agriculture news in marathi, Milk producers suffer by reduced rate | Agrowon

दूध उत्पादकांना दरकपातीची झळ
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 16 नोव्हेंबर 2017


दूध दरकपात ही दूध उत्पादकांसाठी नुकसानीची ठरत आहे. दूध खरेदी दर कमी केले, पण त्यांचे विक्री दर जसे होते तसेच आहेत. दूध उत्पादन वाढलेले नाही. चुकीची माहिती सांगून नफा वाढवून घेण्याचा प्रयत्न खरेदीदार करीत असून, उत्पादकांची अडवणूक सुरू आहे.
- एस. बी. पाटील, शेतकरी सुकाणू समिती, चोपडा

जळगाव : सहकारी दूध संघाने दुधाच्या खरेदी दरात कपात केल्यानंतर गावोगावी जाऊन दूध खरेदी करणाऱ्या खासगी दूध व्यावसायिकांनीदेखील खरेदी दरात कपात केली आहे. गायीच्या दुधाच्या दरात एक लिटरमागे दोन रुपये आणि म्हशीच्या दूधदरात प्रतिलिटर तीन रुपये, अशी कपात लादली आहे. या खासगी दूध उत्पादकांच्या निर्णयाचा फटका दूध उत्पादकांना बसला असून, पशुखाद्य, चारा आणि दूध उत्पादन, उत्पन्न याचा सगळा ताळमेळच चुकला आहे.

दूध संघाने या महिन्याच्या सुरवातीला दुधाचे खरेदी दर प्रतिलिटर तीन रुपयांनी कमी केले. गायीच्या दुधाचे दर प्रतिलिटर 24 रुपये केले, तर म्हशीच्या दुधाचे दर 33 रुपये प्रतिलिटर केले. यानंतर जवळपास आठ ते 10 दिवसांनी गावोगावी जाऊन दूध उत्पादकांकडून दूध खरेदी करणाऱ्या खासगी दूध व्यावसायिक, डेअरीचालक किंवा खरेदीदारांनीदेखील दूधदरात कपात केली. खासगी खरेदीदारांकडून म्हशीच्या दुधाला 30 ते 32 रुपये प्रतिलिटर आणि गायीच्या दुधाला 19 ते 20 रुपये प्रतिलिटर दर दिला जात असल्याची माहिती एका दूध उत्पादकाने दिली. दुसऱ्या बाजूला सरकी ढेप किंवा इतर पशुखाद्याचे दर कमी झालेले नाहीत.

चारा यंदा हवा तसा नाही. दूध काढणे, त्याचे संकलन यासाठी दूध उत्पादकाला श्रम करून ते खासगी दूध खरेदीदाराला द्यावे लागते. ज्या गावात सहकारी दूध डेअरी व्यवस्थित कार्यरत आहे त्या गावात फारशा अडचणी नाहीत. परंतु जेथे सहकारी संस्थेचे अस्तित्व नाही त्या गावात तर खासगी डेअरीचालक मनमानी करून दूध उत्पादकांची नाडवणूक करीत आहेत. जे खासगी डेअरीचालक किंवा खरेदीदार दूध काढण्याची जबाबदारी घेतात, त्यांचे दर आणखीच कमी आहेत. अर्थातच दूध उत्पादकाकडून ते दूध काढण्याची मजुरीदेखील अप्रत्यक्षपणे वसूल करतात.

दूध उत्पादकांना आर्थिक झळ सोसावी लागत असून, ते दूध संघ किंवा इतर खरेदीदारांनी आपले इतर बाबींवरील खर्च कमी करावेत, पण दूध उत्पादकांना जे दर आहेत तेच दिले जावेत, अशी अपेक्षा दूध उत्पादकांनी व्यक्त केली आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर  : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...
सांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली  ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...
औरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद  : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...
नगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर  ः कृषी विभागाच्या विविध योजना...
धुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव  ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...
सातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा  : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...
साताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा  : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...
साखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...
जालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...
तंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...
ग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला  : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...
जमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी  ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...
नाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक  : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...
मोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...
संत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...
पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...
पुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...
साताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...
साखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर  : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...