परभणीत दूध संकलन ५५९६ लिटरने वाढले

दूध संकलनात वाढ
दूध संकलनात वाढ
परभणी : शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील दुग्ध शाळेमध्ये परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातून दररोज होत असलेल्या दूध संकलनात आॅक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात सरासरी ५५९६ लिटरने वाढ झाली आहे.
 
शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील दुग्ध शाळेमध्ये परभणी, हिंगोली, नांदेड या तीन जिल्ह्यांतील शासकीय दूध शीतकरण केंद्राकडे दूध उत्पादक संस्थांनी संकलित केलेले दूध एकत्रित केले जाते.
 
यंदाच्या आॅक्टोबर महिन्यात परभणी योजनेतंर्गत पाथरी येथील शासकीय दूध शीतकरण केंद्रामार्फत दररोज सरासरी ६५४२ लिटर गायीचे दूध, गंगाखेड येथील शीतकरण केंद्रामार्फत दररोज सरासरी १०३ लिटर म्हशीचे आणि २७१२ लिटर गायीचे असे एकूण सरासरी २८१५ लिटर दूध, परभणी स्थानिकचे म्हशीचे दररोज सरासरी २८५ आणि गायीचे ४५११ लिटर, हिंगोली शीतकरण केंद्रामार्फत म्हशीचे दररोज सरासरी ३६६ आणि गायीचे १६८१ लिटर असे एकूण २ हजार ४७ लिटर दूध, परभणी दूध योजनेअंतर्गत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील सरासरी १६२०० लिटर आणि नांदेड येथील शितकरण केंद्रमार्फतचे १३४६ लिटर असे महिनाभरात मिळून सरासरी १७, ५४७ लिटर दुधाचे संकलन करण्यात आले होते.
 
नोव्हेंबर महिन्यात दूध संकलनात ५५९६ लिटरने वाढ झाली आहे. नोव्हेंबरमध्ये पाथरी येथील शासकीय दूध शितकरण केंद्रामार्फत दररोज सरासरी ८५५३ लिटर गायीचे दूध, गंगाखेड येथील शितकरण केंद्रामार्फत दररोज सरासरी ३३५ लिटर म्हशीचे आणि ३३३८ लिटर गायीचे असे एकूण सरासरी ३६७३ लिटर दूध, परभणी स्थानिकचे म्हशीचे दररोज सरासरी ७७४ आणि गायीचे ५५६० लिटर, हिंगोली शीतकरण केंद्रामार्फत म्हशीचे दररोज सरासरी ३७१ आणि गायीचे २ हजार ९९ लिटर असे एकूण सरासरी २४७० लिटर दूध असे परभणी योजनेतंर्गत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील सरासरी २१ हजार २९ लिटर आणि नांदेड येथील शितकरण केंद्रमार्फतचे २११४ लिटर असे परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील मिळून महिनाभरात सरासरी २३,१४३ लिटर दुधाचे संकलन करण्यात आले होते.
 
सततच्या अवर्षण स्थितीमुळे अनेक शेतकरी, शेतमजूर शेतीपूरक दुग्ध व्यवसायाकडे वळले आहेत. सद्यःस्थितीत दुधाळ पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता आहे. त्यामुळे दूध संकलनात वाढ झाली आहे.परभणी येथे दूध प्रक्रिया पदार्थ करण्याची तसेच पॅकिंगची सुविधा नसल्यामुळे पाश्चरायझेशन प्रक्रियेनंतर दूध मुंबई किंवा पुणे अथवा अन्य जिल्ह्यातील दूध प्रक्रिया उद्योगांकडे टॅंकरद्वारे पाठविले जाते.
 
सध्या वरळी (मुंबई) आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दूध प्रक्रिया उद्योगाकडे दररोज सरासरी २० ते २३ हजार लिटर दूध टॅंकरद्वारे पाठविले जाते.परभणी जिल्ह्यात सध्या असलेल्या दुधाळ पशुधनापासून दररोज सरासरी २ लाख २५ हजार लिटर दूध उत्पादन मिळते. परंतु जिल्ह्याच्या लोकसंख्येची दुधाची गरज पूर्ण करण्यासाठी उत्पादनाएवढ्याच आणखी दुधाची गरज आहे.
 
सध्या अन्य जिल्ह्यातून दररोज पॅकिंग केलेले ३० ते ४० हजार लिटर दूध जिल्ह्यात येत असते. दुधाच्या बाबतीत स्वंयपूर्णता आण्यासाठी पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाने जिल्ह्यात दुग्ध व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रक्रिया उद्योग उभारणीची आवश्यकता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com