agriculture news in marathi, On millet ditch in Khandesh | Agrowon

खानदेशात बाजरी मळणीवर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 मार्च 2019

जळगाव : खानदेशात बाजरी पीक मळणीवर आले आहे. आगामी आठवड्यात शिरपूर, जळगाव, चोपडा, शिंदखेडा भागांत पिकाची कापणी, कणसे गोळा करण्याचे काम शेतांमध्ये सुरू होईल, असे चित्र आहे. 

बाजरीची खानदेशात सुमारे १५ ते १६ हजार हेक्‍टरवर पेरणी झाल्याचा अंदाज आहे. खानदेशातील बाजरीचे क्षेत्र मागील दोन-तीन हंगामांच्या तुलनेत अधिक असल्याचे सांगितले जात आहे. 

जळगाव : खानदेशात बाजरी पीक मळणीवर आले आहे. आगामी आठवड्यात शिरपूर, जळगाव, चोपडा, शिंदखेडा भागांत पिकाची कापणी, कणसे गोळा करण्याचे काम शेतांमध्ये सुरू होईल, असे चित्र आहे. 

बाजरीची खानदेशात सुमारे १५ ते १६ हजार हेक्‍टरवर पेरणी झाल्याचा अंदाज आहे. खानदेशातील बाजरीचे क्षेत्र मागील दोन-तीन हंगामांच्या तुलनेत अधिक असल्याचे सांगितले जात आहे. 

बाजरीची पेरणी धुळे जिल्ह्यात शिंदखेडा, धुळे तालुक्‍यात खरिपात अधिक केली जाते. रब्बी हंगामात हरभरा, दादर (ज्वारी) यांना पसंती दिली जाते. परंतु, या हंगामात अमेरिकन लष्करी अळीच्या भीतीने अनेक शेतकऱ्यांनी संकरित ज्वारी, मका पेरणी टाळली. तीन महिन्यांचे हे पीक असल्याने जानेवारीत पेरणी केलेल्या पिकाची मळणी एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सुरू होईल. 

मळणीचे दर २०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. कापणी व कणसे गोळा करण्यासाठी एकरी १५०० रुपये दर आहे. अनेक ठिकाणी पीक जोमात होते. बाजरीचे पीक हलक्‍या जमिनीतही चार - पाच वेळेस सिंचन करून बऱ्यापैकी मिळते. चारा व घरात खायला धान्यही मिळते. त्यामुळे बाजरीकडे अनेक शेतकरी वळले. शिरपूर, चोपडा, जळगाव, यावल, पाचोरा, शहादा व शिंदखेडामधील तापी, गिरणा, पांझरा नदीकाठावर बाजरीची पेरणी बऱ्यापैकी झाली. शिरपूर, जळगाव, चोपडा व शिंदखेडा भागांत अनेक शेतकऱ्यांनी आगाप पेरणी केली. 

इतर अॅग्रो विशेष
राजगुरुनगरचा आदर्शराजगुरुनगर येथील कांदा व लसूण संशोधन संचालनालयाला...
पीक कर्जवाटपाचा मुहूर्त टळणार?या वर्षी लोकसभेच्या निवडणुका आल्याने आणि मे...
फळबाग वाचविण्यासाठी सलाइनद्वारे पाणी जिंतूर, जि. परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या...
सिन्नर तालुक्यात दुष्काळाने डाळिंब...नाशिक  : पाऊस कमी झाल्याने संपूर्ण सिन्नर...
विदर्भात उष्णतेची लाटपुणे ः मराठवाडा ते उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण मध्य...
शेडनेटगृह अनुदानाचे राज्यस्तरीय दरपत्रक...पुणे : धोरणात्मक कामकाजापासून शेतकरी प्रतिनिधींना...
स्ट्राॅबेरीची बाजारपेठ होतेय अधिक सक्षम महाबळेश्वर तालुक्यात एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनाचा...
आरोग्यदायी ड्रॅगन फ्रूटशरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि...
वनस्पतीच्या ताण स्थितीतील संदेश यंत्रणा...वनस्पतीतील ताणाच्या स्थितीमध्ये कार्यरत होणाऱ्या...
आर्थिक, सामाजिक, कृषिसंपन्न राजुरीचा...आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत व...
नाला खोलीकरणात गेलेे शेत; न्यायासाठी...अकोला ः उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी यंत्रणा...
पावणेतीन हजार कोटींची ‘वसुंधरा’त...पुणे : कृषिविस्तार व सल्ला देण्याचे काम सोडून...
कांदा संचालनालयाला राष्ट्रीय संस्थेचा...पुणे : राजगुरुनगर भागात असलेल्या कांदा, लसूण...
शेतकऱ्यांना मिळणार तालुकानिहाय हवामान...दिल्ली : देशातील सुमारे साडेनऊ कोटी शेतकऱ्यांना...
राज्यात उष्णतेची लाट येणारपुणे : सूर्य आग ओकायला लागल्याने विदर्भात उन्हाचा...
हमीभाव वाढीचा बागुलबुवा आणि वास्तवलोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांच्या...
‘कॅप्सूल’ सुधारणार मातीचे आरोग्यमहाराष्ट्र राज्यासाठी या वर्षी रासायनिक खतांची...
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...