पाण्यासाठी दुष्काळी भागातील आमदारांना एकत्र करणार ः आमदार देशमुख

पाण्यासाठी दुष्काळी भागातील आमदारांना एकत्र करणार ः आमदार देशमुख
पाण्यासाठी दुष्काळी भागातील आमदारांना एकत्र करणार ः आमदार देशमुख

मंगळवेढा, जि. सोलापूर : सोलापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांतील दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १३ तालुक्‍यांना पाणी मिळावे, यासाठी नागनाथअण्णा नाईकवाडी यांनी सुरू केलेली पाणी चळवळ आता तरुणांनीच हाती घ्यावी; पण आपण स्वतः दुष्काळी भागातील सर्व आमदारांना एकत्र आणून म्हैसाळ, टेंभूचा पाणीप्रश्‍न विधिमंडळात मांडू, असे आमदार गणपतराव देशमुख यांनी मंगळवारी (ता.२६) सांगितले.

मंगळवेढा येथील यशवंत मैदानावर रौप्यमहोत्सवी पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी आमदार देशमुख बोलत होते. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, पाणी परिषदेचे निमंत्रक वैभव नाईकवाडी, आमदार भारत भालके, नगराध्यक्षा अरुणा माळी, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, शरद पाटील, सांगोला पंचायत समितीच्या सभापती मायाक्का यमगर, बाबूराव गुरव, माजी आमदार विश्‍वनाथ चाकोते, नगरसेवक चेतन नरोटे, पाणी  संघर्ष समितीचे अध्यक्ष शिवाजीराव काळुंगे, राष्ट्रवादीचे नेते राहुल शहा, जिल्हा परिषद सदस्या शैला गोडसे, शेकापचे नेते चंद्रकांत देशमुख आदी उपस्थित होते.

 देशमुख म्हणाले, की सध्या सरकारने ‘एआयबीपी'' योजना बंद केली आहे. नव्याने सुरू केलेल्या पंतप्रधान सिंचन योजनेमधून सहा टक्के दराने कर्जरूपाने निधी उपलब्ध करून दिला आहे. राज्य सरकारने सुधारित खर्चाला मंजुरी दिल्याने सांगोला तालुक्‍यातील चार व मंगळवेढा तालुक्‍यातील पाच हजार क्षेत्राला पाणी मिळणार आहे. शिंदे म्हणाले, "आजही देशातील ६० कोटी लोकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याचा नीती आयोगाचा अहवाल आहे. देशात पाणी उपलब्ध आहे. मात्र, त्याचे योग्य नियोजन होत नाही. दुष्काळी भागातील पाण्यासाठी चळवळ उभा करण्याचे काम नागनाथअण्णांनी केले. मी आज सत्तेत नाही; मात्र भविष्यात संधी मिळाल्यास पाणी चळवळीच्या सोबत आहे. दरम्यान, आमदार भालके, माजी मंत्री ढोबळे आदींची भाषणे झाली. ॲड. भारत पवार यांनी प्रास्ताविक केले. इंद्रजित घुले यांनी सूत्रसंचालन केले.

पाणी परिषदेमध्ये झालेले ठराव

  • म्हैसाळ योजनेचे पाणी मंगळवेढा व सांगोल्यास मिळावे.
  • मंगळवेढा, पंढरपूर, मोहोळ या तालुक्‍यांना उजनीचे पाणी पूर्णपणे मिळावे.
  • भीमा, माण, कोरडा नदीला कालव्याचा दर्जा मिळावा.
  • पाण्याचे समन्यायी वाटप व्हावे.
  • ३५ गाव उपसासिंचन योजनेसाठी पुरेसा निधी द्यावा.
  • १३ दुष्काळी तालुक्‍यांतील प्रकल्पांसाठी निधी देऊन ते पूर्ण करावेत.
  • शेतकऱ्यांना संपूर्णपणे कर्जमाफी देऊन त्यांचे उतारे कोरे करण्यात यावेत.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com