agriculture news in Marathi, Milk rate reduce in state again, Maharashtra | Agrowon

राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरले
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

राज्यातील सर्व खासगी व सहकारी संघांनी दूध खरेदी वेळी शेतकऱ्यांना दिले जाणारे प्रतिलिटर पाच रुपये देणे थांबविले आहे. सरकारने जीआर न काढल्याने आधीच तोट्यात असलेले दुग्ध प्रकल्प अजून तोट्यात जाण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घ्यावा लागत आहे.
- विनायकराव पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघ
 

पुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या उत्पादनाला सरकारने दिलेला अनुदानाचा टेकू काढून घेतल्याने दुधाचे दर पुन्हा प्रतिलिटर १८ रुपयांपर्यंत घसरले आहेत. खासगी व सहकारी दूध संघांनी दरवाढ मागे घेतल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे, अशी माहिती दुग्ध उद्योगातील सूत्रांनी दिली. 

तीन महिन्यांपूर्वी दुधाचे दर घसरून १८ रुपयांपर्यंत गेले होते. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर शेतकऱ्यांना प्रतिलिटर २५ रुपये भाव देण्यासाठी शासनाने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले. मात्र, या योजनेची मुदत ३१ ऑक्टोबरला समाप्त झाली आहे. 

महाराष्ट्र दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी सांगितले की, "शासनाने राज्यभर केवळ ऑगस्ट ते ऑक्टोबरचे अनुदान जाहीर केले होते. त्यानुसार खासगी व सहकारी संघांनी शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये वाढीव दर दिला. मात्र, एक नोव्हेंबरपासून अनुदानाबाबत काय स्थिती राहील याविषयी शासनाने कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे खासगी व सहकारी संघांनी खरेदीदरात सरसकट कपात केली आहे." 

दरम्यान, राज्यात सर्वात जास्त दूध संकलन असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर दूध संघांनी खरेदीदरात कपात केली आहे. पुणे जिल्हा सहकारी दूध (कात्रज) संघाच्या एक नोव्हेंबरपासून प्रतिलिटर पाच रुपये सरकारी अनुदान देणे बंद करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. 

‘‘कात्रज संघाकडे शेतकऱ्यांकडून जादा दुधाचा अजूनही मोठ्या प्रमाणात पुरवठा होतो आहे. जादा दूध सरकारी महानंदा किंवा इतर मोठ्या संघांकडून स्वीकारले जात नाही. त्यामुळे अतिरिक्त दूध आम्हाला सोनाई किंवा पराग अशा खासगी डेअरी प्रकल्पांकडे वळवावे लागते. या डेअरीचालकांनी शासनाकडे प्रतिलिटर पाच रुपये अनुदानाचा परतावा मागितला आहे. तथापि, या डेअरीला दुधाचे पेमेंट शासनाकडे वेळेत मिळत नसल्याने कात्रज संघ आर्थिक अडचणीत आला. त्यामुळे दुधाचे खरेदी दर कमी करावे लागले," अशी माहिती संघाच्या सूत्रांनी दिली.

जळगाव जिल्हा सहकारी दूध संघ, कोपरगावच्या गोदावरी खोरे सहकारी दूध संघाने, इस्लामपूरच्या राजारामबापू पाटील सहकारी दूध संघाने देखील प्रतिलिटर पाच रुपये अनुदान एक नोव्हेंबरपासून स्थगित करण्यात आल्याचे घोषित केले आहे. 

शेतकऱ्यांच्या पदरात १५ रुपये पडतील
राज्यात शेतकऱ्यांच्या दुधाला प्रतिलिटर २५ रुपये देण्याची मूळ हेतू सरकारचा होता. मात्र, शेतकऱ्यांना सरासरी २३ रुपये दर मिळाला आहे. एसएनएफ आणि फॅटस् अशा मुद्दांमुळे शेतकऱ्यांची लूट झाली. आतादेखील राज्यभर १८ ते २० रुपये दर झाल्याचे सांगितले जात असले तरी एसएनएफ आणि फॅटसच्या निकषाखाली शेतकऱ्याच्या पदरात प्रतिलिटर १५ रुपये पडतील, असे सहकारी दूध संघांच्या सूत्रांनी स्पष्ट केले. 

तोडगा काढणे गरजेचे
राज्यात दुष्काळी स्थिती असल्यामुळे दुधाला अजून वाढीव अनुदान देण्याची गरज होती. तथापि, आहे त्याच अनुदानाचा टेकू काढून घेतल्यामुळे राज्यभर आता दुधाचे खरेदीदर कोसळले आहेत. ‘‘राज्यातील सर्व डेअरीचालक व सहकारी संघांनी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देणे थांबविले आहे. शासनाचा सुधारित जीआर न निघाल्यामुळे आता कोणीही तोटा सहन करून जादा दराने दूध कऱण्याच्या स्थितीत नाही. ही समस्या अजून उग्र होण्यापूर्वीच तोडगा काढला जावा,’’ असे महाराष्ट्र दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी सांगितले. 

इतर अॅग्रो विशेष
सरकारबी मदत करंना अन्‌ बॅंका कर्ज देईनातनांदेड ः गेल्या वर्षीबी अन्‌ औंदाबी पावसानं मारलं...
पाण्याअभावी संत्राबागा होताहेत सरपणपरभणी ः जिल्ह्यातील प्रमुख संत्रा उत्पादक गाव...
‘कृष्णा’ आली दिघंचीच्या अंगणीदिघंची, जि. सांगली ः  अनेक वर्षे दिवास्वप्न...
जनावरांच्या बाजारातील व्यवहार उधारीवरचपरभणी: खरिपाच्या पेरणीच्या तोंडावर काहीशी...
सहकार विभाग आयुक्तांविना पोरकापुणे : गेल्या आठ महिन्यांपासून राज्याच्या सहकार...
आत्मा प्रकल्प संचालक चौकशीत दोषीपुणे: कृषी खात्यातील वादग्रस्त अधिकारी बी. एन....
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ‘व्होट शेअर’...पुणे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता...
खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवड सुरू जळगाव ः खानदेशात मुबलक जलसाठे किंवा कृत्रिम...
कोकण वगळता उष्ण लाटेचा इशारापुणे : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या...
शेतकऱ्यांनो विकते ते पिकवाः डॉ. भालेअकोला ः येत्या हंगामात पीक लागवड करताना...
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
हरवले जलभान कोनाड्यात‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’...
मोदी लाटेचे गारुडसतराव्या लोकसभेचे भवितव्य स्पष्ट झालेले आहे. खरे...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक...गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये हुमणी अळीचा...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...