agriculture news in marathi, Money saved for sons education was stolen by robber from farmer | Agrowon

मुलाच्या शिक्षणसाठी जमवलेले पैसे चोरले
सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 जानेवारी 2018

आर्वी, जि. वर्धा : शेतकऱ्याने सोने गहाण ठेवून मुलाच्या शिक्षणासाठी काढलेले पैसे चोरट्याने हिसका मारुन पळविल्याची घटना साइनगर येथे सायंकाळी नुकतीच (ता. ४) घडल्याने एकच खळबळ उडाली. प्रफुल्ल वानखेडे (रा. आर्वी) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

आर्वी, जि. वर्धा : शेतकऱ्याने सोने गहाण ठेवून मुलाच्या शिक्षणासाठी काढलेले पैसे चोरट्याने हिसका मारुन पळविल्याची घटना साइनगर येथे सायंकाळी नुकतीच (ता. ४) घडल्याने एकच खळबळ उडाली. प्रफुल्ल वानखेडे (रा. आर्वी) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

शुक्रवारी दुपारी या त्यांनी सोने गहाण ठेवून नादुरा बँकेतून १ लाख २५ हजाराची उचल केली. ही रक्कम त्यांना त्यांचे शिक्षक मित्र मनोहर सावरकर (रा. साईनगर) यांना द्यायची होती. ते या शिक्षकाच्या घरी गेले असताना ते घरी नसल्याने वानखेडे यांनी भ्रमणध्वनीवरुन बोलत असताना पाळतीवर असलेल्या एका युवकाने त्यांच्या दुचाकीवर समोर असलेल्या पैशाच्या पिशवीला हिसका मारुन पोबारा केला. त्याने काळी पँट आणि गुलाबी शर्ट घातला होता. पुढे हा चोर नाल्यातून पळून गेला. 

प्रफुल्ल  वानखेडे आणि मनोहर सावरकर या दोघांची मुले कोटा (राजस्थान) येथे शिक्षण घेत आहेत. सावरकर हे शनिवार (ता. ५) ला कोटा येथे जात असल्याने त्यांच्याजवळ मुलांसाठी वानखेडे यांना पैसे द्यायचे असल्याने ही रक्कम सोने ठेवून घेण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार अशोक चौधरी यांनी पथकासह तपास सुरु केला मात्र तपास लागला नाही.

इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर  : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...
सांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली  ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...
औरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद  : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...
नगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर  ः कृषी विभागाच्या विविध योजना...
धुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव  ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...
सातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा  : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...
साताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा  : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...
साखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...
जालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...
तंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...
ग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला  : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...
जमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी  ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...
नाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक  : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...
मोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...
संत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...
पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...
पुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...
साताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...
साखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर  : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...