agriculture news in marathi, Minister Dr. Ranjeet Patil visits farmers on fields in Akola taluka | Agrowon

अकोला तालुक्यात मंत्र्यांचा ‘एक दिवस शेतकऱ्यांसोबत’
टीम अॅग्रोवन
सोमवार, 2 जुलै 2018

अकोला : ‘एक दिवस शेतकऱ्यांसोबत’ या उपक्रमांतर्गत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शनिवारी (३० जून) अकोला तालुक्यातील डोंगरगाव, मासा-सिसा (उदे) येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली. 

अकोला : ‘एक दिवस शेतकऱ्यांसोबत’ या उपक्रमांतर्गत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शनिवारी (३० जून) अकोला तालुक्यातील डोंगरगाव, मासा-सिसा (उदे) येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली. 

 यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार विजय लोखंडे, कृषी अधिकारी व अन्य अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून जिल्हाभरात एक दिवस शेतकऱ्यांसोबत हा उपक्रम राबविण्यात आला. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सकाळी डोंगरगावला भेट दिली. येथील मधुकर महादेव देवकर यांच्या शेतात जाऊन त्यांनी शेताची पाहणी केली. पेरणीसाठी कोणते बियाणे वापरले, कुठून खरेदी केली, याबाबत चौकशी केल्यानंतर त्यांच्यासह परिसरातील उपस्थित शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर शेतकऱ्यांसोबत जेवण केले. याच परिसरातील श्रीकृष्ण नामदेव देवर यांच्या दहा गुंठ्यात लागवड केलेल्या पालकाची त्यांनी पाहणी केली. 

 याच परिसरातील शेतातील वाकडे झालेले बिजेचे खांब दोन दिवसांत सरळ करण्याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना सूचना केली. डोंगरगावातील प्रगतिशील शेतकरी शिरीष देशमुख यांच्या शेडनेटला त्यांनी भेट दिली. स्वातंत्र्यसैनिक रमाबाई शंकरराव देशमुख यांची त्यांनी भेट घेऊन चौकशी केली. मासा-सिसा (उदे) येथील तरुण शेतकरी प्रफुल्ल भास्कर फाले याने तयार केलेल्या भुईमूग फोडणी यंत्राची पाहणी करून त्याचे कौतुक केले. 

इतर ताज्या घडामोडी
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...