agriculture news in marathi, milk unions urges government to give five rupees subsity directly to farmers | Agrowon

शेतकऱ्यांना दूधाकरिता थेट प्रतिलिटर ५ रुपये अनुदान द्या : संघ
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 11 मे 2018

पुणे : दूध भुकटीला दिलेल्या अनुदानामुळे शेतकऱ्यांचा काहीही फायदा होणार नाही. त्यामुळे अनुदान देताना शेतकऱ्यांना किती दर द्यायचा याची स्पष्टता करावी. तसेच कर्नाटकच्या धर्तीवर थेट शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली १२ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याची माहिती दूध उत्पादक आणि प्रकिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी दिली. 

पुणे : दूध भुकटीला दिलेल्या अनुदानामुळे शेतकऱ्यांचा काहीही फायदा होणार नाही. त्यामुळे अनुदान देताना शेतकऱ्यांना किती दर द्यायचा याची स्पष्टता करावी. तसेच कर्नाटकच्या धर्तीवर थेट शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली १२ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याची माहिती दूध उत्पादक आणि प्रकिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी दिली. 

संघाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत हाेते. यावेळी उपाध्यक्ष गोपाळराव मस्के, महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पाटील, प्रभात दूध संघाचे सारंग निर्मळ, डॉ. विवेक क्षीरसागर आदी उपस्थित होते. श्री. पाटील म्हणाले, की दूध भुकटीचे दर कोसळल्याने खासगी आणि सहकारी संस्था अडचणीत आहेत. त्यामुळे दुधालाही दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांवरीही अन्याय होत आहे. 

दूध उत्पादकांना मदत करण्यासाठी कर्नाटक सरकार प्रतिलीटरअनुदान देते. शालेय मुलांना पोषक आहार म्हणून दूध भुकटी दिली जाते. आपल्याकडे दूध भुकटीला अनुदान देऊन शेतकऱ्यांना मदत केल्याचे भासवले जात अाहे. प्रत्यक्ष शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार हे स्पष्ट नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना थेट अनुदान देण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. तेथे मार्ग निघाला नाही तर सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. 

दुधाचे विक्रीचे दर कमी करण्यासाठी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. सर्व संस्थांचे खरेदी दर पाहून विक्रीचे दर दहा दिवसांमध्ये ठरविण्याचे यावेळी निश्‍चित करण्यात आले असल्याचेही विनायकराव पाटील यांनी सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
उत्पन्नवाढीचे गणित चुकते कुठे?साधारणपणे एप्रिल महिन्याच्या आरंभास विविध...
पीकविम्याचे कवित्वप तप्रधान पीकविमा योजनेची देशपातळीवर अंमलबजावणी...
‘वैद्यकीय' प्रवेशास मराठा आरक्षण लागू...नवी दिल्ली : वैद्यकीय आणि दंतवैद्यकीयच्या...
राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी पुणे : राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर सर्वदूर...
तीव्र दुष्काळाच्या प्रदेशात ११० एकरांवर...आटपाडी (जि. सांगली) येथील राजेश सातारकर यांची...
आठवडाभराच्या खंडानंतर पुन्हा चांगला...पुणे: राज्याच्या बहुतांशी भागात मॉन्सूनचे आगमन...
मालेगाव बाजार समितीत ‘इतर’च्या नावाखाली...नाशिक: मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘इतर...
मॉन्सूनने मराठवाडा, विदर्भ व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी...
ठिबकसाठी केंद्राकडून २९० कोटीपुणे : राज्यातील शेतकऱ्यांना ठिबक अनुदान वाटप...
पीकेव्ही २ बीटी वाणामुळे कापूस...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे...
अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला मिळणार...चिपळूण, जि. रत्नागिरी ः अलिबागच्या पांढऱ्या...
कर्जमाफीची कूर्मगतीराज्यात दोन आठवड्याने उशिरा मॉन्सून दाखल झाला...
सोयीनुसार निवडणूक घेण्याचे ढोंग कशाला?देशापुढील वास्तव संकटे, समस्या अग्रक्रमाने...
मराठवाड्यातील ५८ तालुक्यांत पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यामध्ये रविवारी (...
पीकविम्यातील हलगर्जीपणा; कृषी...पुणे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेची कामे करताना...
मॉन्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यतापुणे : राज्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने आगमन...
औरंगाबाद, कोपरगाव, येवल्यात धोधो पाऊसपुणे : कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील...
`गुणनियंत्रण`चा चेंडू आता ‘एसीबी’च्या...पुणे : राज्याच्या कृषी विभागातील गुणनियंत्रण...