agriculture news in marathi, minister divakar ravte criticizes CM's yavatmal tour, maharashtra | Agrowon

राज्याच्या प्रमुखावर गुपचूप दौऱ्याची वेळ का यावी
विनोद इंगोले
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

यवतमाळ : राज्याच्या प्रमुखाला आपल्याच राज्यातील एखाद्या जिल्हयात गुपचूप येऊन जाण्याची वेळ यावी, असा दुर्देवी प्रकार राज्यात यापूर्वी कधीच घडला नाही. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करण्यात असमर्थ ठरल्याने ते जाब विचारतील या भीतीपोटीच मुख्यमंत्र्यांनी गोपनीय दौऱ्याचे पाऊल उचलले असावे, अशी खोचक टीका परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली.

यवतमाळ : राज्याच्या प्रमुखाला आपल्याच राज्यातील एखाद्या जिल्हयात गुपचूप येऊन जाण्याची वेळ यावी, असा दुर्देवी प्रकार राज्यात यापूर्वी कधीच घडला नाही. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करण्यात असमर्थ ठरल्याने ते जाब विचारतील या भीतीपोटीच मुख्यमंत्र्यांनी गोपनीय दौऱ्याचे पाऊल उचलले असावे, अशी खोचक टीका परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली.

शिवसेनेचे नेते व परिवहनमंत्री दिवाकर रावते रविवारी (ता. २२) यवतमाळ दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विषबाधितांना भेटण्यासाठी यवतमाळच्या दौऱ्यावर होते. परंतु सत्तेतील मंत्र्यांनादेखील या दौऱ्याची खबर लागू नये याची दक्षता घेण्यात आली. त्यावरूनच मुख्यमंत्री या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दहशतीत होते, ही बाब स्पष्ट होत असल्याचा आरोप श्री. रावते यांनी केला.

रावते म्हणाले, यापूर्वी विषबाधित रुग्णांना भेटण्यासाठी आलेल्या कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्यावर कपाशीची झाडे फेकण्यात आली होती. सदाभाऊ खोत यांच्या दौऱ्यात त्यांच्या अंगावरच फवारणीचा प्रयत्न झाला. या साऱ्याची धास्ती मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि गोपनीय दौरा केला. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीवरूनच त्यांनी तर्क काढले. शासकीय यंत्रणा जर इतकी सजग असती तर मग जिल्ह्यात इतके बळी कसे गेले असते, असा प्रश्‍नही त्यांनी मांडला. 

बळिराजा चेतना झाले नापास
उस्मानाबाद आणि यवतमाळ जिल्ह्यात बळिराजा चेतना अभियान राबविले जात आहे. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात यशस्वी शेतीचे मॉडेल विकसित करून ते आदर्श म्हणून राज्यासमोर आणण्याचा उद्देश या अभियानाचा होता. परंतु दुर्दैवाने अभियानाने केवळ वाढत्या मृत्यूचे मॉडेलच जगासमोर आणले. त्यातही विषबाधितांच्या मृत्यूची भर पडली, असा टोलाही दिवाकर रावते यांनी लगावला.  

मुख्यमंत्र्यांकडे व्यक्‍त करणार नाराजी
दिवाकर रावते यांच्यासोबत महसूल राज्यमंत्री व यवतमाळचे सहपालकमंत्री संजय राठोड होते. तेसुद्धा यवतमाळात असताना त्यांनाही मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापासून दूर ठेवण्यात आले. त्यांनी देखील याप्रकरणी मुख्य सचिव तसेच मुख्यमंत्री यांच्याकडे जाहीर नाराजी व्यक्‍त करणार असल्याचे सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
अब आया उंट पहाड के निछे; राजू शेट्टींचा...सोलापूर : शेतकऱ्यांच्या दूध दराच्या प्रश्‍...
सरकार रिलायन्स, पतंजलीच्या दुधाची वाट...नागपूर : एकीकडे समाधानकारक पाऊस पडत असताना...
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस-...नागपूर : कधी देणार कधी देणार...कापूस, धानाला...
पीक सल्ला१६ जुलै ते ३१ जुलैपर्यंत पेरणी लांबल्यास संकरीत...
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसादजळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप...
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात...सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात...
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेधसांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी...
दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलननागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनपुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी...
दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलनअकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंदऔरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या...
नगर जिल्ह्यात दूध संकलन बंदनगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या...केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय...
सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला...
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत...तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे...
नागपूर, गडचिरोलीत संततधारनागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (...
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिपऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास...
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊसपुणे   : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली...
अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायमनगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६...नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६...