agriculture news in marathi, milk agitation will start in midnight, Maharashtra | Agrowon

पंढरीत विठ्ठलाला दुग्धाभिषेक करुन आंदोलनाला प्रारंभ
टीम अॅग्रोवन
रविवार, 15 जुलै 2018

अकोला : कर्नाटक व केरळच्या धर्तीवर राज्यातही दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदानाच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून (ता. १६) अांदोलनाचा इशारा दिला आहे. अांदोलनात सहभागी शेतकरी दूध घालणार नाहीत. मुंबई, पुण्याकडे जाणारे टँकर पुढे जाऊ दिले जाणार नाहीत. पुरुष कार्यकर्त्यांसोबत महिलांची अाघाडीसुद्धा अांदोलनात सहभागी होत अाहे. आंदोलन दडपण्याची शक्यता लक्षात घेऊन स्वाभिमानीने ए, बी, सी, डी अशा वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आंदोलकांची फौज तयार करून गनिमी काव्याने लढण्याची तयारी केली. आज (ता.

अकोला : कर्नाटक व केरळच्या धर्तीवर राज्यातही दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदानाच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून (ता. १६) अांदोलनाचा इशारा दिला आहे. अांदोलनात सहभागी शेतकरी दूध घालणार नाहीत. मुंबई, पुण्याकडे जाणारे टँकर पुढे जाऊ दिले जाणार नाहीत. पुरुष कार्यकर्त्यांसोबत महिलांची अाघाडीसुद्धा अांदोलनात सहभागी होत अाहे. आंदोलन दडपण्याची शक्यता लक्षात घेऊन स्वाभिमानीने ए, बी, सी, डी अशा वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आंदोलकांची फौज तयार करून गनिमी काव्याने लढण्याची तयारी केली. आज (ता. १५) मध्यरात्रीला पंढरपुरात विठ्ठलाला दुधाचा अभिषेक करून हे अांदोलन होणार अाहे. 
 

विठ्ठलाला दुधाचा अभिषेकावेळी खासदार राजू शेट्टी, रविकांत तुपकर, प्रकाश पोफळे व इतर पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जाते. मात्र, सरकार काही स्थानिक नेत्यांना हाताशी धरून जबरदस्तीने दूध घेऊ शकते. सरकारने पोलिस बळाचा वापर शेतकऱ्यांना दूध घेतल्यास संघर्ष होऊ शकतो. अांदोलन थांबवण्यासाठी सरकारच्या पातळीवरून प्रयत्न सुरू असले तरी मागणी मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे स्वाभिमानीच्या नेत्यांनी ठाम सांगत मुंबईसह मोठ्या शहरांचा दूधपुरवठा कुठल्याही परिस्थितीत बंद करण्याचा निर्धारही व्यक्त केला अाहे. 

दूध अांदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेले काही दिवस खासदार राजू शेट्टी व स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर हे विशेष करून दूध उत्पादन अधिक असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये जागोजागी सभा घेत अाहेत. प्रत्येक ठिकाणच्या सभांना दूध उत्पादकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने हे अांदोलन राज्यात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात अधिक तीव्रतेने होण्याची शक्यता अाहे. 

खा. शेट्टींनी कोल्हापूर, इस्लामपूर, शिराळा, सांगली, पुणे, सोलापूर, सातारा, नगर जिल्‍ह्यात ठिकठिकाणी सभा घेऊन वातावरण तापवले. तर रविकांत तुपकरांनी औरंगाबाद, बीड, भूम, उस्मानाबाद, परंडा, बार्शी, सोलापूर, जामखेड, नगर, मंगळवेढा, सांगोला या भागांचा दौरा पूर्ण केला असून त्यांनीही दूध पट्टा पिंजून काढला. या दोघांनी त्या-त्या भागात जाऊन आंदोलनाची रणनिती तयार केली अाहे. राज्यात उत्पादित होणारे दूध मुंबई व मोठ्या शहरात जाऊ दिले जाणार नाही.

तसेच, परराज्यातून दररोज येणारे साधारणतः दीड लाख लिटर दुधाचाही पुरवठा होणार नाही. यासाठी गुजरातमधून हार्दीक पटेलने या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे स्वाभिमानीचे नेते सांगत अाहेत. अशीच रणनीती कर्नाटक, मध्य प्रदेशातूनही अाखण्यात अाली अाहे. अांदोलनाची सुरवात पश्चिम महाराष्ट्रातून होत असली तरी याच्या सोबतीला विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातही दुधाचे हे आंदोलन पेटविण्याची रणनीती तयार करण्यात अाली अाहे. 

अांदोलनाच्या अनुषंगाने झालेल्या सभांमधून खा. शेट्टी यांनी अर्थशास्त्रीय मांडणीतून दुधाची आकडेवारी शेतकऱ्यांना समजावून सांगितली. तर तुपकरांनी नेहमीच्या अाक्रमक शैलीने शेतकऱ्यांना पेटवण्याचे काम चालविले आहे. सरकारने दूध पावडर निर्यातीवर ५० रुपये प्रतिकिलो तर दूध निर्यातीवर प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले. मात्र, सरकारची ही घोषणा कशी फसवी आहे. याचा फायदा काही दूध संघानाच होणार असे स्वाभिमानीचे नेते शेतकऱ्यांना पटवून सांगत अाहेत. स्वाभिमानीने पुकारलेले हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी सरकारच्या पातळीवरून हालचाली सुरू झाल्या आहे. मंत्री महादेव जानकर हे राजू शेट्टींचे मित्र असल्याने सरकार त्यांच्याच माध्यमातून मध्यस्थीसाठी प्रयत्न करीत अाहे. परंतु, अद्याप याला कुठलेही यश अालेले नाही.   
 

इतर अॅग्रो विशेष
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना...शिर्डी: महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला....
कोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणारकोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात,...
कमी दरांवरून जिनर्सचा ‘सीसीआय’च्या...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
होय, आम्ही बदलू शेतीचे चित्र... ‘शाळेत सुरू असलेल्या कृषी शिक्षण अभ्यासक्रमातून...
‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा...अकोला :  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
शेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख...पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी...
नाबार्डच्या व्याजदरातच जिल्हा बँकांना...मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या...
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...पुणे : कोकण अाणि पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...
अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू...अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू...
अठरा गावांनी केली कचऱ्यापासून गांडूळखत...गावे आणि वाडीवस्त्याही स्वच्छतेत अग्रभागी...
‘सीसीआय’च्या खरेदीला दिवाळीत मुहूर्तमुंबई : देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...
सिंचन योजनांचे अर्थसाह्य महामंडळाच्या...मुंबई : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतील...
मुरघास : चाराटंचाईवर उत्तम पर्यायउन्हाळ्यामध्ये किंवा चारा तुटीच्या काळात...
बाजारात टंचाईमुळे ‘पांढऱ्या सोन्या'च्या...जळगाव ः देशात कापसाची सर्वाधिक सुमारे ४० लाख हेक्...
दिवसा वीजपुरवठ्याचे स्वप्न प्रत्यक्षात...मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषी पंप...
विजयादशमीनिमित्त फुलांना मागणी वाढलीपुणे ः गुरुवारी (ता. १८) साजऱ्या हाेणाऱ्या...
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची...पुणे: राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरू...
मराठवाड्यात यंदा शेतकऱ्यांचे...औरंगाबाद : कमी पाऊस आणि मोठा खंड यामुळे...
ऊर्जा विभागाच्या योजनांचा शेतकऱ्यांना...मुंबई  : ऊर्जा विभागाने लोकहिताच्या व...
राज्यात २७ लाख हेक्टरवर होणार ज्वारी...पुणे : केंद्र सरकारच्या नव्या धोरणाप्रमाणे...