agriculture news in marathi, MLA Bacchu kadu assures support to | Agrowon

कष्टाचे पैसे ना बे?... बुडवणा-यांचं टाळकं फोडू : आमदार बच्चू कडूंचा शेतकऱ्यांना वऱ्हाडी दिलासा
सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 एप्रिल 2018

आमदार बच्चू कडू यांची आता शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांकडे नजर वळली आहे. कडु यांनी नाशिक जिल्ह्यातील फसवूक झालेल्या कांदा उत्पादकांकडून प्रश्न समजून घेत जिल्हाभर मोठे जनआंदोलन उभे करण्याचा निर्धार केला आहे.

येवला, जि. नाशिक : तुमचे कष्टाचे पैसे ना बे, मग घाबराले काय झालं..... शेतक-याचे पैसे व्यापारी पण लुटून राहिले ना भाऊ.... त्यांच्या टाळक्यात प्रहार करायला मागपुढं कामुन पहायचं... घाबरायचं नाही.... बच्चु कडू आहे तुमच्या सोबत.... असं सांगत आमदार बच्चू कडू यांनी आपल्या खास व-हाडी स्टाईलमध्ये येवल्याच्या शेतक-यांचे आंदोलन आपल्या हाती घेतले. त्यामुळे या शेतक-यांना धीर मिळाला. 

आतापर्यंत निराधार, निराश्रीत, दिव्यांग आदींचे प्रश्‍न सोडविण्यासाठी कायदा हातात घेऊन चर्चेत राहिलेल्या आमदार बच्चू कडू यांची आता शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांकडे नजर वळली आहे. कडु यांनी नाशिक जिल्ह्यातील फसवणूक झालेल्या कांदा उत्पादकांकडून प्रश्न समजून घेत जिल्हाभर मोठे जनआंदोलन उभे करण्याचा निर्धार केला आहे.
  
वैजापूर येथील शहीद जवान किरण थोरात यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी आमदार कडू आले होते. यावेळी येवला येथील व्यापाऱ्यांकडून फसवणूक झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेतली. "तुमचे कष्टाचे पैसे ना बे, मग घाबराले काय झालं ? शेतकऱ्यांना सर्वेच लुटून राहिले. आता तर व्यापारी पण पैसे बुडूवून राहिले ना भाऊ, मग त्यांच्या टाळक्‍यात प्रहार करायला माग पुढं कामुन पहायचं?... तुमच्या सोबत बच्चू कडू आहे ना बे...पण आधी तुह्या अधिकाराची तर जाणीव करून घेशील ना,".... अशा खास वऱ्हाडी स्टाईलमध्ये आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. 

त्यांनी येवल्यातील शेतकऱ्यांना पैशांसाठी लढण्याचा सल्ला दिला. या वेळी कांदा ऊत्पादक शेतकऱ्यांना आपण न्याय मिळवून देऊ. ज्या शेतकऱ्यांचे पैसे बुडवण्याचा प्रयत्न व्यापारी करत आहेत त्यांना धडा शिकवू, असे आमदार कडू यांनी स्पष्ट केले. येथील फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांची यादीच यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष हरीभाऊ महाजन, उपाध्यक्ष वसंत झांबरे यांनी आमदार कडू यांना दिली. 

येवल्यातील व्यापाऱ्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केल्यामुळे मागील आठवड्यात बेमुदत उपोषणास बसलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून संपत आहेर, बाबासाहेब तुपे, कैलास चव्हाण, भास्कर कदम, गणपत सत्रे, शांताराम तुपे, विनायक थोरात, दत्तात्रय चव्हाण, श्रावण चव्हाण यांनी पैसे मिळत नसल्याची व्यथा मांडली.

इतर ताज्या घडामोडी
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...