agriculture news in Marathi, Mohan bhagwat says, agriculture should be backup of advance technology , Maharashtra | Agrowon

शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जाेड मिळाली पाहिजे ः मोहन भागवत
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

कोल्हापूर  ः शेतकऱ्याचा सन्मान करताना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड शेतीला मिळाली पाहिजे, असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. 

अक्षय कृषी परिवारातर्फे कणेरी मठावर दोन दिवस जैविक शेती कार्यशाळा झाली. त्यात देशभरातून शंभरहून अधिक तज्ज्ञांचा सहभाग होता. कार्यशाळेची सांगता श्री. भागवत यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता.२४) झाली. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री काडसिद्धेश्‍वर स्वामी होते.

कोल्हापूर  ः शेतकऱ्याचा सन्मान करताना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड शेतीला मिळाली पाहिजे, असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. 

अक्षय कृषी परिवारातर्फे कणेरी मठावर दोन दिवस जैविक शेती कार्यशाळा झाली. त्यात देशभरातून शंभरहून अधिक तज्ज्ञांचा सहभाग होता. कार्यशाळेची सांगता श्री. भागवत यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता.२४) झाली. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री काडसिद्धेश्‍वर स्वामी होते.

श्री. भागवत यांनी एकूणच माणसाचा विकास, शेतीचे महत्त्व आणि भविष्यातील शेतीविषयक धोरण अशा विविध अंगांनी संवाद साधला. ते म्हणाले की, सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे. मात्र, त्यासाठी सामान्य शेतकऱ्याला आवश्‍यक ती सर्वतोपरी मदत केली पाहिजे. एकूणच प्रत्येक माणसाला संतुलित जीवन जगण्यासाठी तो काय खातो म्हणजेच त्याचे अन्न हाच घटक येत्या काळात महत्त्वाचा ठरणार आहे.

श्री काडसिद्धेश्‍वर स्वामी म्हणाले, की सामान्य शेतकऱ्याला सेंद्रिय व गो-पालनाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देऊन तयार केले तर समाजातील प्रत्येक घटक रोगमुक्त होऊन सुखी जीवन जगेल. शेतीविषयक सरकारचे धोरणही येत्या काळात महत्त्वाचे ठरणार आहे. सद्यःस्थिती पाहता जिल्ह्यात एक किंवा दोन कृषी महाविद्यालये आहेत. येत्या काळात खास सेंद्रिय शेतीविषयक प्रशिक्षण देणारी केंद्रे तयार व्हायला हवीत. सेंद्रिय शेती करणाऱ्यांचा गौरव, देशी गायींच्या विविध स्पर्धा, प्रोत्साहनपर उपक्रम राबवायला हवेत. त्याशिवाय त्यातील विविध यशोगाथाही लोकांसमोर मांडायला हव्यात. या वेळी मठाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

इतर अॅग्रो विशेष
नाशिकच्या धरणांत अवघा ४५ टक्के जलसाठानाशिक : यंदा कमी झालेल्या पावसामुळे धरणातील...
शेतीसह शिक्षणाबाबतही जागरूक सावखेडाखुर्दसावखेडा खुर्द (ता. जि. जळगाव) या बागायती...
वाहतूक शुल्कासाठी प्रमाणपत्राची अट नको...पुणे : निर्यातीचा कोटा पूर्ण करणाऱ्या साखर...
राष्ट्रीय जल पुरस्कारांत महाराष्ट्र...मुंबई : राज्यातील जलयुक्त शिवार अभियानमध्ये...
बांबू उद्योगात भारताला स्वयंपूर्ण...मुंबई: कागद, कागदाचा लगदा, वस्त्र या विविध...
लाँग मार्च पोलिसांनी रोखला; आज कूच...नाशिक: मागील वर्षी मार्च महिन्यात अखिल भारतीय...
चटका वाढल्याने उन्हाळ्याची चाहूलपुणे : राज्यातील थंडी कमी होऊन उन्हाचा चटका...
निविष्ठांबाबत शासन कठोर: चंद्रकांत...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना खते, बियाणे,...
हमीभावाने कापूस खरेदीत केंद्राचा हात...जळगाव ः कापूस बाजारात हवी तशी तेजी नसल्याचे...
मराठवाड्यातील भूजल रसातळालाऔरंगाबाद : मराठवाड्यातील भूजलाची पातळी झपाट्याने...
आर्थिक स्थैर्याचे अनुकरणीय मॉडेलराज्यातील शेतीमधील समस्यांची यादी केली तर ती खूप...
पॉलिहाउस शेडनेट नायकांची करुण कथाउच्च तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत भरघोस नफा...
पाणी व्यवस्थापनासाठी सूक्ष्मजीवांचा...पाणी व्यवस्थापन म्हटले, की आपल्या डोळ्यासमोर ठिबक...
शिवरायांच्या आदर्शावर राज्य कारभार सुरू...पुणे : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...
वनक्षेत्राने वेढलेल्या भागामध्ये...कृषी क्षेत्रानजीक वनक्षेत्र असलेल्या परिसरामध्ये...
चारा छावण्या लांबणीवरमुंबई: राज्यात दुष्काळ तीव्र होत चालला असला...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ होत...
खरीप पीकविमा परतावाप्रश्नी उच्च...परभणी: परभणी जिल्ह्यात २०१७ च्या खरिपातील...
शेतकरी आठवडे बाजारातून विस्तारताहेत...संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी...
मार्केटच्या अभ्यासातून गुलाब शेतीत...निमगाव (ता. राहाता) येथील हर्षल प्रभात पाटील या...