Agriculture News in Marathi, Minister of state for Agriculture Sadhabhau Khot launched his own organization, Rayat kranti morcha, Maharashtra | Agrowon

रयत क्रांतीसमोर संघटना बांधणीचे अाव्हान
राजकुमार चौगुले
शनिवार, 23 सप्टेंबर 2017
कोल्हापूर : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटनेचा घट येथे घटस्थापनेदिवशी बसवून नव्या संघटनेची घोषणा केली. ‘संवादातून संघर्षाकडे’ असे ब्रीदवाक्‍य घेऊन संघटना येथून पुढच्या काळात वाटचाल करणार आहे.
 
कोल्हापूर : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटनेचा घट येथे घटस्थापनेदिवशी बसवून नव्या संघटनेची घोषणा केली. ‘संवादातून संघर्षाकडे’ असे ब्रीदवाक्‍य घेऊन संघटना येथून पुढच्या काळात वाटचाल करणार आहे.
 
इतके दिवस शेतकरी संघटना या फक्त शेतीप्रश्‍नावरच लढत होत्या. परंतु सदाभाऊ यांची रयत क्रांती संघटना केवळ शेतीप्रश्‍नावर लढणार नसून, शेतीपूरक व्यवसायाच्या अडचणीबरोबरच महिला, युवक, रोजगार, शिक्षण या विभागांतही ही संघटना काम करणार असल्याचे श्री. खोत यांनी सांगितले आहे. ही इतर क्षेत्रांतील लोकांसाठी दिलासादायक माहिती असली, तरी याचा लढा उभारण्याचे आव्हान सदाभाऊंच्या नव्या संघटनेपुढे आहे.
 
‘नामकरणा’च्या पहिल्या मेळाव्यात गर्दी खेचण्यात ते यशस्वी झाले असले, तरी ही गर्दी प्रत्यक्षात कामकाज करताना कायम राहण्यासाठी त्यांच्या संघटनेला खूप कष्ट घ्यावे लागतील याची जाणीव त्यांनाही आहे.
 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांच्या सभा या भावनिकही असतात. सदाभाऊंच्या सभेलाही भावनिकतेची किनार होती. त्यांच्यासह त्यांच्या पुत्र सागर यांनी आपल्यावर सातत्याने स्वभिमानीत अन्याय झाल्याची भावना बोलून दाखविली. आम्ही कशी चळवळ उभी केली; आणि चळवळीतीलच इतर लोकांनी आमच्या कामाकडे दुर्लक्ष करीत आम्हाला कसे बाजूला केले याचा पाढाच या मेळाव्यात वाचला. जरी खासदार राजू शेट्टी यांचे नाव घेतले नसले तरी संपूर्ण भाषणाचा ओघ हा त्यांनी अन्याय केल्याचाच होता. 
 
शेट्टी यांच्या संघटना विस्तारात भावनिक आवाहन हे महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्याची ‘री’ सदाभाऊंची संघटना ओढत असल्याचे चित्र मेळाव्यात होते. आपल्यावर अन्याय झाला आहे आणि तो दूर करायचाच; यासाठी एकत्र अशीच साद या वेळी नेत्यांनी घातली.
 
एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात
सध्या प्रचलित काही शेतकरी संघटनांची अवस्था पाहिली तर फारशी भूषणावह नाही. शेतीप्रश्‍नापेक्षा एकमेकांच्या भूमिकेविषयी टीका करून शेतीप्रश्‍नाची धार बोथट करण्याचा प्रयत्न सातत्याने होत असतो. यामुळे शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. ही संघटना म्हणजे एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात असे वर्णन करावे लागेल.
 
कारण थेट सरकारविरोधी रस्त्यावरचे आंदोलन संघटना करणार नाही; कारण सदाभाऊंवर नेहमीच सरकारचा दबाव असेल, हे निश्‍चित आहे. अशा या परिस्थितीत शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न सदाभाऊंकडून किती वेगात होईल याचे उत्तर भविष्यातील त्यांच्या संघटनेची वाटचाल कशी राहते यावरच ठरणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
शिवकुमार स्वामी यांचे १११व्या वर्षी...बंगळूर : तुमकुरू येथील सिद्धगंगा मठाचे प्रमुख,...
आयटीसीचे ‘ई चौपाल’ आता येणार मोबाईलवरग्रामीण भागाला डिजिटल करण्याच्या उद्देशाने दोन...
पुण्यात भाजीपाल्याची आवक कमी; दर स्थिरपुणेः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
...तर भविष्यात निवडणुका होणारच नाहीत :...कासेगाव, जि. सांगली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र...
नाशिक जिल्ह्यात पाण्यासाठी गावे पाहतात...येवला, जि. नाशिक : यंदा दुष्काळाच्या माहेरघरांसह...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक टाळण्यासाठी...सांगली ः  दादा... द्राक्षांची विक्री करताना...
पंजाब गारठलेले; काश्‍मीरला दिलासाश्रीनगर/चंडीगड : पंजाब आणि हरियानातील...
शेवगाव, वैजू बाभूळगाव येथे लोकसहभागातून...नगर   ः दुष्काळाने होरपळ सुरू असताना...
पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनी आपले ज्ञान...बारामती, जि. पुणे  ः ज्याप्रमाणे...
पुणे विभागात ४२६२ शेततळ्यांची कामे पूर्णपुणे  ः दुष्काळी स्थितीत फळबागा, पिकांसाठी...
फसव्या भाजप सरकारला हद्दपार करा ः धनंजय...वरवट बकाल, जि. बुलडाणा   ः भाजप सरकारने...
कृषिक प्रदर्शनाला दिली दोन लाखांवर...बारामती, जि. पुणे  ः गेल्या चार दिवसांत दोन...
सरकारचे अपयश लोकांसमोर प्रभावीपणे...नगर   ः सरकार कामे करण्यापेक्षा घोषणा...
रस्ते विकासासाठी ३० हजार कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यात रस्ते विकासाचा भरीव...
प्रकाश संश्लेषणातून जीएम भात उत्पादनात...भात पिकामध्ये होणारी प्रकाश संश्लेषणाची क्रिया...
मराठवाड्यातील पाणीसाठे तळालाऔरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळाचं संकट...
अकोल्यात आंतरविद्यापीठ कर्मचारी क्रीडा...अकोला ः सुवर्ण जयंती क्रीडा महोत्सवातंर्गत येथे...
‘कर्जाची वरात मुख्यमंत्र्यांच्या दारात...नागपूर  ः शेतकऱ्यांचा सात-बारा उतारा सरसकट...
`सेवाकर प्रश्न मिटेपर्यंत सांगलीत...सांगली   : मुंबईत भाजप कार्यालयातील...
पुणे जिल्ह्यात गव्हाचे क्षेत्र ४१ हजार...पुणे  ः जमिनीत ओल नसल्याने यंदा रब्बी...