agriculture news in marathi, mitigating global poverty and hunger by improving crop production | Agrowon

धान्योत्पादनवाढीतून गरिबी, भुकेचा सामना
पीटीआय
बुधवार, 15 नोव्हेंबर 2017

"आयआरआरआय' येथे दिलेली भेट माझ्यासाठी नेहमी स्मरणात राहील. येथे अतिशय उत्तम पद्धतीने काम सुरू असून, येथील संशोधनाचा जगभरातील शेतकऱ्यांना विशेषत: आशिया अफ्रिकेतील शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळत आहे.
-नरेंद्र मोदी, पंतप्रधान

लॉस बनॉस, फिलिपिन्स : जगासमोर आज गरिबी आणि भूक व कुपोषणाची सर्वांत मोठी समस्या आहे. याचा सामना करण्यासाठी प्रमुख धान्य पिकांची लागवड आणि धान्योत्पादनवाढ करावी लागणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (ता. 13) केले.

पंतप्रधानांनी सोमवारी येथील आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेला भेट दिली. येथील जीन बॅंकेमध्ये दोन भारतीय मुळाचे भात वाण भेट म्हणून दिले. त्यानंतर मनिला येथे मोदी यांनी भारतीय शास्त्रज्ञांना संबोधित केले. पंतप्रधान म्हणाले, की येथील भात संस्थेत काम करणाऱ्या शास्त्रज्ञ, संशोधक आणि विद्यार्थ्यांना भेटून आनंद झाला आहे. भारतातील आयसीएआर आणि फिलिपिन्सचे आयआरआरआय गेल्या चार दशकांपासून एक दुसऱ्याला सहकार्य करत आहेत. भात संस्थेच्या नियोजन, व्यवस्थापन आणि अंमलबजावणीसारख्या अनेक महत्त्वपूर्ण बाबींमध्ये भारताचेही मत विचारात घेण्यात येत असते. भूक, कुपोषण यासारख्या समस्यांवर अधिक उत्पादनक्षम धान्यपिकांची लागवड हा उपाय आहे.

परराष्ट्र व्यवहाराचे प्रवक्ते रविश कुमार यांनी या वेळी "आयआरआरआय'च्या सहकार्याने ओडिशातील दोन लाख महिला शेतकऱ्यांना क्षमतावृद्धी आणि सुधारित कृषी तंत्रज्ञानाची मदत केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.

इतर अॅग्रो विशेष
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...
कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
सांगली जिल्ह्यात बेदाणा उत्पादनात वाढ,...सांगली ः बेदाणा निर्मितीसाठी प्रतिकूल वातावरण...
तिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाणसिंधुदुर्ग : वायुवादळामुळे समुद्राला आलेले...
खरीप हंगामासाठी भेंडीची नवी जातचिपळूण ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
कोकणात बरसणार पूर्वमोसमीच्या सरीपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात...
दुष्काळ सांगतो ‘जपून वापरा पाणी’हवामानाच्या नुकत्याच व्यक्‍त झालेल्या अंदाजानुसार...
‘असर’दार शिक्षणासाठी...कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी...
मॉन्सूनची दक्षिण कर्नाटकपर्यंत चालपुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
गुजरातवरील ‘वायू' संकट तूर्त टळलेअहमदाबाद/ नवी दिल्ली : गुजरात किनाऱ्याच्या दिशेने...
मोगरा शेतीतून दरवळला यशाचा सुगंध...ॲग्रोवनमध्ये मोगरा शेतीची यशकथा वाचून कवठेमहांकाळ...
‘राजवाडी पॅटर्न’द्वारे शंभर एकर जमीन...पावसाळ्यात भरपूर पाऊस, उन्हाळ्यात पाण्याचे...
छत्रपती शाहू महाराज यांनी...कागल, जि. कोल्हापूर ः महाराष्ट्रात राजर्षी शाहू...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज पुणे ः अरबी समुद्रात धुमाकूळ घालणाऱ्या वायू...
'पशुसंवर्धन'मध्ये अखेर नव्याने बदल्यानागपूर ः विश्‍वासात न घेताच बदल्या केल्याचा ठपका...