agriculture news in marathi, milk cow scheme upgraded | Agrowon

दुधाळ जनावरे वाटप योजनेत देशी गाईंचा समावेश
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 जानेवारी 2019

पुणे : देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी संकरित दुधाळ गायी आणि म्हशींच्या वाटप योजनेत देशी गायींचे वाटप करण्याला शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे आता या योजनेतून गीर, सहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर देवणी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी या देशी गोवंशाचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त कांतिलाल उमाप यांनी दिली. 

पुणे : देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी संकरित दुधाळ गायी आणि म्हशींच्या वाटप योजनेत देशी गायींचे वाटप करण्याला शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे आता या योजनेतून गीर, सहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर देवणी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी या देशी गोवंशाचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त कांतिलाल उमाप यांनी दिली. 

उमाप म्हणाले, ‘‘देशी गोवंशाबाबत समाजात जागरूकता वाढत आहे. अनेक सुशिक्षित तरुण, तरुणी या व्यवसायात येत असून, गायी आणि म्हशींच्या गट वाटप योजनेत देशी गोवंशाचा समावेश नव्हता. त्यामुळे अनेक नवउद्योजकांना या योजनेचा लाभ मिळत नव्हता. त्यामुळे देशी गोवंशाचा समावेश या योजनेत करावा, यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला होता. या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असून, यामुळे  विविध देशी गोवंशाचे वाटप या योजनेतून होणार आहे. या योजनेत सहा, चार दोन गायींचे वाटप करण्यात येणार आहे. ही योजना खुल्या गटासाठी ५० टक्के तर अनुसूचित जाती जमातींच्या लाभार्थांसाठी ७५ टक्के अनुदान मिळणार आहे.‘‘

गटनिहाय योजना आणि त्याची किंमत

पशुधनाचा गट किंमत (रुपये) 
३ लाख ३५ हजार १८४ 
१ लाख ७० हजार १२५ 
८५ हजार ६१ 

मी कोकणात सेंद्रिय शेती करत आहे. सेंद्रिय शेतीसाठी देशी गोवंशाचे शेण आणि गोमूत्र महत्त्वाचे असून, या योजनेच्या लाभ मला घेता येईल. परिणामी देशी गोवंशाच्या संवर्धनातून नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीला फायदा होईल.
- केतकी फाटक- पाटील, करंबळे तर्फे देवळे, ता. संगमेश्‍वर, रत्नागिरी. 

इतर अॅग्रो विशेष
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...
बॅंक अधिकारी झाला पूर्णवेळ प्रयोगशील...विशाखापट्टण व त्यानंतर हैद्रराबाद येथे खासगी...
स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...
पूर्व विदर्भात गारपीटपुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
राज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...
दरामुळे साखरेचा रंग फिकाकोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही...
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...