agriculture news in marathi, Miraj taluke top in Farmland Creation | Agrowon

मिरज तालुक्‍यात शेततळ्यांचा उच्चांक
टीम अॅग्रोवन
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

मिरज, जि. सांगली : एखादी योजना प्रभावी पणे राबविली तर ती योजना शेतकऱ्यांना फायदा देणारी ठरते. शासनाची मागेल त्याला शेततळे योजना राज्यात प्रभावीपणे राबविल्याचे दिसून येत आहे. याचा प्रत्यय मिरज तालुक्‍यात दिसून आला आहे. मिरज येथील तालुका कृषी कार्यालयाने तालुक्‍यात गेल्या दोन वर्षांत ५२४ शेततळी घेतली असून, त्यामुळे सुमारे ५० कोटी लिटर पाणी साठा होणार आहे.

मिरज, जि. सांगली : एखादी योजना प्रभावी पणे राबविली तर ती योजना शेतकऱ्यांना फायदा देणारी ठरते. शासनाची मागेल त्याला शेततळे योजना राज्यात प्रभावीपणे राबविल्याचे दिसून येत आहे. याचा प्रत्यय मिरज तालुक्‍यात दिसून आला आहे. मिरज येथील तालुका कृषी कार्यालयाने तालुक्‍यात गेल्या दोन वर्षांत ५२४ शेततळी घेतली असून, त्यामुळे सुमारे ५० कोटी लिटर पाणी साठा होणार आहे.

तालुका कृषी विभागाने २०१६-१७ आणि २०१७-१८ मध्ये जोरदार कामगिरी करत उच्चांकी संख्येने शेततळी मंजूर केली. बागायत शेतीकडे वळलेल्या शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घेत पाणीसाठी केला. गेल्या काही वर्षांत म्हैसाळ योजनेतून नियमित उपसा होऊ लागल्याने शेतकरी बागायती पिकांकडे वळले. द्राक्षबागा व उसाचे क्षेत्र वाढले. काहीवेळा म्हैसाळ योजना थकबाकीस्तव बंद राहू लागल्याने बागायतींपुढे पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले.

त्यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी शेततळ्यांना प्राधान्य दिले. आजमितीस तब्बल पन्नास कोटी लिटर इतका पाणीसाठा शेततळ्यांमुळे झाला आहे. त्यासाठी शासनाकडून तब्बल सव्वादोन कोटी रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना मिळाले आहे.

सोनी गावात सर्वाधिक शेततळी
शासनाच्या अनुदानातून सोनी गावात ११० शेततळी शेतकऱ्यांनी घेतली आहेत. या गावात द्राक्ष बागायतीद्वारा गावाचा आर्थिक कायापालट करणाऱ्या सोनीच्या शेतकऱ्यांनी पाण्यासाठी शेततळ्यांचा आधार घेतला. संपूर्ण द्राक्ष शेतीला या शेततळ्याचा आधार मिळतोय. टॅंकरवरचा खर्च कमी करत सोनीचे शेतकरी शेततळ्यांमुळे पाण्याच्या बाबतीत स्वावलंबी झाले आहेत. यामध्ये करोली ६५, मालगाव ४७, भोसे ५७ आणि आरग येथे ४० शेततळे आहेत.

इतर ताज्या घडामोडी
कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी  : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...
नाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक  : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...
शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा   ः तुम्ही संकटात असताना...
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...