एसटी बसमधून दूध वाहतुकीचा मार्ग मोकळा
एसटी बसमधून दूध वाहतुकीचा मार्ग मोकळा

एसटी बसमधून दूध वाहतुकीचा मार्ग मोकळा

नागपूर : राज्यातील दूध उत्पादक शेतकरी व ग्राहक यांच्या दुग्धजन्य नाशवंत पदार्थांच्या एसटी बसमधील वाहतुकीवर निर्बंध आल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. हे रोखण्याच्या दृष्टीने दूध उत्पादक शेतकरी व ग्राहक यांना ५० किलोग्रॅमपर्यंतची वाहतूक नि:शुल्क करण्यास, तसेच दुग्धजन्य पदार्थांच्या व्यावसायिक उत्पादकांनासुद्धा विहित नियमानुसार वेष्टण करून मालवाहतूक करण्याची अनुमती देण्यात आली आहे, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी विधानसभेत एका निवेदनाद्वारे दिली.

सांगली येथील एसटी बस स्थानकावर पार्सल परवानाधारकाच्या कार्यालयात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तपासणीदरम्यान खवा, बर्फी इत्यादी दुग्धजन्य पदार्थ नाशवंत स्थितीत आढळून आले होते. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाद्वारे राज्यातील सर्व एसटी आगार व पार्सल कार्यालयांना नाशवंत पदार्थांची वाहतूक न करण्याबाबत सूचना देण्यात आली होती. त्यानुसार एसटी महामंडळाने दूध व दुग्धजन्य पदार्थांची वाहतूक करण्यास १५ नोव्हेंबर २०१७ पासून बंदी घातली होती.

पण यामुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले. ही पार्सल व्यवस्था पुन्हा सुरू करावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींकडूनही करण्यात आली.

त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्याच्या दृष्टीने दूध उत्पादक शेतकरी व ग्राहक यांना ५० किलोपर्यंतची वाहतूक नि:शुल्क करण्यास तसेच दुग्धजन्य पदार्थांच्या व्यावसायिक उत्पादकांनासुद्धा विहित नियमानुसार वेष्टण करून मालवाहतूक करण्याची अनुमती देण्यात येत आहे, असे त्यांनी जाहीर केले.

तसेच या प्रकरणातील एस. के. ट्रान्सलाइन्स प्रा. लि., जळगाव या पार्सल परवानाधारकाचा परवाना तत्काळ प्रभावाने खंडित करण्यात येत असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com