दूध प्रश्नी सर्रास लूट सुरू असून, ती थांबली पाहिजे

सर्रास लूट सुरू असून, ती थांबली पाहिजे
सर्रास लूट सुरू असून, ती थांबली पाहिजे

मुंबई : आम्ही पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्याकडे दुधाला सरकारने जाहीर केलेला दर मिळायलाच हवा आणि सध्या दूध संघांकडून ‘पॉइंट’च्या माध्यमातून सर्रास लूट सुरू असून, ती थांबली पाहिजे अशी मागणी केली. यावर मंत्र्यांनी याबाबत तातडीने शुद्धिपत्रक काढणार असल्याचे सांगितले, अशी माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली.  आमदार कडू म्हणाले, की भाव कमी देणाऱ्या दूध संघांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीवर तयारी सुरू असल्याचे मंत्री म्हणाले. सरकार भुकटीसाठी ज्याप्रमाणे अनुदान देते ते थेट शेतकऱ्याला द्या. तसे करता येत नसेल तर दुधाळ जनावरांसाठी दिले पाहिजे या मागणीवर मंत्रिमंडळासमोर चर्चा करू असे अाश्वासन जानकर यांनी दिले आहे. दुधाचा हमीभाव दरवर्षी जाहीर व्हावा, रासायनिक खतांना जशी सबसिडी मिळते तसे अनुदान गायीच्या शेणखताला द्यावे या मागणीबाबत सकारात्मक चर्चा झाली. याशिवाय गोरक्षण संस्थांना भाकड गायी सांभाळण्यासाठी जसे अनुदान मिळते ते शेतकऱ्याला द्या, अशी मागणी करण्यात अाली. दुधातील भेसळ रोखण्यासाठी विविध विभागांतील अधिकाऱ्यांचे पथक बनवून येत्या १५ दिवसांत धाडी टाकल्या जातील, असे अाश्वासन श्री. जानकर यांनी या वेळी दिले असल्याची माहिती, आमदार बच्चू कडू यांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com