जिनिंग मालकाने शेतकऱ्याला घ्यायला लावली शपथ

प्रातिनिधीक छायाचित्र
प्रातिनिधीक छायाचित्र

वर्धा : एका हातात पाण्याचा ग्लास आणि दुसऱ्या हातात कापूस घेऊन शेतकऱ्याला शपथ घेऊन सत्यपणा सिद्ध करण्यास सांगणाऱ्या सेलू येथील एस.आर. कॉटन जिनिंगचा परवाना काही काळासाठी निलंबित करण्यात आला. आधार व युवा संघर्ष संघटनेने संबंधितांविरोधात कारवाईची मागणी केली होती.  सोडी येथील शेतकरी अनिल मोहोड यांनी एस.आर. जिनिंगमध्ये कापूस विक्रीकरिता आणला होता. वाहनासह तोलाई करून त्यांना काटापट्टी देण्यात आली, परंतु गाडी खाली करताना जिनिंगच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना चार क्‍विंटल कापूस कमी असल्याचे सांगितले. मोहोड यांनी काटापट्टी दाखविली असता कर्मचाऱ्याने ती हिसकावून घेतली. त्यामुळे कर्मचारी व शेतकरी मोहोड यांच्यात वाद झाला. तो सोडविण्यासाठी जिनिंग मालकास बोलावण्यात आले. जिनिंग मालकाने कर्मचाऱ्यांचीच बाजू घेतली. त्यानंतर मोहोड यांना आपला प्रामाणिकपणा सिद्ध करण्यासाठी शपथ घ्यावयास भाग पाडण्यात आले. त्याकरिता त्यांच्या एका हातात पाण्याचा ग्लास आणि दुसऱ्या हातात कापूस देण्यात आला. शेतकऱ्यासोबत घडलेल्या या घटनेमुळे सर्वदूर संतापाची लाट उसळली होती. आधार व युवा संघर्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यासमवेत सेलू बाजार समितीत धाव घेतली. या वेळी एस. आर. जिनिंगचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी करण्यात आली, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता.  बाजार समितीने या गंभीर प्रकरणाची दखल घेत एस. आर.कॉटन जिनिंगला नोटीस बजावली. त्यांच्या खुलाशानंतर काही काळापुरता परवाना निलंबित करण्यात आला. या संदर्भाने सेलू बाजार समितीचे सचिव आय.आय. सुफी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रतिसाद दिला नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com