agriculture news in Marathi, minimum temperature decreased, Maharashtra | Agrowon

किमान तापमानात घट; नगर ९.४ अंशांवर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 जानेवारी 2018

पुणे ः विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय, तर कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किचिंत घट झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील नगर येथे ९.४ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

पुणे ः विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय, तर कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किचिंत घट झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील नगर येथे ९.४ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

सध्या वाऱ्याच्या प्रवाहामध्ये काही प्रमाणात बदल होत असून, वारे उत्तरेएेवजी नैर्ऋत्येकडून वाहत आहेत. त्यामुळे वातावरणात बदल होत आहे. कमाल तापमानाबरोबर किमान तापमानातही हळूहळू वाढ होईल. मागील आठवड्यात राज्यातील काही भागांत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. त्यामुळे किमान तापमानात वाढ झाली होती. परंतु आता ते विरून गेल्यामुळे पुन्हा थंडी वाढली आहे. कोकणातील किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे. रत्नागिरी येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. भिरामध्ये १५.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमान नोंदविले गेले. 

कोरड्या हवामानामुळे मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, मालेगाव, नाशिक येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. मराठवाड्यात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे.  

सोमवारी (ता. २२) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस)  : मुंबई (सांताक्रूझ) १७.०, अलिबाग १८.० (-१), रत्नागिरी १७.१ (-२), भिरा १५.०, डहाणू १७.७ (१), पुणे १०.६, नगर ९.४, जळगाव १३.० (-१), कोल्हापूर १५.९ (१), महाबळेश्वर १३.३, मालेगाव १२.६ (१), नाशिक १०.८ (१), सांगली १३.६, सातारा ११.४ (-२), सोलापूर १६.४, औरंगाबाद १२.०, बीड १०.८ (-३), परभणी (कृषी विद्यापीठ) ८.०, परभणी शहर ११.१ (-४), नांदेड १२.० (-२), उस्मानाबाद १०.४, अकोला १५.५ (-१), अमरावती १४.६, बुलडाणा १५.२, चंद्रपूर ११.० (-५), गोंदिया ९.८ (-४), नागपूर १०.३ (-३), वर्धा १२.१(-२), यवतमाळ १४.० (-२).

इतर अॅग्रो विशेष
अभिनेत्री श्रीदेवी यांचे निधनपुणे : आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने भारतीय...
महिला सक्षमीकरण, शाश्वत शेतीसाठी झटणारी...सातारा जिल्ह्यातील ॲवॉर्ड संस्था शाश्वत शेती...
शेंगालाडू व्यवसायातून नीशाताईंना मिळाले...पंढरपुरात एकादशी तसेच अन्य दिवशी येणाऱ्या...
पाणीटंचाईच्या झळा वाढू लागल्यापुणे : उन्हाचा चटका वाढत असून पाणीटंचाईच्या झळा...
कोकण, मध्य महाराष्ट्रात हवामान अंशतः...पुणे : अरबी समुद्र ते दक्षिण महाराष्ट्र या...
‘मांजरी मेडिका’ द्राक्ष ज्यूस वाण...पुणे : मांजरी येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन...
‘स्वाभिमानी’ आणि ‘रयत क्रांतीत’ संघर्षसोलापूर : माढा दौऱ्यावर असलेले  कृषी...
सदाभाऊंच्या ताफ्यावर गाजर, तूर, मका...सोलापूर : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या...
लहान वृक्षात संधी महानबोन्सायच्या बहुतांश व्याख्येत छोट्या कुंडीत वृक्ष...
शेतकरी मंडळांची दखल घेणार कोण?आम्ही शेतकरी मागील दहा वर्षांपासून कृषी ...
साखर १०० रुपयांनी उतरलीकोल्हापूर : दोन दिवसांपूर्वी साखरेचे वाढलेले दर...
हरभऱ्याच्या किमतीत सुधारणांसाठी सर्व...नवी दिल्ली : हरभऱ्याच्या घसरत्या किमती...
‘चारा छावणी गैरव्यवहारप्रकरणी १४८...सांगली ः दुष्काळी स्थितीत २०१२ ते २०१३ आणि २०१३-...
कापूस गाठींच्या साठ्यासाठी होतोय आटापिटाजळगाव ः गुलाबी बोंड अळीने कापूस उत्पादकांच्या...
प्रश्न हाताळण्याची मुख्यमंत्र्यांची...परभणी : कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्येचे...
अडीच हजार कोटींची एफआरपी थकलीपुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक...
कृषी कार्यालयाच्या शिपायाने घातला...बुलडाणा : कृषी खात्यात कार्यरत असलेल्या एका...
पाणी योजनेच्या वीजबिलात आर्थिक मदत...मुंबई  : ग्रामीण भागातील पाणीपुरवठा...
बीटी बियाणे दराचा केंद्राकडून पुनर्विचारनागपूर ः बीटी दराबाबत पुनर्विचार करण्याच्या...
बियाणेवाटपाच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून...पुणे : ठेकेदारांशी संगनमत करून निकृष्ट...