agriculture news in marathi, On milk issues farmers and dairy to come on one platfrom | Agrowon

दूध दरप्रश्नी शेतकरी आणि संघ एकत्र येणार
टीम अॅग्रोवन
शनिवार, 12 मे 2018

पुणे : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नसल्याचे पाहून सरकारला झुकविण्यासाठी आता दूध उत्पादक प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघ व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नसल्याचे पाहून सरकारला झुकविण्यासाठी आता दूध उत्पादक प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघ व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील म्हणाले की, “शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळवून देण्याची मागणी केवळ शेतकरी वर्गाची नसून त्याला सहकारी व खासगी दूध संघांचाही पाठिंबा आहे. शेतकऱ्यांना प्रतिलिटर २७ रुपये दर मिळाला पाहिजे. अनुदानापोटी पाच रुपये थेट शेतकऱ्याच्या बॅंक खात्यात जमा करण्याची आमचीही मागणी आहे. हीच भूमिका डॉ. अजित नवले घेत असल्यामुळे आम्ही एकत्रितपणे पाठपुरावा करण्यास तयार आहोत.”

दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे प्रमुख डॉ. अजित नवले यांनी अलीकडेच दुधाच्या भेसळीविरोधात जाहीर आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे. तसेच, ९ जिल्ह्यांमधील शेतकरी लॉंगमार्च काढून मंत्रालयासमोर मोठे आंदोलन करतील, असा इशाराही दिला आहे. 

“डॉ. नवले यांच्या आंदोलनात सहकारी दूध संघ व खासगी डेअरी चालकांनीदेखील आपली ताकद लावल्यास राज्य सरकारला घाम फुटू शकतो. मात्र, त्यासाठी दूध संघाचे प्रतिनिधी व संघर्ष समितीचे प्रतिनिधी यांच्यात व्यवस्थित चर्चा होण्याची गरज आहे. येत्या आठवडाभरात तशी चर्चा करून आम्ही पुढील व्यूहरचना ठरवू,’’ अशी माहिती सहकारी दूध संघांच्या प्रतिनिधींनी दिली.

शेतकरऱ्यांच्या हितासाठी राज्यातील दूध संघ, प्रक्रियाचालक किंवा मार्केटिंगमधील घटकांना बरोबर घेऊन आंदोलन करण्यात आम्हाला काहीही अडचण नाही. त्यासाठी आमची तयारी सुरू असून लवकरच बैठक होईल. मात्र, काहीही झाले तरी शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळणे व दुधातील भेसळ थांबविणे या उद्दिष्टापासून आम्ही बाजूला जाणार नाही, असे डॉ. नवले यांनी स्पष्ट केले.

टोन्ड दुधाची विक्री थांबवा : डेरे
शेतकऱ्यांकडून ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफचे दूध मातीमोल भावाने विकत घेतले जाते. त्यात पुन्हा भेसळ करून त्याची विक्री होते. भेसळीला आवर घालण्यासाठी राज्यात टोन्ड दुधाची विक्री बंद करावी, अशी मागणी दूध उत्पादक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गुलाबराव डेरे यांनी केली आहे. यामुळे २० लाख लिटर्स दूध आपोआप कमी होईल. शेतकऱ्यांकडून दूध घेताना ३.५ च्या खाली फॅट लागल्यास प्रति फॅट ५० पैसे आणि ८.५ च्या खाली एनएनएफ असल्यास प्रति एसएनएफ ३० पैसे कापून घेतले जातात. यामुळे प्रतिलिटर १.६० रुपये शेतकऱ्यांची लूट होते. काही भागांत दहा लिटरला १०० ते २०० मिलि काटा मारून शेतकऱ्यांचे दूध घेतले जाते. तसेच ३.६ ते ५.० फॅटला प्रतिफॅट ३० पैसे न देता २० पैसे देऊन तेथेही लूट केली जाते. आपण या लुटीविरोधात लढा देणार आहोत, असेही श्री. डेरे म्हणाले.

इतर अॅग्रो विशेष
‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...
परभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...
सीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...
ब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...
गोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...
शेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...
राज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...
संत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...
फॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...
चिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...