agriculture news in marathi, MLA Bacchu Kadu will stay in tent in every village in consituency | Agrowon

"आमदारांची राहुटी आपल्या गावात ' : आमदार बच्चू कडूंचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

अकोला : शासन व प्रशासकीय यंत्रणेच्या गलथान कारभारामुळे सर्वसामान्य जनतेची होत असलेली कुचंबणा थांबविण्यासाठी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी "आमदारांची राहुटी आपल्या गावात' हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमातंर्गत आमदार कडू विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह मतदार संघातील प्रत्येक गावात जाऊन जनतेच्या प्रलंबीत समस्या, प्रश्न सोडवित आहेत. 

अकोला : शासन व प्रशासकीय यंत्रणेच्या गलथान कारभारामुळे सर्वसामान्य जनतेची होत असलेली कुचंबणा थांबविण्यासाठी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी "आमदारांची राहुटी आपल्या गावात' हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमातंर्गत आमदार कडू विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह मतदार संघातील प्रत्येक गावात जाऊन जनतेच्या प्रलंबीत समस्या, प्रश्न सोडवित आहेत. 

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर बच्चू कडू म्हणजे एक वेगळेच रसायन म्हणून ओळखले जाते. शेतकरी, मजूर, कामगार, कर्मचारी, दिव्यांग आणि सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी अनेक नाविन्यपूर्ण आंदोलने करून अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची नेहमीच धडपड सुरू असते. 

सर्वसामान्य जनतेला आपले प्रलंबीत प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी शासकीय कार्यालयाचे उबंरठे झिजवावे लागतात. मात्र, शासन व प्रशासकीय यंत्रणेच्या वेळकाढू धोरणांमुळे समस्या सुटत नसल्याचे चित्र अनेक कार्यालयात पहायला मिळते. सर्वसामान्य जनतेची होणारी अशी कुचंबना थांबविण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी "आमदारांची राहुटी आपल्या गावात' हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. 

या उपक्रमातंर्गत आमदार बच्चू कडू विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसह स्वतः गावात जाऊन सर्वसामन्य जनतेचे प्रश्न सोडवित आहेत. एक जानेवारी पासून सुरू झालेला हा उपक्रम सहा फेब्रुवारी 2018 पर्यंत राबविण्यात येणार आहे. या उपक्रमातंर्गत अचलपूर व चांदूर बाजार तालुक्‍यातील प्रत्येक गावातील 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना पासपोर्ट फोटो देणे, संजय गांधी निराधार योजना, नवीन रेशनकार्ड, जीण झालेल्या रेशनकार्डचे नूतनीकरण, शेतीच्या कागदपत्रातले बादल, श्रावणबाळ निराधार योजनेसह विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात येत आहे. 
 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...