agriculture news in Marathi, minor land holder farmers three sons became MBBS, Maharashtra | Agrowon

अत्यल्प भूधारकाची तीन मुले ‘एमबीबीएस’
गोपाल हागे
सोमवार, 1 जानेवारी 2018

नववर्ष २०१८ विशेष...smiley smiley
------------------------------------------------------

नववर्ष २०१८ विशेष...smiley smiley
------------------------------------------------------
शिक्षणात खऱ्या अर्थाने जादू अाहे, हे बघायचे असेल तर मालेगाव (जि. अकोला) तालुक्यातील नेतन्सा गावात चला. शिक्षण हे वाघिणीचे दूध अाहे असे म्हटले जाते. हे सार्थकी ठरविण्याचे काम या छोट्याशा गावातील अत्यल्प भूधारक बाजड कुटुंबातील शेतकऱ्यांच्या मुलांनी दाखवून दिले. या शेतकऱ्याची एक, दोन नव्हे; तर तीनही मुले अाज वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वाचे गणले जाणारे ‘एमबीबीएस’ शिक्षण घेऊन डॉक्टर होत अाहेत.

वाशीम जिल्ह्यात असलेल्या नेतन्सा गावात तुकाराम बाजड यांना भगवान व विष्णू नावाची दोन मुले अाहेत. घरची परिस्थिती अत्यंत जेमतेम. दोघांत मिळून (भगवान व विष्णू) यांच्याकडे एक एकर शेती. एवढ्या शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा म्हटला तरी चांगल्या पद्धतीने होऊ शकत नाही. मात्र गरिबी, अार्थिक अडचणींबाबत कुठेही तक्रार न करता असलेल्या परिस्थितीत दोघांनीही अापापल्या मुलांना शिक्षणासाठी प्रेरित केले. पाठबळ दिले.

भगवान बाजड अापले मनोगत व्यक्त करताना....

भगवान बाजड यांना गोपाल, विशाल, अोम अशी तीन मुले. यातील मोठा मुलगा गोपाल हा एमबीबीएसचे शिक्षण घेऊन नुकताच डॉक्टर झाला. सध्या तो सांगलीत चांगल्या पगारात जॉब करतोय. दुसरा मुलगा विशाल हा एमबीबीएसच्या अंतिम वर्षाला अकोला येथील शासकीय महाविद्यालयात अाहे. तर सर्वांत लहान मुलगा अोम हा एमबीबीएसच्या द्वितीय वर्षात मिरज (सांगली) येथील शासकीय महाविद्यालयात शिकतो अाहे.

भगवान यांचा भाऊ विष्णू बाजड यांच्या दोन मुलांनीही वैद्यकीय क्षेत्राशी निगडित शिक्षण पूर्ण केले. त्यापैकी एक विठ्ठल याने डीफार्म तर मुलगी पूजा ही बीफार्म झाली. त्यांचा सर्वांत लहान मुलगा पवन हा वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करीत अाहे. बाजड कुटुंबातील नवी पिढी शिक्षणाच्या माध्यमातून वेगाने पुढे जात अाहे. या मुलांना गरजांसाठी दोन्ही भावांनी जिवाचे रान केले. गावाला लागूनच त्यांचे एकरभर शेत अाहे. यात दोन्ही भावांचे कुटुंब राबते. भाजीपालावर्गीय पिके घेतली जातात. काम नसेल तेव्हा भगवान हे दुसऱ्याची मोलमजुरीसुद्धा करतात.

विष्णू यांनी आॅटोरिक्षा घेतली असून, ते स्वतः चालवितात. अाजही टिनपत्र्याच्या घरात भगवान व सुनीता, तर लहान भाऊ विष्णू हे शेतातील घरात राहतात. भगवान यांच्या तीनही मुलांनी चांगले गुण मिळवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच प्रवेश मिळवला. त्यामुळे डोनेशन द्यावे लागले नाही. तरीही प्रत्येक वर्षाचा एका मुलाचा खर्च किमान एक लाखापर्यंत होतो.

एकाही बँकेने अार्थिक ‘पत’ नसल्याचे कारण देत उभे केले नाही. अखेर दोन म्हशी विकल्या. नातेवाइकांनीही आर्थिक मदत केली. भावाने अाॅटो चालवून कुटुंबाला मदत केली. काही दानशूरांनीही मानसिक व अार्थिक पाठबळ दिले. खासकी शिक्षकांनी फी घेतली नाही. या जिद्दीतूनच तीनही मुलांनी अभ्यास कमी पडून दिला नाही. अाई-वडिलांनी घेतलेल्या कष्टाची मुलांनाही जाणीव अाहे.

शेतीची साथ
दोन्ही भावांत मिळून केवळ एकरभर शेती अाहे. पण ही शेती ठामपणे पाठिशी अाहे. यात भाजीपालावर्गीय पिके घेतली जातात. या वर्षी ९० हजारांची फुलकोबी विकली. मागील दोन-तीन वर्षांपासून हे पीक चांगले पैसे देत असल्याचे भगवान यांनी सांगितले. या शेतात ते कोबी, कांदा, हरभरा अशी पिके घेतात.

भगवान बाजड, ९६८९२७१६६७ 

इतर अॅग्रो विशेष
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...
क्रांती कारखाना हुमणीचे भुंगेरे खरेदी...कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
परवानाधारक व्यापाऱ्यांनीच केळीची खरेदी...जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...