agriculture news in Marathi, mission for crop loan participation, Maharashtra | Agrowon

राज्यात आता पीकविमा शेतकरी सहभाग अभियान
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 मे 2019

पुणे: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात पीकविमा योजनेत सहभागी होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ‘पीकविमा शेतकरी सहभाग अभियान’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी अग्रोवनला दिली.

पुणे: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात पीकविमा योजनेत सहभागी होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ‘पीकविमा शेतकरी सहभाग अभियान’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी अग्रोवनला दिली.

 शेतकऱ्यांपर्यंत अद्यापही माहिती पोचलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह विम्या कंपन्या, सीएससी (सेवा केंद्र) चालकांना पीकविमा कामकाज विषयक प्रशिक्षण दिले जाईल. त्यासाठी मास्टर्स ट्रेनर्स तयार केले जात असून सध्या ट्रेनर्सचे प्रशिक्षणदेखील सुरू आहे. विमा योजनेचे स्वरूप, त्यातील नियमावली, अधिकार, जबाबदाऱ्या तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील तक्रार निवारण समितीचे कामकाज या मुद्दांवर सखोल माहिती शेतकऱ्यांना प्रशिक्षणातून दिली जाईल, असे श्री. दिवसे म्हणाले.
 
खरिपाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कृषी खात्याने हंगामपूर्व नियोजनाचे कामकाज पूर्ण केले आहे. कीटकनाशके, खते, बियाण्यांची टंचाई भासणार नाही. मी स्वतःही राज्यभर दौरे केले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय आढावा बैठकीत या नियोजनाला परिपूर्ण रूप मिळेल. बैठकीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. 

“आयुक्तालय स्तरावरून काही योजना लादण्यापेक्षा क्षेत्रीय मागणीचे आराखडे तयार करा, असे राज्यभर आम्ही सांगितले आहे.  शेतकऱ्यांची नेमकी गरज, संबंधित जिल्हा किंवा तालुक्याचे कृषी वैशिष्ट्ये, पाण्याची उपलब्धता तपासून अधिकारी आपआपले क्षमता आराखडे देतील. या आराखड्यानुसार आम्ही निधी व पाठबळ देणार आहोत”, असेही आयुक्त म्हणाले. 

खरिपात सर्वांत जास्त लक्ष बोंड अळी, हुमणी आणि फॉल अर्ली वर्म अशा तीन किडींच्या नियंत्रणावर दिले जाईल. त्यासाठी क्रॉपसॅप योजना अधिक स्मार्ट करण्यात आली आहे. त्याला यंदा १२ हजार शेतीशाळा संलग्न करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगली प्रात्यक्षिके बघण्यास मिळतील. बांधावरच लागवड ते काढणीपर्यंत प्रशिक्षण मिळेल. कोकणात शेतीशाळा सुरू देखील झाल्या आहेत, असे आयुक्तांनी सांगितले. 

विस्तार संकल्पना व्यापक करणार 
कृषी विभागाकडे राज्यातील शेती व शेतकऱ्यांचा अफाट ‘डेटा’ तयार झालेला आहे. त्याचा वापर करण्यासाठी आम्ही एक ऑनलाइन व्यासपीठ (इंटिग्रेटेड ऑनलाइन प्लॅटफॉर्म) तयार करणार आहोत. त्यात क्रॉपसॅप, पीकविमा, महावेध, बाजारभाव, अनुदान योजना अशी सर्व माहिती एकत्रितपणे देण्याचे प्रयत्न चालू आहेत. शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञानाच्या साह्याने कृषी विस्तार व्यापक करण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे, अशी माहिती कृषी आयुक्तांनी दिली. 

खरीप हंगाम नियोजनाची वैशिष्ट्ये

  • पीकविम्याबाबत राज्यव्यापी प्रशिक्षण 
  • १२ हजार शेतीशाळांमधून माहितीचा प्रसार
  • क्रॉपसॅप व शेतीशाळा कामकाजाचे एकत्रीकरण 
  • गरज व क्षमतेनुसार तालुक्याचे कृषी विकास आराखडे 
  • काजू, सीताफळ, पेरू, संत्रावर्गीय पिके, बांबूला प्रोत्साहन
  • गटशेतीला चालना देण्यासाठी काही भागांत ‘क्लस्टर बेस’ काम
  • किसान कॉल सेंटरच्या कामाला प्रोत्साहन

इतर बातम्या
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी पाच दिवसांत...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
संत्रा, मोसंबी उत्पादकांना हेक्टरी एक...अमरावती : जिल्ह्यातील तापमान, पाणीटंचाई आणि...
नाशिक जिल्ह्यात भात लागवडीपूर्व कामे...नाशिक  : जिल्ह्यात भात उत्पादन घेणाऱ्या अनेक...
गतवर्षी नष्ट झाल्या ४० टक्के मधमाशी...गेल्या वर्षी एप्रिल २०१८ ते एप्रिल २०१९ या...
विखे, क्षीरसागरांना मंत्रीपदे देऊन...नाशिक : ‘‘घटना माहीत असूनही त्याविरोधात निर्णय...
पाऊसकाळातही मराठवाडा टॅंकरग्रस्त औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ५७ लाख...
रत्नागिरी : बळिराजाला आता आर्द्रा...रत्नागिरी :  मृग नक्षत्रात पावसाने पाठ...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील ८४...लातूर  : मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर...
सांगलीसह पश्‍चिमेकडे पाऊस सांगली : दोन दिवसांपासून पावसाने पश्‍चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
परभणी जिल्ह्यात ‘जलयुक्त'च्या ७२ गावांत...परभणी : जिल्ह्यात यंदा मोसमी पावसाचे आगमन उशिरा...
सोलापूर झेडपी सदस्यांची दुष्काळापेक्षा...सोलापूर : दुष्काळाच्या दाहकतेत जिल्हा पुरता...
पुणे जिल्ह्यात होणार...पुणे : दरवर्षी शेती कामांसाठी मजुरांची चांगलीच...
बांबू उत्पादनवाढीसाठी पुणे जिल्ह्यातील...पुणे  ः बांबू उत्पादनवाढीसाठी भोर, वेल्हा...
नगर जिल्ह्यातील ६३६ वैयक्तिक पाणी योजना...नगर  ः जिल्ह्यात यंदा दुष्काळाचा सर्वाधिक...
पाच जिल्ह्यांतील ६६८ छावण्यांमध्ये चार...औरंगाबाद  : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत...
पीकविमा अर्ज करण्यासाठी तालुका कृषी...मुंबई ः पीकविम्याबाबतच्या तक्रारी लक्षात...
‘लोकमंगल’प्रकरणी विधान परिषदेत गोंधळमुंबई : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा मुलगा...
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना लेखी,...मुंबई ः राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील...
तुरळक ठिकाणीच जोरदार पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती...