दूधप्रश्नावरील आंदोलनाच्या समन्वयासाठी आज बैठक

दूधप्रश्नावरील आंदोलनाच्या समन्वयासाठी आज बैठक
दूधप्रश्नावरील आंदोलनाच्या समन्वयासाठी आज बैठक

नगर : दर मिळत नसल्याने मोफत दूध देऊन आंदोलन करण्याबाबतची तीव्रता राज्यभर जावी, यासाठी दूध उत्पादक संघर्ष समितीतर्फे आज (गुरुवारी) समन्वय बैठक होत आहे. किसान सभेचे राज्य सरचिटणीस डाॅ. अजित नवले, शेतकरी नेते धनंजय धोर्डे पाटील मार्गदर्शन करणार आहेत. दुधाचे भाव दहा रुपयाने घसरून अत्यंत न्यूनतम पातळीवर आले आहेत. सरकारने जाहीर केलेल्या भावापेक्षा दहा रुपयाने कमी दर. घेत आपण गेली अनेक महिने दूध घालत आहोत. दररोज तोटा सहन करतो आहोत. आता या पेक्षा अधिक तोटा सहन करणे आपल्याला अशक्य झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात लाखगंगा गावात येथील शेतकऱ्यांनी ग्रामसभा घेऊन ‘आता लुटण्या ऐवजी फुकटच न्या’ म्हणत मोफत दूध वाटण्याचा ग्रामसभेत ठराव करून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक व सोलापूर जिल्ह्यांतील इतर गावेही असाच ठराव करण्याच्या तयारीत आहेत.  ग्रामसभांमधून असे ठराव करून दूध उत्पादकांचे राज्यव्यापी आंदोलन संघटित करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. दूध उत्पादकांच्या या राज्यव्यापी लढ्याच्या समन्वयासाठी नगर येथे राज्यव्यापी बैठकीचे आयोजन करत आहोत. नगर शहरातील रेहमत सुलतान हॉल, सर्जेपुरा, येथे ही बैठक होत आहे. दूध उत्पादक कार्यकर्ते, विविध समविचारी शेतकरी संघटनांचे नेते, कार्यकर्ते यांनी बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com