agriculture news in marathi, Moderate rain in Khandesh; miss in Nandurbar | Agrowon

खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणी
टीम अॅग्रोवन
रविवार, 23 सप्टेंबर 2018

आमच्या भागात रिमझिम पाऊस होता. जोरदार पाऊस कुठेही नव्हता. परंतु, रब्बीसाठी पुढे अनुकूल वातावरण तयार होऊ शकते.
- अजीत पाटील, शेतकरी, गाळण (ता. पाचोरा, जि.जळगाव)

आमच्याकडे शुक्रवारी मध्यरात्री काही वेळ जोरदार सरी कोसळल्या. शनिवारी सकाळी मात्र रिमझिम पाऊस सुरू होता. जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
- अॅड. प्रकाश पाटील, शेतकरी, पढावद (जि. धुळे)

जळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व शनिवारी (ता.२२) सकाळी अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. नंदुरबारात मात्र पावसाने हुलकावणी दिली. पाऊस झालेल्या भागातील कोरडवाहू कापूस, ताग या पिकांना लाभ झाला आहे. पुढे रब्बीसाठीदेखील पोषक वातावरण असेल, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

जळगावात शुक्रवारी रात्री काही वेळ जोरदार पाऊस झाला. मग मध्येच पाऊस बंद झाला. मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत भिज पाऊस सुरू होता. नदी, नाल्यांना कुठेही पूर आला नाही. नंदुरबार जिल्ह्यात मात्र शुक्रवारी रात्री व शनिवारी सकाळपर्यंत पाऊस नव्हता. फक्त ढगाळ वातावरण कायम होते. धडगाव व अक्कलकुवा येथे काही पाड्यांवर तुरळक पाऊस झाला. शहादा, तळोदा, नवापुरात मात्र पाऊसच आला नाही.

पूर्वहंगामी कापसाचे नुकसान
पूर्वहंगामी कापसात उमललेली बोंडे ओली होऊन त्यांचे नुकसान झाल्याची माहिती जळगाव, चोपडा, यावल भागातून मिळत आहे. या कापसाचा दर्जा घसरेल. तसेच तो वेचणीसाठीदेखील सुकर जाणार नाही. पाऊस सुरूच राहिल्यास कापूस काळवंडून १०० टक्के नुकसान होईल, असे सांगण्यात आले.

कोरडवाहू कापूस, उशिरा पेरलेली ज्वारी, ताग या पिकांना या पावसाचा लाभ होणार आहे. रब्बी हंगामाच्या पेरणीसाठीदेखील वाफसा मिळेल. आणखी पाऊस आला तर रब्बीची पेरणी १०० टक्के साध्य होऊ शकते, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

पावसाची आकडेवारी (मिलिमीटरमध्ये)
जळगाव ११, चोपडा ७, यावल ९, रावेर ७, पाचोरा ६, पारोळा ८, अमळनेर ९, एरंडोल ८, धरणगाव ११, भुसावळ ६, जामनेर ६, चाळीसगाव ७, भडगाव ८. धुळे जिल्हा - धुळे ६, शिरपूर ५, शिंदखेडा ८. शिरपूर, मुक्ताईनगर, बोदवड या भागातील पावसाची आकडेवारी मिळू शकली नाही.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...