याची भूमिका घेतली. तसे ठराव ग्रामसभेत घेण्यात आले. आंदोलनाचा धसका पहिल्याच दिवशी घेऊन प्रशासन गावात दाखल झाले. प्रशासनासह मुख्यमंत्र्यांनी दर कमी देणाऱ्यांवर कारवाईची भाषा केली. परंतु लाखगंगा येथील दूध उत्पादक जोवर शासनाने जाहीर केलेला २७ रुपये प्रतिलिटरचा दर दिला जात नाही, तोवर विक्री केलेल्या दुधाच्या पावत्या वा पैसे न स्वीकारण्यावर ठाम आहेत. सोमवारीही दररोजप्रमाणे सकाळी ग्रामदैवत मारुती मंदिरासमोर भजन, त्यानंतर मोफत दूध वाटप व त्यानंतर वैजापूर येथील तहसील कार्यालयावर करण्यात आलेल्या मोफत दूध वाटपात लाखगंगा येथील ग्रामस्थ सहभागी झाले होते. शासनाने सकारात्मक हस्तक्षेप करून न्यायाची भूमिका न घेतल्यास ९ मेपर्यंत शांतीच्या मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्याची घोषण केली गेली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com