agriculture news in marathi, milk producers in financial crisis | Agrowon

संघ तोट्यात असतानाच दूध उत्पादकांची आठवण
राजकुमार चौगुले
गुरुवार, 11 जानेवारी 2018

कोल्हापूर : राज्याच्या विविध भागांत जसे साखर कारखान्यांवर राजकारण चालते. अगदी तसाच प्रकार दूध संघांच्या बाबतीतही आहे. दूध संघाच्या माध्यमातून लाखो दूध उत्पादक या संघाच्या माध्यमातून जोडले जात आहेत. पण अलीकडचा एक दोन वर्षांच्या कालावधी लक्षात घेतल्यास अनेक दूध संघांना तोट्यात असतानाच दूध उत्पादकांची आठवण येते. इतर वेळी मात्र त्याच्या समस्येकडे लक्ष दिले जात नाही ही वस्तुस्थिती आहे.

कोल्हापूर : राज्याच्या विविध भागांत जसे साखर कारखान्यांवर राजकारण चालते. अगदी तसाच प्रकार दूध संघांच्या बाबतीतही आहे. दूध संघाच्या माध्यमातून लाखो दूध उत्पादक या संघाच्या माध्यमातून जोडले जात आहेत. पण अलीकडचा एक दोन वर्षांच्या कालावधी लक्षात घेतल्यास अनेक दूध संघांना तोट्यात असतानाच दूध उत्पादकांची आठवण येते. इतर वेळी मात्र त्याच्या समस्येकडे लक्ष दिले जात नाही ही वस्तुस्थिती आहे.

...तेव्हा पर्याय का नाही
दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी हे बहुतांशी करून अल्पभूधारक आहेत. अनेकांचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर चालतो. यामुळे आठवड्याच्या नियोजनातून काही रक्कम जरी कमी आली तरी त्याचा थेट परिणाम घराचे आर्थिक नियोजन कोलमडल्यावर होत असतो. अनेक संघ पशुखाद्याची शिफारस करतात दर मात्र संघाच्या नफ्यानुसार ठेवतात. बहुतांशी नामवंत संघांचे पशुखाद्य कारखाने आहेत. पशुखाद्य करताना लागणाऱ्या कच्च्या मालाचा दर वाढू लागताच त्याचा तातडीचा परिणाम पशुखाद्याच्या किंमती वाढण्यावर होतो. मात्र ही वाढ हळूच उत्पादकांवर लादली जाते. पशुखाद्याच्या किंमती वाढल्या म्हणून कोणताही संघ आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे दिसत नाही. अथवा किंमती वाढल्या तरी उत्पादकांना तोटा होऊ नये म्हणून खास योजना राबविल्याचेही कुठे दिसत नाही. पशुखाद्याचा खर्च दुधातून वळता होत असल्याने शेतकऱ्याला वाढलेला खर्च कळत नाही तो नुकसानीत जातो, अशी परिस्थिती आहे.

गोठ्यांच्या संख्येत घट चिंतेची
गेल्या चार ते पाच वर्षांचा विशेष करून पश्‍चिम महाराष्ट्राचा आढावा घेतल्यास अनेक गोठा व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात जनावरांचे व्यवस्थापन करणे कमी केले आहे. यामुळे मातब्बर दूध संघांच्या आगारातच अनेक व्यावसायिकांनी एक तर गोठे बंद केले. अथवा जनावरांची कमी केली. जे व्यावसायिक पूणपणे बाहेरील मनुष्यबळावर अवलंबून आहेत त्यांना तर मनुष्यबळ नसल्यानेच गोठे बंद करावे लागले. तर उर्वरित गोठे दर नसल्याने बंद झाले आहेत. ज्या गोठ्यांच्या मालकांनी स्वत:ची अशी स्वतंत्र विक्री व्यवस्था करून फायदा मिळविला. अथवा जनावरांची खरेदी विक्री हा हेतू ठेवून गोठा चालविला आहे. फक्त दूध संघाला दूध पुरवठा करून हा व्यवसाय फायद्यात असलले गोठे क्वचित असल्याचे चित्र या भागात आहे. अशा परिस्थितीमुळे लाखो रुपये गुंतवून पूर्णपणे व्यावसायिक स्वरुपात गोठे निर्माण होण्याचे काम लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. याचे मुख्य कारण दुधाला दर नसणे, उत्पादनखर्चापेक्षा दुधाला मिळणारी किंमत आणि वर्षानुवर्षे तोटा झाल्याने नाइलाजास्तव हा व्यवसायच बंद करण्यात होत आहे. उत्पादकाला केंद्रसस्थानी ठेवून धोरण निश्‍चिती न झाल्यास भविष्यात शेतकऱ्यांचा हा जोडधंदा आणखी तोट्यात जाण्याची भीती उत्पादकांतून व्यक्त होत आहे.

उत्पादकांच्या खांद्यावर बंदूक नको
आंतरराष्ट्रीय बाजारात गोंधळ निर्माण झाला. दुधाचे उत्पादन वाढले, पावडरीचे दर कोसळले की कोणत्याही क्षणी दूध खरेदीच्या दरात दणकन कपात होते. जो तो संघ ज्याच्या त्याच्या परिस्थितीप्रमाणे खरेदीच्या दूधदरात कपात करतो. दूध संघ कसा तोट्यात जातो याबाबतच्या चर्चा सुरू होतात. उत्पादकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकारशी लढा दिला जातो. अशावेळीच दूध उत्पादकांच्या तोट्याला महत्त्व दिले जात असल्याचा आरोप सिद्धनेली येथील पांडूरंग काकडे यांनी केला. दूध संघ कसा तोट्यात आहे. हेच आम्हाला सांगितले जाते. पण आम्ही वर्षानुवर्षे तोट्यात आहोत याचे काय, असा सवाल काकडे यांचा आहे.

इतर अॅग्रो विशेष
आरोग्यदायी आहार हेच हवे लक्ष्य!पहिले आणि दुसरे महायुद्ध संपले, यामध्ये...
तापलेलं ‘दूध’अनिश्‍चित अशा शेतीला शाश्वत मिळकतीची जोड म्हणून...
खडकवासला, कलमोडी धरण भरलेपुणे  : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाने...
दुधाचा भडका; सरकारची कोंडी पुणे  : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या...
दुधाचे टँकर बंदोबस्तात मुंबईकडे रवानानाशिक : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या...
कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात...पुणे: कोकण, मध्य महाराष्ट्राला सोमवारी (ता. १६)...
दूध आंदोलनाचे विधिमंडळातही पडसादनागपूर: दुधाला लिटरमागे प्रतिलिटर पाच रुपये...
बाजारपेठ ओळखून केळी बागेचे आदर्श नियोजनकठोरा (ता. जि. जळगाव) येथील पांडुरंग मोहन पाटील व...
एकात्मीक शेतीतून खुल्या झाल्या...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिह्यातील...
दूधदर प्रश्नी विधिमंडळ दणाणले; सभेत...नागपूर : राज्यात सुरु असलेल्या दूध दर आंदोलनाचे...
दूध आंदोलन तापले, बहुतांश जिल्ह्यात...पुणे : शेतकऱ्यांना प्रति लिटर थेट पाच रुपये...
कोल्हापूरात दूध संकलन १०० टक्के बंद ! कोल्हापूर- गायीच्या दूधाला प्रतिलिटर पाच...
आंतरराष्ट्रीय सुबाभूळ परिषदेच्या...पोषण हा पशुपालनातील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे....
चिंब झाली रान माती...कमी पाऊसमानानंतर उद्भवणारी पाणीटंचाई आणि दुष्काळी...
आंदोलन होणारचकोल्हापूर/ पुणे : अनेक दूध संघ अगोदरच गायीच्या...
काेकण, विदर्भात तुरळक ठिकाणी...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र...
साखर कारखान्यांकडे १२ हजार कोटींची...लखनौ ः उत्तर प्रदेशात २०१७-१८ च्या हंगामात...
संघांकडून दूध दरात तीन रुपयांची वाढपुणे ः दूध दरावर ताेडगा काढण्यासाठी राज्य सरकारने...
पीककर्ज वितरण केवळ ३० टक्केचपुणे : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपात दिरंगाई...
सेंद्रिय भातशेतीसोबतच राबविली थेट...पुणे जिल्ह्यातील भोयरे (ता. मावळ) येथील रोहिदास...