agriculture news in marathi, millions of warkaris in pandarpur for ashadhi vari, solapur, maharashtra | Agrowon

आषाढी सोहळ्यासाठी लाखो वारकऱ्यांची पंढरीत मांदियाळी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 जुलै 2018

पंढरपूर, जि. सोलापूर :
पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान ।
आणिक दर्शन विठोबाचे ।।
अशी भावना व्यक्त करत वारकऱ्यांनी सोमवारी (ता. २३) आषाढीच्या सोहळ्यात मोठ्या भक्तिभावाने सहभाग घेत विठुनामाचा गजर केला. वारकरी परंपरेत आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे पहाटेपासूनच टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने अवघी पंढरी दुमदुमून गेली.

पंढरपूर, जि. सोलापूर :
पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान ।
आणिक दर्शन विठोबाचे ।।
अशी भावना व्यक्त करत वारकऱ्यांनी सोमवारी (ता. २३) आषाढीच्या सोहळ्यात मोठ्या भक्तिभावाने सहभाग घेत विठुनामाचा गजर केला. वारकरी परंपरेत आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे पहाटेपासूनच टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने अवघी पंढरी दुमदुमून गेली.

आषाढीचा मुख्य सोहळा असल्याने दर्शनरांगेसह चंद्रभागा नदी आणि प्रदक्षिणा मार्गावर वारकऱ्यांची एकच गर्दी उसळली. नदी तीरावर तर पहाटेपासूनच स्नानासाठी गर्दी झाली होती. सकाळपर्यंत पंढरीत सुमारे दहा लाखांपर्यंत वारकरी दाखल झाले होते. कोणी मुखदर्शन, कोणी नदीवरील स्नान करून तर कोणी प्रदक्षिणा मार्गावरील प्रदक्षिणा पूर्ण करून आपापल्या सोईनुसार आपली वारी पोचवत असल्याचे चित्र होते.

शहरातील विविध मंदिरे, मठ, धर्मशाळा यामधून सुरू असलेल्या भजन, कीर्तन, प्रवचनाने पंढरी भक्तिरसाच्या एका वेगळ्याच उत्साहाने भारून गेली. आजही दर्शनरांगेत जवळपास दीड लाखाहून अधिक वारकरी होते. नगर प्रदक्षिणेसाठी वारकरी आणि दिंड्या निघत होत्या. त्यामुळे शहरातील विविध संतांच्या मठ, धर्मशाळाबरोबर रस्त्यावरही भक्तिप्रवाह ओसंडून वाहत होता. दुपारी रथोत्सवाची मिरवणूक काढण्यात आली. त्या वेळीही एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले. वारी पोचवून भक्तीचा हा प्रवाह हळूहळू परतीच्या प्रवासाला लागला होता.

"जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता'' अशी भावना पंढरीतून पाय काढताना वारकऱ्यांच्या मनात आणि डोळ्यांत दिसत होती.

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...