अतिरिक्त दुधाला अनुदान द्या : बाळासाहेब थोरात

आमदार बाळासाहेब थोरात
आमदार बाळासाहेब थोरात
संगमनेर, जि. नगर ः खासगी दूध संघ शेतकऱ्यांना कमी भाव देत असून, सहकारी दूध संघ मात्र नियमाप्रमाणे भाव देत आहे. त्यामुळे दोन्ही संघाच्या विक्रीत मोठी तफावत होत आहे. त्यासाठी अतिरिक्त दुधावर पर्याय म्हणून शासनाने प्रतिलिटर किमान ५ ते ७ रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.
 
अमृतवाहिनी शिक्षण संस्थेत झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार थोरात यांनी ही मागणी केली. ते पुढे म्हणाले, की दूध व्यवसायामुळे ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था मजबूत केली आहे. या दूध व्यवसायाला सरकारने पालकाची भूमिका घेत मदत केली पाहिजे.
 
सध्या राज्यात दुधाचे उत्पादन वाढले आहे. अशावेळी खासगी दूध संघ मनमानी करत १८ ते १९ रुपये भाव देत आहेत; मात्र सहकारी दूध संघ शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे भाव देत आहे. कमी भावाने दूध खरेदी केल्यामुळ हे खासगी दुधवाले कमी भावाने दुधाची विक्री करत आहेत. त्यामुळे सहकारी दूध संघांची विक्री कमी होत आहे. अशी परिस्थिती राहिल्यास सहकारी दूध संस्था मोडकळीस येतील.
 
भाजप सरकारने कर्जमाफीची जाहिरात मोठी केली; परंतु अद्याप कोणालाही कर्जमाफी मिळाली नाही. फक्त मी लाभार्थींच्या मोठ्या जाहिराती सुरू आहेत. अनेक उद्योगपती, कारखानदार यांनाही सरकारने लाभ दिला आहे; मात्र त्यांच्या पोटाला लाभार्थींच्या पाट्या चिटकवल्या नाहीत? गरीब शेतकऱ्याला मात्र काहीही लाभ न देता त्याच्या पोटाला लाभार्थीची पाटी चिटकवून जाहिराती करणे खेदजनक आहे, अशी टीका त्यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com