agriculture news in marathi, milk rate and grant issue, bhandara, maharashtra | Agrowon

भंडारा दूध संघाची दर, अनुदानाच्या आदेशाला हरकत
टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

शासनाने दूध दरवाढीसंदर्भाने काढलेल्या आदेशात अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे या आदेशाचा पुनर्विचार करावा असा ठराव आमच्या संघाने घेतला आहे.
- रामलाल चौधरी, अध्यक्ष,भंडारा जिल्हा दुग्ध संघ
 

भंडारा   ः दूध दर आणि अनुदानासंदर्भाने असलेल्या शासन आदेशात केवळ गाईच्या दुधाचाच विचार करण्यात आला आहे. म्हशीच्या दुधाबाबत यात कोणतीच भूमिका नाही, त्यासोबतच इतरही अनेक त्रुटी या आदेशात असल्याने या आदेशात सुधारणा करण्यात यावी, असा ठराव भंडारा जिल्हा संघाने घेतला आहे, अशी माहिती माहिती संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी यांनी दिली.

भंडारा जिल्हा दुग्ध संघाचे संकलन सुमारे ६० हजार लिटर आहे. त्यामध्ये म्हशीच्या दुधाचे प्रमाण २० हजार लिटर आहे. यापूर्वी शासनाने गाईच्या दुधाकरिता २७ तर म्हशीच्या दुधाकरिता ३६ रुपये दर निश्‍चित केला होता. आता मात्र गाईच्या दुधाकरिता २५ रुपये दर ठरविण्यात आला आहे. परंतु म्हशीच्या दुधाकरिता तरतूदच करण्यात आली नाही. त्यासोबतच संघाने दुग्ध उत्पादकांच्या खात्यात रोज रक्‍कम जमा करावी, असे आदेशित आहेत.

परंतु अनेक दुग्धोत्पादकांच्या गावानजीक बॅंकेची सुविधाच नाही. काही दुग्ध उत्पादक केवळ एक ते दोन लिटरच दूध संघाकडे घालतात. अशांकरिता कॅशलेश व्यवहार शक्‍य होणार नाही. शिल्लक दुधाच्या निर्यातीचेही नव्या आदेशात म्हटले आहे. परंतु विदर्भातील दूध   संघांना हे शक्‍य नाही. परिणमी शासन आदेशातील या त्रुटींची दखल घेत भंडारा दूध संघाने आपल्या संचालक व सदस्यांची बैठक घेतली. त्यात शासनाने आदेशातील त्रुटी दूर करण्याचा ठराव घेण्यात आला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी नागपूर विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था संजय क्षीरसागर होते. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी नीलेश बंड यांची या वेळी उपस्थिती होती.

वाढीव दर अद्यापही मिळेना
शासनाने गाईच्या दुधाला २५ रुपये लिटरचा दर जाहीर केला असला तरी पूर्व विदर्भात दूध उत्पादनात आघाडीवर असलेल्या भंडारा जिल्ह्यातील दुग्धोत्पादकांकडून अद्यापही या दराने दुधाची खरेदी सुरू झाली नसल्याचे सांगण्यात आले. नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर शेतकऱ्यांनी ही माहिती दिली. त्यानुसार शासनाकडून गाईच्या दुधाकरिता खरेदीदर २५ रुपये प्रतिलिटरचा जाहीर केला गेला आहे. परंतु असा दर अद्यापही दिला गेलेला नाही.

इतर ताज्या घडामोडी
सांगली बाजार समितीत गूळ सरासरी ३४२५...सांगली : येथील बाजार समितीत गुळाची आवक वाढली आहे...
भातावरील लष्करी अळीचे नियंत्रणभात हे राज्यातील कोकण आणि पूर्व विदर्भातील मुख्य...
फळपीक व्यवस्थापन सल्लाअंजीर ः १) जमिनीपासून तीन फुटापर्यंत एकच खोड...
पुणे जिल्ह्यातील नद्या दुथडी, धरणांतून...पुणे : जिल्ह्यात सोमवारपासून सुरू झालेल्या...
मराठवाड्यात ८५ मंडळांत पावसाचे धूमशानऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८५ मंडळांत पावसाने...
नगर जिल्ह्यामध्ये बहुतांश भागात पावसाची...नगर ः नगर जिल्ह्याच्या बहुतांश भागात सोमवार...
वरखेडे-लोंढे बॅरेजला `नाबार्ड`चा...चाळीसगाव, जि. जळगाव : चाळीसगाव व भडगाव तालुक्‍...
नाशिक जिल्ह्यातील ४० वाळू घाट होणार बंदनाशिक  : वाळू घाटावरील प्रदूषण रोखण्यासाठी...
चोपडा, जळगावातून केळीचा पुरवठा वाढलाजळगाव ः जिल्ह्यात मागील आठवड्यात केळीच्या दरात...
नगरमध्ये मूग ५७६० रुपये प्रतिक्विंटलनगर ः खरिपातील मुगाचे पीक हाती आले असल्याने नगर...
केळी पीक सल्लासद्यःस्थितीत नवीन मृगबागेची केळी प्राथमिक...
सोलापुरात भाज्या वधारल्या सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हळद पिकातील कीड नियंत्रणसध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
कर्बोदके, प्रथिनांचा उत्तम स्राेत ः...प्रथिनांसाठी कडधान्य हे समीकरण जसे सर्वश्रुत आहे...
नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पाऊसनाशिक : दुष्काळाच्या सावटाखाली सापडलेल्या मालेगाव...
इजिप्तमध्ये आढळले सर्वात जुने चीजचीज जितके जुने, तितके अधिक चांगले असे समजले जाते...
खनिज तेल उत्पादनासाठी पाणी खराब...अमेरिकेतील नैसर्गिक वायू आणि तेल उत्पादक...
निवडून येण्याची क्षमता असलेल्या...पुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात उमेदवार...
पुणे जिल्हा बॅंकेकडून ६४ टक्के पीककर्ज...पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने एक...
समविचारी पक्षांशी युती करून निवडणूक...भंडारा  ः केंद्र आणि राज्यातील सरकारकडून...