agriculture news in marathi, MIlk Farmers demands Govt rates, karad, Satara | Agrowon

'दूधाला दर मिळालाच पाहिजे'
सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017
कऱ्हाड, जि. सातारा ः सरकारी आदेशाला न जुमानता दुध उत्पादक शेतकऱ्यांकडुन २१ ते २२ रूपये प्रती लीटर एवढ्या अल्प दराने दुध खरेदी करत असल्याने दुध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील कऱ्हाड,पाटण, सातारा, कोरेगावसह अन्य तालु्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांनी  उंब्रज (जि.सातारा) येथे घोषणाबाजी करत त्यांनी दूध रस्त्यावर ओतून ओतून निषेध व्यक्त केला. यावेळी शासनाच्या 'कोण म्हणत देत नाही आर घेतल्याशिवाय राहत नाही', 'दूधाला दर मिळालाच पाहिजे' अशा घोषणांनी परिसर दमाणून गेला. 
कऱ्हाड, जि. सातारा ः सरकारी आदेशाला न जुमानता दुध उत्पादक शेतकऱ्यांकडुन २१ ते २२ रूपये प्रती लीटर एवढ्या अल्प दराने दुध खरेदी करत असल्याने दुध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील कऱ्हाड,पाटण, सातारा, कोरेगावसह अन्य तालु्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांनी  उंब्रज (जि.सातारा) येथे घोषणाबाजी करत त्यांनी दूध रस्त्यावर ओतून ओतून निषेध व्यक्त केला. यावेळी शासनाच्या 'कोण म्हणत देत नाही आर घेतल्याशिवाय राहत नाही', 'दूधाला दर मिळालाच पाहिजे' अशा घोषणांनी परिसर दमाणून गेला. 

दुग्धविकास मंत्री  महादेव जानकर यांनी गाईच्या दुधास फॅट ३.५, ८.५ प्रमाणे दुध खरेदी दर २७ रूपये प्रती लीटर असा जाहीर केला  असताना देखील आपल्या जिल्ह्यात असलेल्या खाजगी व सहकारी दुध संघ सरकारी आदेशाला न जुमानता दुध उत्पादक शेतकऱ्यांचे दुध २१ ते २२ रूपये प्रती लीटर अशा अल्प दराने  खरेदी करत असल्याने दुध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. कऱ्हाडसह पाटण तालुका व सातारा जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकरी, सभासद  संघटीत होऊन घोषणाबाजी करत तीव्र निषेध व्यक्त केला. शेतकऱ्यांनी यांनी दूध दराबाबत काढलेल्या मोर्चास चोरे रस्ता येथून सुरवात झाली. यामध्ये शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. मोर्चा सेवा रस्त्यावरुन बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यामध्ये जमलेल्या शेतकऱ्यांना यावेळी इंद्रजीत जाधव, विजय पाटील, लालासाहेब यादव, कृष्णत जाधव, यांनी मार्गदर्शन केले. 

re>

इतर ताज्या घडामोडी
पुलवामातील हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्याचे...बुलडाणा : पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी ...
हल्ल्या मागे जे आहेत त्यांना शिक्षा...नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा...
आम्ही विसरणार नाही.. माफही करणार नाही...नवी दिल्ली- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात...
काश्‍मीरमधील शेतकऱ्याला थकबाकीची रक्कम...पुणे : काश्‍मीरमधील शेतकऱ्याला सफरचंदाचे पैसे...
बिबट्याच्या दहशतीखाली चोरट्यांकडून...आंबेठाण, जि. पुणे : शिंदे गाव (ता. खेड) येथे दोन...
‘डिंभे’चे पाणी जोड बोगद्याद्वारे ‘...मुंबई : डिंभे डाव्या तीर कालव्यातील गळती...
विदर्भात आज गारपीट, हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पोषक हवामानामुळे आज (ता. १४) विदर्भात...
कापसासाठी ‘एमसीएक्‍स’कडून गोदामांची...मुंबई : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना समृद्ध...
कर्ज देण्याच्या नावाखाली ७३ शेतकऱ्यांची...गोंदिया : कर्ज देण्याच्या नावाखाली ७३...
इतिवृत्तात शेतकरी प्रतिनिधींच्या...नांदेड : ऊसदर निश्चित करण्याच्या बाबतीत...
पंतप्रधान दौऱ्याच्या दिनी मनसे वाटणार...यवतमाळ : निवडणुकीपूर्वी अच्छे दिनचे स्वप्न...
जमीन गैरव्यवहार चौकशी 'सक्तवसुली'मार्फत... पुणे : सोलापूरच्या जुनी मिल नावाने ओळखल्या...
उन्हाळी भुईमुगावरील रसशोषक किडींचे...उन्हाळी भुईमुगामध्ये पीक कालावधीत सुरवातीच्या...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ६०० ते २०००...परभणीत ६०० ते १००० रुपये  परभणी...
फुलांना भेट देणाऱ्या किटकांचे डीएनए...किटकांनी फुलांना भेट दिल्यानंतर तिथे सूक्ष्म असे...
रेशीम उत्पादकांचे उपोषण अखेर सुटलेजालना : मनरेगाअंतर्गत मिळणारे पेमेंट...
जळगावात शिक्षकांची 'व्हॉट्‌सॲप'वरून...जळगाव : शाळेत वेळेवर न येणे, वेळेअगोदरच शाळा...
जळगाव जिल्ह्यात `किसान सन्मान`च्या...जळगाव  : केंद्र शासनाने नुकत्याच जाहीर...
आरफळची ऊसबिलातून पाणीपट्टी वसूलतासगाव, जि. सांगली : दुष्काळी पार्श्वभूमीवर...
गोंदिया जिल्ह्यात अडीच लाख शेतकऱ्यांना...गोंदिया : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत...