agriculture news in marathi, MLA Bacchu Kadu to agitate on milk issue tommorow | Agrowon

गायी-म्हशींसह उद्या मंत्रालयावर मोर्चा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 8 मे 2018

मुंबई : दुधाला दर मिळावा यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला अधिक धार येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्यावतीने ९ मे रोजी मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे.

मुंबई : दुधाला दर मिळावा यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला अधिक धार येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्यावतीने ९ मे रोजी मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे.

राज्य सरकारने गायीच्या दुधाला २७ रुपये आणि म्हैशीच्या दुधाला ३६ रुपये दर जाहीर केला असला, तरी हे दर देण्यात सहकारी तसेच खासगी दूध संस्थांनी असमर्थता दर्शवल्याने गेल्या काही दिवसांपासून राज्यात दूध दराचे आंदोलन पेटले आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक आंदोलकांनी मोफत दूध वाटपाचे कार्यक्रमही घेतले आहेत. मात्र, तरीही सरकारकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप करीत अमरावतीचे आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने ९ मे रोजी मंत्रालयावर मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले आहे. 

दुधाला दर मिळावा, सहकारी दूध संस्थांवर कारवाई करावी, तसेच शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर लूट करणाऱ्या खासगी दूध संघांवर नियंत्रण आणावे. सध्या कोणतेच नियंत्रण नसल्याने अथवा सरकारला कारवाई करण्याचे कोणतेच अधिकार नसल्याने खासगी दूध संस्थांनी शेतकऱ्यांना लुबाडण्याचे काम चालवले असल्याचे कडू यांनी सांगितले. या मागण्यांसाठी मंत्रालयावर गायी म्हैशीसह मोर्चा काढण्यात येणार आहे. प्रसंगी मंत्र्यांच्या दालनात घुसून आपल्या मागण्या मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार कडू यांच्या आंदोलनाची स्टाईल आणि पद्धत पाहता ते मंत्रालयात गायी म्हैशींसह घुसल्यास आश्चर्य वाटणार नाही, त्यामुळे सुरक्षा यंत्रणा आतापासूनच सतर्क राहिल्या आहेत.

इतर अॅग्रो विशेष
‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...
परभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...
सीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...
ब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...
गोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...
शेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...
राज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...
संत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...
फॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...
चिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...