नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळप

नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळप
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळप

नगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी सव्वा कोटी टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून एक कोटी ३५ लाख क्विंटल साखरेची निर्मिती झाली आहे. कारखान्यांचा गळीत हंगामाचा कालावधी संपत आला आहे. मार्चअखेर जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा पट्टा पडणार आहे. 

जिल्ह्यात १४ सहकारी व ९ खासगी सहकारी साखर कारखाने आहेत. त्यात अंबालिका कारखान्याने सुरवातीपासूनच आघाडी घेतली आहे. ती आजही कायम आहे. अंबालिका कारखान्याचा पट्टा पडलेला आहे. तेथे १३ लाख ६४ हजार २१५ टन ऊसगाळपातून १५ लाख ४५ हजार ७०० क्विंटल साखरेची निर्मिती करून आघाडी कायम ठेवली. ‘ज्ञानेश्‍वर’ने ११ लाख ५५ हजार ७५० टन उसाचे गाळप केले. तिसऱ्या स्थानी थोरात कारखाना आहे. त्याने ११ लाख ५४ हजार ५६० टनाचे गाळप केले. दुसऱ्या स्थानासाठी ज्ञानेश्‍वर व थोरात कारखान्यांत स्पर्धा होती. 

जिल्ह्यात एकूण एक कोटी २२ लाख २९ हजार ५८२ टन उसाचे गाळप झालेले आहे. यामध्ये १४ सहकारी साखर कारखान्यांनी ८३ लाख ४ हजार ४५२ टन, तर नऊ खासगी कारखान्यांनी ३९ लाख २५ हजार १३० टन उसाचे गाळप केले. जिल्ह्याचा साखर उतारा १०.९७ एवढा आहे. जिल्ह्यातील २३ साखर कारखान्यांपैकी सात कारखान्यांचा पट्टा पडला आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात १४ साखर कारखाने सुरू आहेत.

दीड कोटी टनाचा टप्पा गाठणार  जिल्ह्यात आतापर्यंत सव्वा कोटी टन उसाचे गाळप झाले आहे. आगामी काळात आणखी २५ लाख टन उसाचे गाळप होऊन दीड कोटी टन उसाचे जिल्ह्यात गाळप होण्याची शक्‍यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com