agriculture news in marathi, Minor growth in in dams | Agrowon

धरणांमधील जलसाठ्यात किरकोळ वाढ
टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

जळगाव ः जिल्ह्यातील पश्‍चिम भागातील मध्यम प्रकल्प कोरडेच आहे, तर गिरणा व वाघूर या धरणांच्या साठ्यात किरकोळ वाढ झाली आहे. रावेर तालुक्‍यातील मंगरूळ व सुकी हे मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले असून, तापी नदीवरील मुक्ताईनगर नजीकच्या हतनूर धरणाचे सर्व ३६ दरवाजे शुक्रवारी (ता. १७) उघडण्यात आले.

जळगाव ः जिल्ह्यातील पश्‍चिम भागातील मध्यम प्रकल्प कोरडेच आहे, तर गिरणा व वाघूर या धरणांच्या साठ्यात किरकोळ वाढ झाली आहे. रावेर तालुक्‍यातील मंगरूळ व सुकी हे मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले असून, तापी नदीवरील मुक्ताईनगर नजीकच्या हतनूर धरणाचे सर्व ३६ दरवाजे शुक्रवारी (ता. १७) उघडण्यात आले.

हतनूरमधून दोन लाख क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गिरणा नदीवरील गिरणा धरणात ३०.३४ टक्के जलसाठा आहे. तर वाघूर नदीवरील जामनेर व जळगाव नजीकच्या वाघूर धरणाचा साठाही फारसा वाढलेला नाही. तो ३६.३६ टक्के एवढाच आहे. चोपडा व धुळे जिल्ह्यातील शिरपूरनजीकच्या अनेर धरणाचा साठाही फारसा वाढलेला नसून, तो १८ टक्केच आहे. तर जळगाव जिल्ह्यातील बहुळा (पाचोरा), मन्याड (चाळीसगाव), अग्नावती, भोकरबारी, अंजनी हे पश्‍चिम भागातील प्रकल्प कोरडेच आहेत.

धुळ्यात हलका व मध्यम पाऊस
धुळे जिल्ह्यातील धुळे, शिंदखेडा, शिरपूर भागात हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या भागातील प्रकल्प, तलाव अजूनही कोरडेच आहेत. दुष्काळाचे संकट या भागावर कायम असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या जिल्ह्यातील अमरावती, पांझरा प्रकल्पाच्या साठ्यातही फारशी वाढ नोंदविण्यात आलेली नाही.

अनेक भागांत अतिवृष्टी
शुक्रवारी (ता. १७) सकाळी आठपर्यंत गिरणा भवनकडे असलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यात २४ तासांत अनेक भागांत अतिवृष्टी झाली आहे. त्यात रावेरात ६८ मिलिमीटर, चाळीसगावात ६६, रावेरात १२२, जामनेरात १२५, जळगावात ११० मिलिमीटर पाऊस झाला आहे. चोपडा, पाचोरा येथेही बऱ्यापैकी पाऊस झाला. अमळनेरातही ६८ मिलिमीटर पाऊस झाला. चोपडा तालुक्‍यातील अनेर प्रकल्पाच्या क्षेत्रात फक्त २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पारोळा, एरंडोल, धरणगाव, भडगाव येथेही ७२ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. यावल येथेही अतिवृष्टी झाल्याची माहिती मिळाली.

इतर बातम्या
खोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे   : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...
वाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...
उत्तर महाराष्ट्रात टंचाईच्या झळा तीव्रनाशिक : भूजल पातळीत वेगाने घट होत असल्याने उत्तर...
नगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
‘वसाका`च्या गळीत हंगामास प्रारंभकळवण, जि. नाशिक : विठेवाडी येथील वसंतदादा पाटील...
पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...
शेतीप्रश्नांसाठी तरुणांच्या चळवळीची गरज...वैराग, जि. सोलापूर : ‘‘शेतीचे प्रश्न वाढतायेत, ते...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
केळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव  ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
बोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
नगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर  ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...
जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली  : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...
राणी लक्ष्मीबाईंचे गाव बनले पाणीदारसातारा: झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे मूळ गाव म्हणजे...
हरभरा पेरणी ३३ टक्क्यांनी माघारलीनवी दिल्ली ः देशातील दुष्काळी स्थितीचा परिणाम...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...
विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य...पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने...