agriculture news in marathi, milk producer in trouble Due to closure of the chilling center | Agrowon

शीतकरण केंद्र बंद असल्याने दुग्धोत्पादक अडचणीत
विनोद इंगोले
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

अमरावती : वाशीम येथील शासकीय दुग्ध योजनेकडून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले दूध संकलनाचे काम अचानक थांबविण्यात आल्याने दूध उत्पादकांची गोची झाली आहे. शेतीपूरक उद्योगांना प्रोत्साहन देण्याची वल्गना करणाऱ्या शासनाचे दुटप्पी धोरण या माध्यमातून स्पष्ट झाल्याचा आरोप या पार्श्‍वभूमीवर दुग्ध उत्पादकांनी केला आहे.

वाशीम जिल्ह्याचे एकूण सरासरी दुग्धोत्पादन दरदिवशी १० हजार लिटरच्या घरात आहे. यातील अर्धेअधिक दूध हे संघाच्या माध्यमातून शासकीय दुग्ध योजनेला पोचविण्यावर शेतकऱ्यांचा भर राहतो. मध्यंतरी जनावरांपासून दूध मिळणे कमी झाले.

अमरावती : वाशीम येथील शासकीय दुग्ध योजनेकडून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले दूध संकलनाचे काम अचानक थांबविण्यात आल्याने दूध उत्पादकांची गोची झाली आहे. शेतीपूरक उद्योगांना प्रोत्साहन देण्याची वल्गना करणाऱ्या शासनाचे दुटप्पी धोरण या माध्यमातून स्पष्ट झाल्याचा आरोप या पार्श्‍वभूमीवर दुग्ध उत्पादकांनी केला आहे.

वाशीम जिल्ह्याचे एकूण सरासरी दुग्धोत्पादन दरदिवशी १० हजार लिटरच्या घरात आहे. यातील अर्धेअधिक दूध हे संघाच्या माध्यमातून शासकीय दुग्ध योजनेला पोचविण्यावर शेतकऱ्यांचा भर राहतो. मध्यंतरी जनावरांपासून दूध मिळणे कमी झाले.

उन्हाचा वाढता पारा, हिरव्या चाऱ्याची अत्यल्प उपलब्धता व इतर अनेक कारणे यामागे होती. त्यामुळे वाशीम येथील शासकीय शीतकरण केंद्राला पुरेशा दुधाचा पुरवठा होत नव्हता. या ठिकाणी एका कर्मचाऱ्याची नियुक्‍ती करण्यात आली आहे. परंतु दूध संकलन कमी झाल्याने मे २०१७ पासून या केंद्रावर दूध घेणे बंद करण्यात आले.

शासकीय शीतकरण केंद्राकडून अशाप्रकारे दूध खरेदीस नकार दिला जात असल्याने खासगी व्यवसायिकांकडून जिल्ह्यात दुधाचे दर पाडण्यात आले. त्यामुळे दुग्धोत्पादक संस्था तसेच शेतकऱ्यांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील एकमेव शीतकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची होती. त्यासाठी त्यांनी वाशीम जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, खासदार भावना गवळी, पालकमंत्री संजय राठोड, आमदार राजेंद्र पाटणी यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींना निवेदन दिले. परंतु त्याचा काही उपयोग झाला नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. जिल्ह्यातील एकूण दूध संकलन १० हजार लिटर असून, त्यातील साडेचार ते पाच हजार लिटर दुधाचा पुरवठा शासकीय दुग्ध योजनेला होतो.

पोलिसांकडून होते अडवणूक
वाशीम येथील शासकीय शीतकरण केंद्र बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपले दूध विक्रीसाठी १०० किलोमीटर अंतरावरील अकोला येथे आणावे लागत आहे. रविवारी (ता. २४) रिसोड येथील शेतकरी मनोज जाधव हे छोट्या मालवाहू वाहनाने अकोल्यात दूध घेऊन पोचले. या वेळी उमेश इंगळे नामक वाहतूक पोलिस शिपायाने त्यांचे वाहन अडविले. वाहनात नाशवंत दूध असल्याचे सांगितल्यावरदेखील उमेश इंगळे यांनी त्यांच्यावर एक हजार रुपयांच्या दंडात्मक कारवाईची धमकी दिली. पोलिस निरीक्षक विलास पाटील यांना अखेरीस शेतकऱ्याने विनवणी केल्यानंतर २०० रुपयांची दंडात्मक कारवाई झाली. अशा प्रकारे पोलिसांकडून शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे.

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात गवार, भेंडी, चवळीच्या दरात अल्प...पुणे : गुलटेकडी येथील बाजार समितीमध्ये रविवारी (...
मृदा आरोग्य पत्रिकावाटपात पुणे आघाडीवरपुणे : शेतकऱ्यांना जमिनीत असलेल्या अन्नद्रव्याचे...
बदलत्या वातावरणामुळे ब्रॉयलर्स मार्केट... मागणी आणि पुरवठ्यातील संतुलनामुळे अंडी आणि...
कर्जमाफीच्या यादीची दुरुस्ती सुरूचजळगाव : कर्जमाफीच्या कार्यवाहीबाबत रोजच नवीन...
एकात्मिक पीक पद्धतीत रेशीमचे स्थान अढळजालना : रेशीम उद्योगातील देशांतर्गत संधी पाहता...
शेळीपालनात शास्त्रोक्‍त पद्धतीकडे वळाजालना : शेळीपालनाला आता गोट फार्म असे आधुनिक नाव...
मक्यावरील करपा रोगाच्या जनुकांचा घेतला...मक्यावरील करपा रोगाला प्रतिकार करणाऱ्या जनुकांचा...
वृद्धापकाळातील नाजूकपणा कमी करण्यात...मध्य पूर्वेतील देशांप्रमाणे फळे, भाज्या,...
बुलडाणा जिल्ह्यात जमिनीचे आरोग्य बिघडलेबुलडाणा : विदर्भ-मराठवाडा-खानदेशला जोडणाऱ्या...
मोहराने बहरल्या काजूच्या बागासिंधुदुर्ग : डिसेंबरच्या शेवटच्या सप्ताहातील...
पुणे जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ६६४१ कामे... पुणे ः भूजलपातळी वाढविण्याच्या उद्देशाने राज्य...
सातारा जिल्ह्यात रब्बीची १०१ टक्के पेरणी सातारा ः जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांची...
डाळिंबाला द्या काटेकोर पाणीडाळिंब या पिकाला पाण्याची गरज ही मुळातच खूप कमी...
सरकारला शेतकऱ्यांची नाही, उद्योगपतींची...सातारा : कृषी प्रधान देशात २२ वर्षांत १२ लाख...
माथाडी मंडळे बंद करणे हा आत्मघाती प्रकार पुणे : असंघटित कामगारांची संख्या दिवसेंदिवस...
नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्पावरुन...मुंबई : नाणार (ता. राजापूर) येथील प्रस्तावित हरित...
थकीत ‘एफआरपी’ची रक्कम तत्काळ द्या :...पुणे : थकीत एफआरपीची रक्कम तत्काळ देणे, को २६५...
‘महाबीज’च्या निवडणुकीत खासदार संजय...अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या...
अधिक पाण्यामुळे द्राक्ष घडनिर्मितीवर...द्राक्ष वेलीपासून चांगल्या प्रतीच्या...
अतिरिक्त पाण्यामुळे उसाची प्रतिकारशक्ती... अधिक पाण्यामुळे जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण...