agriculture news in marathi, milk demand has increased in Jalgaon district | Agrowon

जळगाव जिल्ह्यात दुधाची मागणी वाढली
टीम अॅग्रोवन
रविवार, 16 सप्टेंबर 2018

जळगाव : जिल्ह्यात सणासुदीला दुधाचा कोणताच तुटवडा नाही. शिवाय यंदाच्या दुष्काळी स्थितीचाही परिणाम दूध संकलनावर झालेला नसून, जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संकलन प्रतिदिन तीन लाख लिटरपर्यंत आहे. दुधाचे खरेदी व विक्री दरही स्थिर असल्याचे चित्र आहे.

जळगाव : जिल्ह्यात सणासुदीला दुधाचा कोणताच तुटवडा नाही. शिवाय यंदाच्या दुष्काळी स्थितीचाही परिणाम दूध संकलनावर झालेला नसून, जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संकलन प्रतिदिन तीन लाख लिटरपर्यंत आहे. दुधाचे खरेदी व विक्री दरही स्थिर असल्याचे चित्र आहे.

गणेशोत्सव, गौरीचा उत्सव सध्या सुरू आहे. पुढे घटस्थापना, सप्तमी श्राद्ध, नवमी श्राद्धाचे कार्यक्रम आहेत. अशात दुधाची मागणी कायम आहे. ती किंचित स्वरूपात वाढली असून, प्रतिदिन १० ते १२ हजार लिटर दुधाची अधिकची खरेदी सर्व संघ, डेअऱ्यांकडे विक्रेते करीत आहेत. परंतु अतिरिक्त संकलन असल्याने दुधाचा कोणताही तुटवडा नाही. जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडे प्रतिदिन तीन लाख लिटर दूध संकलन सुरू आहे. यात गायीचे दूध जवळपास पावणेतीन लाख लिटर असून, ७५ हजार लिटर दूध म्हशीचे आहे. संघाकडे प्रतिदिन सुमारे ७० ते ७५ हजार लिटर गायीचे अतिरिक्त दूध येत असल्याने त्याची पावडर तयार करावी लागते. खासगी डेअऱ्यांचे संकलन ५० ते ५५ हजार लिटर प्रतिदिन आहे.  

दूध संघ गायीच्या दुधाला २५ रुपये, तर म्हशीच्या दुधाला ३८ रुपये प्रतिलिटर असा दर देत आहे. संघाचे गायीचे दूध ३८ रुपये प्रतिलिटर आणि म्हशीचे दूध ५२ रुपये प्रतिलिटर या दरात जळगाव शहरात विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. खासगी डेअऱ्यांकडूनही दूधपुरवठा वाढत असून, गुजरातमधील राज्य सहकारी दूध संघाचे अमूल दूधही जळगावात उपलब्ध झाले आहे. त्याची विक्री विविध वितरक, उपनगरांमधील दुकानांमधून सुरू झाली आहे. पुढे दिवाळीपर्यंत संकलन कमी होणार नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

 

इतर बातम्या
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
नाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा...नाशिक : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासमोर...
शेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेरावनाशिक  : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी...
मीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे...सोलापूर  : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर...
दिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ....सोलापूर : दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी...
`आंब्याचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग :  कोकणातील आंबा...
कोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणीकोल्हापूर  : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची...
नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीरनंदुरबार  : जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे....
स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...
पुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...
रणजितसिंहाच्या भाजप प्रवेशाने खरच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः पश्चिम...
काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी बारा...मुंबई ः आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील...
पूर्व विदर्भात गारपीटपुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...
राज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...
आचारसंहिता भंगाच्या ७१७ तक्रारीमुंबई : नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी...