agriculture news in marathi, Minister Divakar Ravtes tongue slips on farmers issue | Agrowon

नोटा घेऊन तुमच्या दरात उभा राहू का? - दिवाकर रावते
सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

वाशीम - राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर अनेक वेळा सत्तेतून बाहेर पडण्याची धमकी देणाऱ्या शिवसेनेचे नेते तथा राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते हे गारपीटग्रस्त भागाची पाहणी करताना शेतकऱ्यांवरच घसरले. ""आता काय तुमच्या दरवाजात नोटा घेऊन उभा राहू?,'' असा प्रश्‍न रिसोड तालुक्‍यातील नेतन्सा येथील शेतकऱ्याला शुक्रवारी केला. यामुळे रावते यांच्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये चीड व्यक्त होत आहे.

वाशीम - राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर अनेक वेळा सत्तेतून बाहेर पडण्याची धमकी देणाऱ्या शिवसेनेचे नेते तथा राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते हे गारपीटग्रस्त भागाची पाहणी करताना शेतकऱ्यांवरच घसरले. ""आता काय तुमच्या दरवाजात नोटा घेऊन उभा राहू?,'' असा प्रश्‍न रिसोड तालुक्‍यातील नेतन्सा येथील शेतकऱ्याला शुक्रवारी केला. यामुळे रावते यांच्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये चीड व्यक्त होत आहे.

वाशीम जिल्ह्यामध्ये सलग तीन दिवस तुफान गारपीट झाली होती. या गारपिटीत गहू, हरभरा व फळपिकांचे अतोनात नुकसान झाले. कधीकाळी शेतकरी दिंडी काढून शिवसेनेच्या नेतेपदी विराजमान झालेले राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते शुक्रवारी (ता.१६) नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले होते. रिसोड तालुक्‍यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना नेतन्सा शिवारातील नुकसानाच्या पाहणीची मागणी केली. लाल दिव्याच्या गाड्यांचा ताफा बांधावर आला.

जमीनदोस्त झालेला गहू दाखवित शेतकऱ्याने हंबरडा फोडला. मात्र, त्याला आधी मंत्री महोदयांनी "चूप रे' म्हणून दमात घेतले. नंतर मदत कधी देणार? अशी शेतकऱ्याने विचारणा केली असता, "नोटा घेऊन तुमच्या दरवाजात उभा राहू का?' असा प्रश्‍न करीत "कोण काय बोलले,' असे धमकावत शेतकऱ्याचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला. या वेळी तालुक्‍यातील शिवसेनेचे पदाधिकारीही अवाक्‌ झाले. दिवाकर रावते यांच्या अशा वर्तनामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. नुकसानीची पाहणी करू नका? मात्र, दमदाटी तरी करू नका, असे शेतकरी म्हणत आहेत.

ठरवून केलेले षड्‌यंत्र - दिवाकर रावते
ते माझ्या दौऱ्यातील गाव नव्हते. काही शेतकऱ्यांनी आग्रह केला म्हणून मी त्यांच्यासाठी गेलो होतो. शेतात गेल्यावर एक शेतकरी रडत होता. मी त्याला म्हटले, "रडतोस कशाला? मी तुमचं दुःख बघायला तुमच्यासाठीच आलो आहे, तर काही जणांनी पैसे घेऊन आले का तुम्ही, असे विचारले. त्यावर मी कोण बोलले समोर या, असे म्हटले. गर्दीतील एक जण या सर्व प्रकाराचा व्हिडिओ काढत होता. मी त्यांना म्हटले, तुम्ही शेतकरी आहात. असे प्रकार करू नका. अशामुळे शेतकऱ्यांची बदनामी होते. मी त्यांना समजावले की मदत अशी मिळते का? नियमानुसार बॅंकेत जमा होते. मी काय तुमच्या दारात नोटा घेऊन येऊ का? असे म्हटले. हा सर्व प्रकार ठरवून केला असून, मी त्याला रोखठोक उत्तर दिल्याचे दिवाकर रावते यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
हवामान बदलावर संवर्धित शेती हेच उत्तगेल्या दोन दशकांपासून महाराष्ट्रामध्येही...
कृषी सल्लाधान्य साठवण : मळणीनंतर धान्याची साठवण...
बोंडअळीग्रस्त, धान उत्पादकांना संयुक्त...मुंबई : राज्यात गुलाबी बोंडअळी आणि धान...
लाळ्या खुरकूत लस पुरवठा विलंबाच्‍या...पुणे  ः लाळ्या खुरकूत लसींच्या पुरवठ्याच्या...
कोरडे, उष्ण हवामान राहून तापमानाची...महाराष्ट्रासह दक्षिण, मध्य, उत्तर व ईशान्य...
नेदरलॅंडमध्ये साठवण, निर्यातीसाठी खास...वातावरणातील बदल लक्षात घेता कांदा पिकांच्या नव्या...
राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांच्या...नगर : शेतमालाला दर मिळण्यासह अन्य...
हमीभाव खरेदी केंद्रांवर हमालीच्या...अकोला : अाधारभूत किमतीने सुरू असलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात होणार दोन हजार ९६ पीक... पुणे   ः रब्बी हंगामातील पिकांची...
पुणे जिल्ह्यात ११ हजार कांदा चाळींची...पुणे  ः कांद्याचे अधिक उत्पादन झाल्यास...
तेवीस कारखान्यांकडून ७७ लाख ६३ हजार टन... औरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
पुढील महिन्यापासून ‘समृद्धी’चे काम... वाशीम : नागपूर-मुंबई कृषी समृद्धी जलदगती...
‘वैद्यनाथ साखर’चा परवाना दहा दिवसांसाठी... बीड : अन्न व औषधी प्रशासनाने केलेल्या तपासणीत...
शेतीकामासाठी सालगड्यांची कमतरताअमरावती  ः गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन...
राज्यात ‘जलयुक्त’साठी २०८ कोटींचा निधीनगर ः दुष्काळमुक्तीसाठी राबविण्यात येत असलेल्या...
वीजजोडणीसाठी शेतकऱ्याचा आत्मदहनाचा...नगर : पैसे भरल्यानंतर वारंवार मागणी करूनही...
चिंचेचे उत्पादन २० टक्क्यांनी वाढणारसांगली : चवीने आंबट असणारी चिंच यंदा गोड झाली आहे...
परभणी, नांदेड जिल्ह्यांतील २०१७ गावांना...परभणी : २०१७-१८ च्या खरीप हंगामातील पिकांची...
जलयुक्तच्या कामांना टक्केवारीचे ग्रहणअकोला ः जलयुक्त शिवार योजनेला जसजसा अधिक कालावधी...
कृषी पर्यटनाला मिळणार जुन्नर तालुक्यात...पुणे: आैद्याेगिक विकासाला मर्यादा असल्याने...