agriculture news in Marathi, millers from gujrat procuring cotton from khandesh, Maharashtra | Agrowon

खानदेशातून दररोज ‘गुजरात’ची कापूसखरेदी
चंद्रकांत जाधव
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

गुजरातमधील जिनर्स, आयातदार दरवर्षी खानदेशातून मोठ्या प्रमाणात कापूस घेऊन जातात. कापूस व्यापाराला कुठलाही विरोध नाही; परंतु त्यात शासनाचा कर बुडविला जायला नको. 
- अरविंद जैन, सदस्य, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया

जळगाव ः खानदेशातील जिनिंग सुरू होताच गुजरातमधील मोठे व्यापारी आणि जिनिंग व्यावसायिकांनी येथून कापूस खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे स्थानिक जिनर्सना जिनिंग पूर्ण क्षमतेने चालविणे अशक्‍य झाले आहे. खानदेशातून गुजरातेत रोज पाच ते साडेपाच हजार क्विंटल कापूस जात असून, त्याचे मिश्रण गुजरातच्या शंकर-६ या ब्रॅण्डच्या कापूस गाठींमध्ये होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 गुजरात व खानदेशचा सीमाभाग जवळ आहे. यातच खानदेशात पूर्वहंगामी कापूस अगदी दसरा सणापूर्वीच घरात यायला लागतो. त्यामुळे गुजरातमधील जिनर्स, मोठे व्यापारी येथून कापूस खरेदी करतात. तुलनेत खानदेशी कापूस एक ते दीड हजार रुपये क्विंटलमागे कमी दरात तेथील व्यापाऱ्यांना मिळत आहे.

अर्थातच गुजरातेत २६ लाख हेक्‍टर कापसाखालील क्षेत्रात अधिकाधिक क्षेत्र देशी कापूस वाणांनी व्यापले असून, त्याचे दर बीटी (बॅसीलस थुरीलेंझीस) वाणाच्या कापसाच्या तुलनेत अधिक आहेत. दुसऱ्या बाजूला खानदेशात बीटी कापूस अधिक असून, तो गुजराती कापूस आयातदारांना सध्या परवडत आहे. तेथील व्यापारी किंवा जिनर्स खानदेशातील व्यापाऱ्यांच्या माध्यमातून कापूस मागवत आहेत.

ट्रकद्वारे चोपडा- शिरपूर- शहादा- अक्कलकुवामार्गे अंकलेश्‍वर (गुजरात)मध्ये कापूस दाखल होत आहे. तर धुळे, नंदुरबार भागातील कापूस निझर (गुजरात) मार्गे बारडोली, सुरतपर्यंत जात आहे. चोपडा, शिरपूर, तळोदा, शहादा, जळगाव, धरणगाव, अमळनेर भागातून गुजरातेत रोज कापूस जात आहे. याच वेळी खानदेशात जिनिंगमध्ये गाठींचे उत्पादन सुरू झाले असून, काही जिनिंगचा अपवाद वगळता इतर जिनिंगना पुरेसा कापूस सध्या मिळत नाही. 

शंकर-६ मध्ये मिश्रण 
खानदेशमधून आयात केला जाणारा कापूस व इतर बाबींमुळे गुजरातमधील कापूस गाठींचे उत्पादन अधिक आहे. खानदेशातील कापसाचे मिश्रण गुजराथी कापूस गाठींचा ब्रॅण्ड असलेल्या शंकर - ६ मध्ये केले जाते. या गाठींमध्ये अधिकाधिक देशी कापसाची रुई असते, तर काही प्रमाणात बीटी कापूस असतो.

खेडा खरेदी तेजीत
गुजराथी कापूस आयातदारांच्या मध्यस्थांकडून दिवाळी सणाच्या काळातही खेडा खरेदी जोरात सुरू होती. गुजरातपासून जवळ असलेल्या खानदेशच्या भागात दर ४५०० ते ४६०० पर्यंत होते. तर जळगाव, धरणगावात ४४०० ते ४४५० रुपये प्रतिक्विंटल, असे दर दिले जात असल्याची माहिती मिळाली. 

प्रतिक्रिया
गुजरातमध्ये विक्रीकर, वस्तू व सेवाकर बुडवून रोज पाच ते सहा हजार क्विंटल कापूस जातो. याकडे महाराष्ट्र शासनाने लक्ष द्यायला हवे. खानदेशातील जिनर्सना त्याचा फटका बसत असून, निम्म्या क्षमतेनेच जिनिंग सुरू आहेत. 
- लक्ष्मण पाटील, सदस्य, खानदेश जिन प्रेस कारखानदार असोसिएशन

इतर अॅग्रोमनी
मका, हळद, गव्हाच्या किमतीत तेजीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्याच्या...
मका, हळद, हरभऱ्याच्या किमतीत वाढअमेरिकेने चीनकडून होणाऱ्या आयातीवर वाढविलेल्या...
नेहे कुटुंबीयांनी कांदा पिकावर बसवले...नगर जिल्ह्यातील सावरगाव तळ (ता. संगमनेर) हे डोंगर...
गावामध्ये उभारा बांबू आधारित उद्योगआपण बांबूचा औद्योगिक पीक म्हणून विचार केला नाही...
रब्बी हंगामातील आवकेचा दरावर परिणाम या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू,...
सुताचे दर वाढले जळगाव ः देशांतर्गत सूतगिरण्यांसमोर कापूस...
मका, हळद, कापसाचा तेजीकडे कलबाजारातील मक्याच्या स्पॉट किमती सध्या...
रुपयाचे अवमूल्यन, सरकीतील तेजीने कापूस...पुणे ः सध्या कापसाचे दर बाजारात ६५००...
‘कडवंची ग्रेप्स’ ब्रँडसाठी कृषी...कडवंची गावाला द्राक्षबागेने आर्थिक स्थैर्य आणि...
कडवंची : द्राक्षाच्या थेट विक्रीद्वारे...कडवंचीमधील द्राक्ष बागायतदारांनी विविध राज्यांतील...
नियोजन, काटेकोर अंमलबजावणीतून साधला...शेतीतील वाढता खर्च ही शेतकऱ्यांसमोरची मुख्य...
हळद, मका, कापूस मागणीत वाढीचा कलएप्रिल महिन्यात हळदीची मागणी वाढत आहे. त्यामुळे...
पुढील हंगाम ७० लाख टन साखरेसह सुरू होणारकोल्हापूर : साखर हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे...
कौशल्य विकासातून संपत्तीनिर्माणशेती-उद्योगात प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण ...
मिरज बाजारात जनावरांचे दर घटले सांगली ः चारा महागलाय, पाणी नाय, केवळ...
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी लिंबाचा आधारउन्हाळ्यात लिंबाला मोठी मागणी असते. यंदाच्या...
कापूस, मक्याच्या मागणीत वाढ सध्या बाजारपेठेत मका, हळदीच्या मागणीत वाढ आहे....
कापसाच्या किमतीत आणखी सुधारणानिवडणुकीमुळे पुढील दोन महिने बहुतेक पिकांच्या...
जळगाव जिल्ह्यात हरभरा खरेदीसंबंधी तयारी...जळगाव ः जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसंबंधीची...
सेंद्रिय उत्पादनातून आठ वर्षात तीन...आधी शिक्षण, बहुराष्ट्रीय बॅंकेतील नोकरी यामुळे...