agriculture news in marathi, milk production faces problems in buldana district | Agrowon

बुलडाणा जिल्ह्यात दुग्धोत्पादनाला घरघर
टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 एप्रिल 2018

बुलडाणा : शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्धोत्पादनाची शिफारस केली जाते. परंतु जिल्ह्यात विविध कारणांनी दुग्धोत्पादन करणाऱ्या सहकारी संस्था एक एक करीत अवसायनात निघत आहेत. स्थापन झालेल्या ५८० संस्थांपैकी तब्बल ५०८ संस्था अवसायनात निघाल्याची वस्तुस्थिती असून, जिल्ह्यात शासकीय व खासगी मिळून केवळ ३० हजार लिटर दूध संकलन केले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांची दुधाची गरज मराठवाडा, खानदेशातून येणाऱ्या खासगी डेअरीच्या पाकीटबंद दुधावर भागवली जात आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात साडेसहा लाख लिटर दुग्धोत्पादन होत असल्याची आकडेवारी प्रशासनाकडून दिली जाते. 

बुलडाणा : शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्धोत्पादनाची शिफारस केली जाते. परंतु जिल्ह्यात विविध कारणांनी दुग्धोत्पादन करणाऱ्या सहकारी संस्था एक एक करीत अवसायनात निघत आहेत. स्थापन झालेल्या ५८० संस्थांपैकी तब्बल ५०८ संस्था अवसायनात निघाल्याची वस्तुस्थिती असून, जिल्ह्यात शासकीय व खासगी मिळून केवळ ३० हजार लिटर दूध संकलन केले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांची दुधाची गरज मराठवाडा, खानदेशातून येणाऱ्या खासगी डेअरीच्या पाकीटबंद दुधावर भागवली जात आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात साडेसहा लाख लिटर दुग्धोत्पादन होत असल्याची आकडेवारी प्रशासनाकडून दिली जाते. 

वऱ्हाडात बुलडाणा जिल्हा हा विस्ताराने व लोकसंख्येने मोठा जिल्हा आहे. शेतकरी आत्महत्यांमध्ये यवतमाळनंतर दुर्दैवाने बुलडाण्याचा क्रमांक लागतो. या जिल्ह्यात सुरवातीपासून दुग्धोत्पादनाची चळवळ आहे. परंतु शासकीय अनास्था व इतर कारणांनी सहकारी संस्थांचे पार वाटोळे होत चालले आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय दुग्धविकास मंडळासह मदर डेअरीसुद्धा काम करीत आहे. परंतु या दोघांचेही तितकेसे परिणाम अद्याप पुढे आलेले नाहीत.

जिल्ह्यात सुमारे ४० वर्षांपासून शासकीय दूध योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. या योजनेअंतर्गत मोताळा, चिखली, नांदुरा या ठिकाणी दूध शीतकरण यंत्रणा उभी केली गेली. काही वर्षे या ठिकाणी चांगले संकलन व प्रक्रिया झाली. पुढील काळात टप्प्याटप्प्याने नांदुरा, मोताळा ही शीतकरण केंद्रे गुंडाळली गेली. सध्या केवळ चिखली केंद्र सुरू असून तेथे नावापुरते म्हणजे केवळ दीड हजार लिटर दूध संकलन होत आहे. 
शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्धोत्पादनाला चालना देण्यासाठी भरमसाठ योजना आल्या. पंतप्रधान पॅकेज, मुख्यमंत्री पॅकेज, एकात्मिक दुग्ध विकास प्रकल्प, विदर्भ विकास पॅकेज, एकात्मिक दुग्ध विकास डेअरी फार्म प्रकल्प, आत्मातून पाठबळ अशा एक ना अनेक योजना पाठबळ देण्यासाठी सुरू झाल्या. एवढे करूनही दुग्धोत्पादनाचे आकडे व संकलन काही वाढलेले नाहीत. दरवर्षी हा आकडा घसरत चालला आहे. सध्या जिल्ह्यात केवळ ७२ संस्था सुरू आहेत. 

इतर ताज्या घडामोडी
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...