agriculture news in marathi, Minister Mahadev Jankar warns milk agitators | Agrowon

आंदोलन होणार असेल तर, आमचेही कार्यकर्ते मैदानात : महादेव जानकर
सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जुलै 2018

नाशिक : दुधाला दरवाढ दिली असून दूध संघांनी त्याप्रमाणे उत्पादक शेतकऱ्यांना देण्याचे मान्य केले. त्यानंतरही आंदोलन होणार असेल, तर आमचेही कार्यकर्ते मैदानात उतरतील, असा सूचक इशारा देतानाच दूध उत्पादकांच्या वाहनांना पोलिस संरक्षण दिले जाणार आहे, असे पशुसंवर्धन-दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी रविवारी (ता.१५) येथे सांगितले. मुंबईमध्ये गेल्या तीन दिवसात 10 लाख लिटर दुधाचा साठा करण्यात आलेला असल्याने मुंबईला दुधाची कमतरता भासणार नाही, असाही निर्वाळा त्यांनी दिला.

नाशिक : दुधाला दरवाढ दिली असून दूध संघांनी त्याप्रमाणे उत्पादक शेतकऱ्यांना देण्याचे मान्य केले. त्यानंतरही आंदोलन होणार असेल, तर आमचेही कार्यकर्ते मैदानात उतरतील, असा सूचक इशारा देतानाच दूध उत्पादकांच्या वाहनांना पोलिस संरक्षण दिले जाणार आहे, असे पशुसंवर्धन-दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी रविवारी (ता.१५) येथे सांगितले. मुंबईमध्ये गेल्या तीन दिवसात 10 लाख लिटर दुधाचा साठा करण्यात आलेला असल्याने मुंबईला दुधाची कमतरता भासणार नाही, असाही निर्वाळा त्यांनी दिला. आंदोलकांनी कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती श्री. जानकर यांनी दिली.

खासगी कार्यक्रमासाठी श्री. जानकर हे नाशिकमध्ये आले असताना सरकारी विश्रामगृहात त्यांनी `सकाळ'शी संवाद साधला. ते म्हणाले, की दुधाला 5 रुपयांची दरवाढ देण्यात आली असून यात 3 रुपयांची दरवाढ येत्या 20 जुलैपासून दिली जाईल. दुधावरील जी.एस.टी. रद्द केल्यानंतर 2 रुपयांची आणखी भर पडेल. त्यानुसार राज्यातील दूध संघांना नोटिसीद्वारे कळविले गेले असून त्यांनी दूध उत्पादकांना दरवाढ द्यायची आहे. त्यानंतरही जे दूधसंघ दरवाढ देणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

शेतकऱ्यांच्या मुलांना नासाडी शोभत नाही 
खासदार राजू शेट्टी यांच्याकडून आंदोलनाचा पुनर्उच्चार केल्याबद्दल विचारले असता श्री. जानकर म्हणाले, की आंदोलनकर्त्यांनी आंदोलन करावे. पण त्यापूर्वी आपणही शेतकऱ्यांची मुले आहोत, दूध अथवा भाजीपाल्याची नासाडी करणे शोभत नाही याचा विचार करावा. शिवाय आंदोलन करताना ते हिंसक होणार नाही, याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. जर कायदा हाती घेण्याचा प्रयत्न केला, तर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्याचप्रमाणे दूध उत्पादकांनी आंदोलनाला न घाबरता दूध पुरवठा करावा. 

`गोकुळ'वर कारवाई
गोकुळ दूध संघाने उद्या (ता.16) पासूनच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यासंदर्भात श्री. जानकर यांनी माहिती घेतो असे सांगितले. शिवाय "गोकुळ'ने आंदोलनास पाठिंबा दिलाच असेल, तर तात्काळ कारवाई केली जाईल आणि प्रशासक नेमला जाईल, असेही श्री. जानकर म्हणाले.

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...