agriculture news in marathi, The minor projects came on 27 percent in marathawada | Agrowon

मराठवाड्यातील लघू प्रकल्प आले २७ टक्‍क्‍यांवर
टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 फेब्रुवारी 2018

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८६४ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह विविध नद्यांवरील बंधाऱ्यांमधील उपयुक्‍त पाणी झपाट्याने आटते आहे. आटणाऱ्या या पाण्याने चिंतेत भर घालणे सुरू केले आहे. मराठवाड्यातील ७४३ लघू प्रकल्पांत केवळ २७ टक्‍के उपयुक्‍त पाणी शिल्लक असून ७५ मध्यम प्रकल्पांतही केवळ ३९ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. औरंगाबाद जिल्हा टंचाईच्या सर्वाधिक रडारवर असल्याचे चित्र आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८६४ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह विविध नद्यांवरील बंधाऱ्यांमधील उपयुक्‍त पाणी झपाट्याने आटते आहे. आटणाऱ्या या पाण्याने चिंतेत भर घालणे सुरू केले आहे. मराठवाड्यातील ७४३ लघू प्रकल्पांत केवळ २७ टक्‍के उपयुक्‍त पाणी शिल्लक असून ७५ मध्यम प्रकल्पांतही केवळ ३९ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. औरंगाबाद जिल्हा टंचाईच्या सर्वाधिक रडारवर असल्याचे चित्र आहे.

मराठवाड्यात एकूण ७४३ लघू प्रकल्प आहेत. या लघू प्रकल्पांमध्ये आजघडीला केवळ २७ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी १६ फेब्रुवारी २०१७ अखेर या प्रकल्पांमध्ये ४४ टक्‍के तर १६ फेब्रुवारी २०१६ अखेर ५ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक होता. परभणी जिल्ह्यातील २२ लघू प्रकल्पात सर्वात कमी १३ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक असून त्यापाठोपाठ हिंगोली जिल्ह्यातील २७ प्रकल्पात १४ टक्‍के, औरंगाबाद जिल्ह्यातील ९० प्रकल्पात १७ टक्‍के, जालना जिल्ह्यातील ५७ प्रकल्पात १८ टक्‍के तर नांदेड जिल्ह्यातील ८८ लघू प्रकल्पांत केवळ १९ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे.

परतीचा पाऊस बरा झालेल्या बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील लघू प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठ्याची स्थिती यापेक्षा थोडी बरी असली तरी समाधानकारक मात्र नक्‍कीच नाही. बीड जिल्ह्यातील १२६ लघू प्रकल्पात ३७ टक्‍के, लातूर जिल्ह्यातील १३२ प्रकल्पात ३२ टक्‍के तर उस्मानाबाद जिल्ह्यातील २०१ लघू प्रकल्पात केवळ ३४ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे.

या सर्वच जिल्ह्यांमधील लघू प्रकल्पात गतवर्षी २८ ते ५९ टक्‍क्‍यांदरम्यान उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक होता. अकरा मोठ्या प्रकल्पांमध्ये ४३ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. या अकरा प्रकल्पांपैकी येलदरी व उर्ध्व पेनगंगा या दोन प्रकल्पांमध्ये प्रत्येकी पाच टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे.

मोठ्या प्रकल्पांपैकीच एक असलेल्या निम्न मनार प्रकल्पातही केवळ १३ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. तर अनेक वर्षानंतर प्रथमच काठोकाठ भरलेला जायकवाडी प्रकल्पही फेब्रुवारीच्या मध्यान्हातच ७० टक्‍क्‍यांवर आला आहे. मोठ्या प्रकल्पांपैकी बीड जिल्ह्यातील मांजरा व उस्मानाबाद जिल्ह्यातील निम्न तेरणा प्रकल्पातच ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

औरंगाबाद जिल्ह्यात १६ मध्यम प्रकल्प आहेत. या सोळाही मध्यम प्रकल्पांपैकी ९ प्रकल्पांमध्ये उपयुक्‍त पाणीसाठाच शिल्लक नाही. ज्या सात प्रकल्पांमध्ये उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे, तोही ८ टक्‍क्‍यांच्या पुढे नाही.

दहा मध्यम प्रकल्प कासावीस
मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांपैकी दहा मध्यम प्रकल्प कासावीस झाले आहेत. औरंगाबादमधील नऊ व नांदेड जिल्ह्यातील महालिंगी या मध्यम प्रकल्पाचा यामध्ये समावेश आहे. उपयुक्‍त पाणीसाठाच शिल्लक नसलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ प्रकल्पांमध्ये लाहूकी, गिरजा, वाकोद, खेळणा, अंजना पळशी, शिवना टाकळी, टेंभापुरी, नारंगी, बोरदहेगाव या प्रकल्पांचा समावेश आहे.

इतर ताज्या घडामोडी
हवामान बदलावर संवर्धित शेती हेच उत्तगेल्या दोन दशकांपासून महाराष्ट्रामध्येही...
कृषी सल्लाधान्य साठवण : मळणीनंतर धान्याची साठवण...
बोंडअळीग्रस्त, धान उत्पादकांना संयुक्त...मुंबई : राज्यात गुलाबी बोंडअळी आणि धान...
लाळ्या खुरकूत लस पुरवठा विलंबाच्‍या...पुणे  ः लाळ्या खुरकूत लसींच्या पुरवठ्याच्या...
कोरडे, उष्ण हवामान राहून तापमानाची...महाराष्ट्रासह दक्षिण, मध्य, उत्तर व ईशान्य...
नेदरलॅंडमध्ये साठवण, निर्यातीसाठी खास...वातावरणातील बदल लक्षात घेता कांदा पिकांच्या नव्या...
राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांच्या...नगर : शेतमालाला दर मिळण्यासह अन्य...
हमीभाव खरेदी केंद्रांवर हमालीच्या...अकोला : अाधारभूत किमतीने सुरू असलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात होणार दोन हजार ९६ पीक... पुणे   ः रब्बी हंगामातील पिकांची...
पुणे जिल्ह्यात ११ हजार कांदा चाळींची...पुणे  ः कांद्याचे अधिक उत्पादन झाल्यास...
तेवीस कारखान्यांकडून ७७ लाख ६३ हजार टन... औरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
पुढील महिन्यापासून ‘समृद्धी’चे काम... वाशीम : नागपूर-मुंबई कृषी समृद्धी जलदगती...
‘वैद्यनाथ साखर’चा परवाना दहा दिवसांसाठी... बीड : अन्न व औषधी प्रशासनाने केलेल्या तपासणीत...
शेतीकामासाठी सालगड्यांची कमतरताअमरावती  ः गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन...
राज्यात ‘जलयुक्त’साठी २०८ कोटींचा निधीनगर ः दुष्काळमुक्तीसाठी राबविण्यात येत असलेल्या...
वीजजोडणीसाठी शेतकऱ्याचा आत्मदहनाचा...नगर : पैसे भरल्यानंतर वारंवार मागणी करूनही...
चिंचेचे उत्पादन २० टक्क्यांनी वाढणारसांगली : चवीने आंबट असणारी चिंच यंदा गोड झाली आहे...
परभणी, नांदेड जिल्ह्यांतील २०१७ गावांना...परभणी : २०१७-१८ च्या खरीप हंगामातील पिकांची...
जलयुक्तच्या कामांना टक्केवारीचे ग्रहणअकोला ः जलयुक्त शिवार योजनेला जसजसा अधिक कालावधी...
कृषी पर्यटनाला मिळणार जुन्नर तालुक्यात...पुणे: आैद्याेगिक विकासाला मर्यादा असल्याने...