दूध आंदोलन तापले, बहुतांश जिल्ह्यात संकलन ठप्प

दूध आंदोलन तापले, बहुतांश जिल्ह्यात संकलन ठप्प
दूध आंदोलन तापले, बहुतांश जिल्ह्यात संकलन ठप्प

पुणे : शेतकऱ्यांना प्रति लिटर थेट पाच रुपये अनुदान देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध बंद आंदोलनाला पहिल्याच दिवशी दूध उत्पादक जिल्ह्यात जोरदार प्रतिसाद लाभला. शेतकऱ्यांसह दूध खरेदी केंद्र, संघांनीही संकलन न केल्याने आंदोलनाची धार वाढली. कोल्हापूर, सांगली, सातारा, नगर, पुणे जिल्ह्यांसह विदर्भातील बुलडाणा, अमरावती, मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड आदी जिल्ह्यात आंदोलकांनी दूधाचे टॅंकर रोखले, शासनाचा निषेध करत दूध रस्त्यावर ओतले, तर काही ठिकाणी दूधाचे मोफत वाटप करण्यात आले. 

दूधाचे मोठ्या प्रमाणात संकलन रविवारीच रोखल्या गेल्याने मुंबईत आज अंदाजे ३० लाख लिटर पोहोचलेच नाही. मुंबईकरांना दररोज ५५ लाख लिटर्स दुध लागते. पश्चिम महाराष्ट्रातील १५ लाख लिटर्स दुध मुंबईत पोहोचले नाही. उद्यापासून मुंबईला दुध टंचाईच्या झळा जाणवू लागतील. 

दरम्यान, दुध आंदोलनाला पहिल्या दिवशीच १०० टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत ठिकठिकाणी एकूण १० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, कार्यकर्त्यांना हात लावाल तर आंदोलन अजून चिघळेल, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रति लिटर पाच रुपये जमा झाल्या शिवाय आंदोलन थांबणार नाही, असा इशारा स्वाभिमानीने दिला आहे.  खासदार शेट्टी यांनी पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीला दुग्धाभिषेक केला... video

आज वल्गना करुद्यात, उद्या शेतकऱ्यांसमोर हात जोडावेच लागतील.  दरोडेखोरांनाच दूध पावडर निर्यातीसाठी अनुदान दिले आहे. सरकारने चर्चेला खुल्या दिलाने यावे, चर्चेचे दरवाजे बंद नाहीत, मत खा. शेट्टी यांनी पुणे येथे व्यक्त केले. दुध रस्त्यावर फेकू नका. झोपडपट्टी, अनाथालय, वारीत दुध वाटा, असे  आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले आहे.  औरगांबाद : लाखगंगा गावात संकलन बंद ठेवण्याचा निर्धार.. Video

आंदोलनातील घडामोडी...

  • पालघरचे हितेंद्र ठाकूर यांचा दुध आंदोलनाला पाठिंबा. खा. शेट्टी आजच पालघरला जाणार. मुंबई-अहमदाबाद हायवे दरम्यान दुध पुरवठा खंडित करण्याची योजना.
  • मुबंई तसेच महानगरांच्या दिशेने होणारा दुध पुरवठा सुरळीत होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची मदत घ्या- दुग्धविकास मंत्रालयाच्या संघ व शासकीय दुग्ध शाळांना सूचना.
  • पुणे : मुंबईला नेहमी प्रमाणे दुध पुरवठा. गरज पडल्यास पोलीस संरक्षण- अमूल सूत्रांची माहिती
  • पुणे - दूध आंदाेलनाच्या पार्श्वभुमिवर खा. राजू शेट्टी यांच्याकडुन दगडुशेठ गणपतीला दूधाचा अभिषेक
  • पुणे : क्रांती,माऊली,कृष्णाई,मातोश्री,सोनई दूध संघांना 'स्वाभिमानी'चा दणका. या संघाच्या गाड्या 'स्वाभिमानी'ने फोडल्या दुध रस्त्यावर सांडले. दुधाच्या पाच गाड्या फोडल्या.
  • बुलडाणा : जिल्ह्यात नांदुरा तालुक्यात मदर डेयरीसाठी होणारे 17 गावातील संकलन स्वाभिमानीच्या आंदोलनामुळे बंद
  • शालेय मुलांना केले दूध वाटप
  • रविवारी रात्री वाघजाळ (ता. मोताला) दूध वाहन फोडले, मलकापुर महामार्गावर डेयरी च्या दुधाच्या वाहनातील हवा सोडली. कोथळी (तालुका मोताला) येथे दूध उत्पादकांनी कुत्र्यांना दूध पाजून केले आंदोलन. 
  • स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला पोलिस पाटिल संघटनेचा पाठिंबा
  • कोल्हापुरात दूध संकलन ठप्प.वडणगे (ता.करवीर) येथे दूध संस्थानी संकलन थांबवल्याने नेहमी सकाळी उत्पादकांनी गर्दी असणाऱ्या संस्थेचे शटर सोमवारी(ता.16) सकाळी डाऊन होते. कोल्हापूर- इचलकरंजी सह  ग्रामीण भागात लोकांना मोफत दूध वाटप
  • औरगांबाद मधील लाखगंगा गावात आज मारूती मंदीरात दूधाने अभिषेक करून दूध आदोलनास पाठीबा देऊन पूणः संकलन बंद ठेवण्यात आले. 
  • सोलापुरात पहाटे सोलापूर -पुणे महामार्गावर वरवडे टोलनाक्यावर मुंबईला जाणारा वैष्णवी दूध डेअरीचा टॅंकर फोडला. तिसंगी (ता. पंढरपूर) येथील पाच दुध संकलन केंद्र प्रभात डेअरी, हटसन डेअरी २, सोनाई, दूध पंढरी, आदी संकलन केंद्र बंद ठेवून (५००० लीटर दूध) सर्व शेतकरी संपात सहभागी. 
  • रोपळे बुद्रूक मध्ये दुध संकलन बंद . पंढरपुर तालुक्यातील तुंगत येथे १५ जुलै च्या मध्यरात्री १२ वाजता स्वाभीमानी ॉच्या कार्यकर्त्यांनी व दूध उत्पादकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना दुग्धाभिषेक करुन दूध आंदोलनाला सुरवात केली. या वेळी नवनाथ रणदिवे, विक्रम लामकाने, कुमार माळी, लक्ष्मण पाखरे , विकास लामकाने, संतोष यादव, नितीन रणदिवे याच्यासह दूध उत्पादक उपस्थित होते
  • नगर जिल्ह्यातील कोपरगाव, अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी, पाथर्डी, पारनेर, कर्जत तालुक्यात बहुतांश केंद्राकडून दुध संकलन बंद. दुध उत्पादनात अग्रेसर असलेल्या देहरे ता. नगर येथे सर्व दुध संकलन केंद्रे बंद. जोगेश्वरी आखाडा ता. राहुरी येथे जगदंबा देवीला दुग्धाभिषेक करुन, चार दूध संकलन केंद्र बेमुदत बंद ठेवली. सात हजार लिटर दूध गावातच वाटण्यात आले
  • सातारा : कराड येथे स्वाभिमानाचे जिल्हाध्यक्ष सचिन नलावडे यांच्या उपस्थित यशवंतराव चव्हाण स्मारक आणि कृष्णमाई घाट येथे दुग्धाभिषेक करून सकाळी 10 वाजता आंदोलनास सुरवात होणार आहे
  • कोल्हापूरात दूध संकलन 100 टक्के बंद   कोल्हापूर- गायीच्या दूधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे यासाठी पुकारलेल्या दूध बंद आंदोलनाला सकाळी शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील सहा हजारहून अधिक दूध संस्था आणि दूध संघांनी संकलन बंद ठेवून याला पाठिंबा दिला. गोकुळ दूध संघाने 11 लाख 50 हजार लिटरचे संकलन बंद केले. याला कोल्हापूरातील 5 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. सकाळी साडेनऊपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील दूध संकलन शंभर टक्के बंद राहिले. कोल्हापूर जिल्ह्यातील गावा-गावात पहाटे चार ते पाच दरम्यान दूध संस्थांचा भोंगा (सायरण) वाजतो. यावेळी शेतकऱ्यांची गाय व म्हैस दूध काढण्याची लगबग सुरू होते. आज मात्र एकाही संस्थेचा भोंगा किंवा सायरण वाजला नाही. जिल्ह्यात गोकुळसाठी दूध संकलन करणाऱ्या 5 हजार 500 संस्था आहेत. तर, इतर संस्थांसाठी दिड ते दोन हजार संस्था आहेत. या सर्व संस्थांनी दूध संकलन बंद ठेवले आहे. कोल्हापूरातुनच सुरू झालेल्या दूध आंदोलनामूळे एक टॅंकर किंवा टॅंम्पो सकाळपर्यंत अडवलेला किंवा दूध रस्त्यावर ओतलेले दिसले नाही.  दूध बंद आंदोलनाला यापूर्वीच पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांना चार पैसे जास्त मिळाले पाहिजेत. यासाठी, गोकुळने आजचे सर्व दूध संकलन बंद ठेवले आहे. दूध संकलन बंद राहणार याबाबत दोन दिवसापूर्वीच सर्व संस्थांना कळविले आहे.  -  विश्‍वास नारायण पाटील  अध्यक्ष, गोकुळ दूध संघ (कोल्हापूर)  सोलापूर जिल्ह्यात दूध दर आंदोलनाची पहिली ठिणगी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास आंदोलनकर्त्यांनी वरवडे (जि. सोलापूर) टोल नाक्यावर वैष्णवी डेअरीच्या मुंबईला जाणार्‍या टॅंकररमधून रस्त्यावर दूध सोडून दिले...

    #Milk #MilkAgitation #दूधदर_आंदोलन #CutTheSupply

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com