agriculture news in marathi, milk rate gr published, Maharashtra | Agrowon

दूध दराबाबतचे हमीपत्र देणे बंधनकारक
टीम अॅग्रोवन
रविवार, 22 जुलै 2018

पुणे  ः दूधदरप्रश्‍नी शासनाने जाहीर केलेल्या २५ रुपये प्रतिलिटर दूध खरेदी दर घाेषणेच्या अंंमलबजावणीचा शासन आदेश प्रसिद्ध झाला आहे. शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी २५ रुपये दर देणाऱ्या दूध संघांना शासन ५ रुपये अनुदान देणार आहे. या आदेशानुसार दूध भुकटी निर्यातीसाठी प्रतिकिलो ५० रुपये आणि दुधाची निर्यात करणाऱ्या प्रकल्पांना ५ रुपये प्रतिलिटर अनुदान मिळणार आहे. या याेजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या दूध संघांना दूध खरेदी दराबाबतचे हमीपत्र प्रादेशिक दुग्ध विकास अधिकाऱ्यांकडे सादर करावे लागणार आहे. 

पुणे  ः दूधदरप्रश्‍नी शासनाने जाहीर केलेल्या २५ रुपये प्रतिलिटर दूध खरेदी दर घाेषणेच्या अंंमलबजावणीचा शासन आदेश प्रसिद्ध झाला आहे. शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी २५ रुपये दर देणाऱ्या दूध संघांना शासन ५ रुपये अनुदान देणार आहे. या आदेशानुसार दूध भुकटी निर्यातीसाठी प्रतिकिलो ५० रुपये आणि दुधाची निर्यात करणाऱ्या प्रकल्पांना ५ रुपये प्रतिलिटर अनुदान मिळणार आहे. या याेजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या दूध संघांना दूध खरेदी दराबाबतचे हमीपत्र प्रादेशिक दुग्ध विकास अधिकाऱ्यांकडे सादर करावे लागणार आहे. 

हा दर आज शनिवार (ता. २१) पासून शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर थेट जमा करणे बंधनकारक असणार आहे. तर शालेय पाेषण आहारात दुधाच्या समावेशाबाबतचा शासन निर्णय संबंधित विभागाने काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शालेय पाेषण आहारात दुधाचा समावेश 
विविध उपाययाेजनांमध्ये शालेय पाेषण आहारात दुधाचा समावेश करण्यासाठी शालेय शिक्षण, महिला बाल कल्याण, आदिवासी, सामाजिक न्याय आणि सार्वजनिक आराेग्य विभागाने स्वतंत्र शासन निर्णय काढावेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

या आहेत अटी

  • सहकारी व खासगी दूध संस्थानी उत्पादित केलेल्या पिशवी बंद दुधासाठी अनुदान देय राहणार नाही.
  • दरराेज १० हजार लिटरपेक्षा कमी दुधाची हाताळणी करणाऱ्या संस्थांना याेजनेत सहभागी हाेता येणार नाही.
  • हे अनुदान दूधपुरवठा करणारी संस्था किंवा रुपांतरण करणारी संस्था यापैकी एका संस्थेस अनुज्ञेय राहील.
  • जे दूध भुकटी उत्पादक पाच रुपये प्रतिलिटरप्रमाणे अनुदानाचा लाभ घेतील, त्यांना दूध व भुकटी निर्यात अनुदानाचा लाभ मिळणार नाही.
  • निर्यात अनुदान अागामी तीन महिन्यांपुरताच असणार असून, याेजनेच्या प्रतिसादावर मुदतवाढीचा स्वंतत्र निर्णय घेतला जाणार आहे.
  • संघांनी अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करणे बंधनकारक आहे.
  • सहभागी संघांना जून २०१८ अखेरीचा पिशवी बंद दुधाचे वितरण आणि अतिरिक्त दुधाचा तपशील सादर करावा लागणार आहे.
  • अतिरिक्त दूध रूपांतरणाचा अहवाल जिल्हा दुग्ध विकास अधिकाऱ्यांकडे सादर केल्यानंतर, प्रादेशिक दुग्ध व्यवसाय अधिकारी आणि दुग्धव्यवसाय आयुक्तांकडून मान्यतेनंतर अनुदान दिले जाणार.
  • अनुदान घेताना शासनाची फसवणूक करणाऱ्या संघांकडून अनुदानाची रक्क्म व्याजासह वसूल हाेणार.

इतर अॅग्रो विशेष
वासंतीकरणाच्या प्रक्रियेतील तापमानाचे...वसंताच्या आगमनामुळे प्रत्येक वनस्पती किंवा...
मराठवाड्यात ‘रेशीम’ला रिक्त पदांचे...औरंगाबाद ः राज्याला रेशीम उद्योगात उदयोन्मुख...
खानदेशात पपई लागवडीत होणार निम्म्याने...जळगाव : खानदेशात आगाप पपई लागवडीला सुरवात झाली...
रशियाला द्राक्ष निर्यातीत ‘क्लिअरिंग’चा...नाशिक : भारतीय द्राक्षाचा रशिया मोठा आयातदार आहे...
वादळी पाऊस, गारपिटीचा तडाखापुणे ः अकोला जिल्ह्यातील देवरी (ता. अकोट),...
लाल वादळ मुंबईकडे झेपावलेनाशिक : गेल्या वर्षभरापासून आश्‍वासन देऊनही...
शेतकरी प्रतिनिधींची ऊस दर नियंत्रण मंडळ...पुणे: ऊसदर नियंत्रण मंडळाच्या बैठकीत शेतकरी...
जलसंधारण विभागाच्या आकृतिबंधास मान्यतामुंबई: नागपूर व पुणे येथे अपर आयुक्त तथा मुख्य...
नाणार भूसंपादनाची अधिसूचना रद्द करणारः...मुंबई: नाणार येथील प्रस्तावित ग्रीन रिफायनरी...
सुपीक जमीन, नियोजनातून वाढविली...हणमंतवडिये (ता. कडेगाव, जि. सांगली) येथील राहुल...
शेडनेट, रेशीमशेती, भाजीपाला लागवडीतून...विडूळ (ता. उमरखेड, जि. यवतमाळ) येथील सदानंद...
नाशिकच्या धरणांत अवघा ४५ टक्के जलसाठानाशिक : यंदा कमी झालेल्या पावसामुळे धरणातील...
शेतीसह शिक्षणाबाबतही जागरूक सावखेडाखुर्दसावखेडा खुर्द (ता. जि. जळगाव) या बागायती...
वाहतूक शुल्कासाठी प्रमाणपत्राची अट नको...पुणे : निर्यातीचा कोटा पूर्ण करणाऱ्या साखर...
राष्ट्रीय जल पुरस्कारांत महाराष्ट्र...मुंबई : राज्यातील जलयुक्त शिवार अभियानमध्ये...
बांबू उद्योगात भारताला स्वयंपूर्ण...मुंबई: कागद, कागदाचा लगदा, वस्त्र या विविध...
लाँग मार्च पोलिसांनी रोखला; आज कूच...नाशिक: मागील वर्षी मार्च महिन्यात अखिल भारतीय...
चटका वाढल्याने उन्हाळ्याची चाहूलपुणे : राज्यातील थंडी कमी होऊन उन्हाचा चटका...
निविष्ठांबाबत शासन कठोर: चंद्रकांत...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना खते, बियाणे,...
हमीभावाने कापूस खरेदीत केंद्राचा हात...जळगाव ः कापूस बाजारात हवी तशी तेजी नसल्याचे...