agriculture news in marathi, milk rate issue, pune, maharashtra | Agrowon

दूध दर पाडणाऱ्यांवर कारवाईची मागणी करणार : सदाभाऊ खोत
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 5 जून 2018

पुणे ः आघाडी सरकारमधील वजनदार नेत्यांच्या खासगी दूध डेअरी आहेत. त्यांनी अतिरिक्त दुधाचा बागुलबुवा निर्माण करून काही खासगी आणि सहकारी दूध संघांना हातीशी धरून दुधाचे दर पाडले आहेत. त्याची सगळी माहिती संकलित केली आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री आणि दुग्धविकासमंत्र्यांना सादर करणार असून, या संघांवर कारवाई करण्याची मागणीदेखील करणार आहे, अशी माहिती कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खाेत यांनी दिली. या संघाची मुजाेरी माेडीत काढण्यासाठी अमूलला राज्यात दूध संकलनासाठी परवानगीबराेबरच सरकारी दूध डेअरी भाडेतत्त्वावर देण्याचा विचार आहे, असेही या वेळी त्यांनी सांगितले.

पुणे ः आघाडी सरकारमधील वजनदार नेत्यांच्या खासगी दूध डेअरी आहेत. त्यांनी अतिरिक्त दुधाचा बागुलबुवा निर्माण करून काही खासगी आणि सहकारी दूध संघांना हातीशी धरून दुधाचे दर पाडले आहेत. त्याची सगळी माहिती संकलित केली आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री आणि दुग्धविकासमंत्र्यांना सादर करणार असून, या संघांवर कारवाई करण्याची मागणीदेखील करणार आहे, अशी माहिती कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खाेत यांनी दिली. या संघाची मुजाेरी माेडीत काढण्यासाठी अमूलला राज्यात दूध संकलनासाठी परवानगीबराेबरच सरकारी दूध डेअरी भाडेतत्त्वावर देण्याचा विचार आहे, असेही या वेळी त्यांनी सांगितले.

सोमवारी (ता.४) राज्याच्या खरीप हंगाम आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मंत्री खाेत यांनी ही माहिती दिली. या वेळी खाेत म्हणाले, की सध्या गायीच्या दुधाची विक्री प्रतिलिटर ४० ते ४२ रुपयांनी हाेत आहे. दूध संकलन ते ग्राहकांपर्यंत पाेचविण्याच्या विविध टप्प्यांतील प्रक्रियेसाठी दूध संघाच्या नफ्यासह १४ रुपये खर्च हाेताे. हा खर्च वजा करता प्रतिलिटर २८ रुपये शिल्लक राहत असतानादेखील दूध संघ शेतकऱ्यांना दूध दर देत नाहीत. यामागे आघाडी सरकारमधील खासगी दूध डेअरी असलेल्या वजनदार नेत्यांचे षडयंत्र असून, त्यांनी काही खासगी आणि सहकारी संघांना हातीशी धरून अतिरिक्त दुधाचा बागुलबुवा उभा केला आहे. त्यांच्याबाबत कारवाई करण्यासाठी दाेन दिवसांत बैठक घेऊन सविस्तर अहवाल मुख्यमंत्री आणि दुग्धविकासमंत्र्यांना सादर करणार आहे.

तसेच खासगी दूध संघाची मक्तेदारी माेडून काढण्यासाठी प्रसंगी अमूलसारख्या चांगले दर देणाऱ्या दूध संघांना राज्यात दूध संकलनासाठीच्या परवानगीबराेबर सरकारी दूध डेअरी भाडेतत्त्वावर वापरण्यासाठी देण्याचा सरकारचा विचार अाहे. दुधाचे दर वाढवण्यासाठी पावडरीला अनुदान देण्याची मागणी दूधसंघांनी केली होती. ही मागणी मान्य करीत ३ रुपये प्रतिलीटर अनुदान देण्याची घोषणा सरकारने केली तरीही दूध दर न देणाऱ्या संघांवर कारवाई करण्यात येईल, असे खाेत यांनी या वेळी सांगितले.

स्वाभिमानी दूध संघाने अतिरिक्त दूध स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यांच्यावर कारवाई करणार का, या प्रश्‍नावर मंत्री खाेत यांनी नमस्कार करीत बाेलणे टाळले.

इतर ताज्या घडामोडी
खोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे   : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...
वाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...
नगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...
पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...
केळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव  ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...
बोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...
नगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर  ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...
जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली  : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...
आंब्यावरील मिजमाशी, शेंडा पोखरणाऱ्या...मिजमाशी प्रादुर्भाव कोवळ्या पालवीवर,...
फळपिके सल्लाकोणत्याही वनस्पतींच्या वाढीवर हवामानाचा कमी जास्त...
योग्य वेळी करा लसीकरणजनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न बघता...
धनगर समाजाचा उद्या औरंगाबादमध्ये धडक...औरंगाबाद : धनगर समाजाला एस.टी.(अनुसूचित जमाती)...
जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी माधवराव...मनमाड, जि. नाशिक : जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक,...
केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री अनंत...बंगळूर : केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री व दक्षिण...
ऊस दरप्रश्नी सोलापुरात ‘स्वाभिमानी’...सोलापूर  ः गेल्या गळीत हंगामातील उसाची...
दिवाळी संपूनही शासकीय कापूस खरेदीला...अकोला : या हंगामात लागवड केलेल्या बागायती तसेच...
ऊस दरासाठी सातारा जिल्ह्यात रास्ता रोकोसातारा  ः जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने...
थकीत एफआरपीच्या मागणीसाठी शिरोळ येथे...कोल्हापूर  : साखर कारखान्यांनी गेल्या...
ऊस दरप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे त्रिधारा...परभणी : मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी यंदाचे ऊस...
सांगलीत एकरकमी ‘एफआरपी’कडेगाव, जि सांगली  ः कोल्हापूर जिल्ह्याने...