टरबूज उत्पादन घेताना बाजारपेठेचे निरीक्षण करावे

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

वाशीम : टरबूज हे पीक शेतकऱ्यांना कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणारे अाहे. मात्र त्याची विक्री करताना वेळोवेळी बाजारपेठेचे निरीक्षण केले पाहिजे, असे मत कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. अार. एल. काळे यांनी व्यक्त केले.

करडा कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने करडा येथे टरबूज लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण घेण्यात अाले. या वेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. मार्गदर्शक म्हणून उद्यानविद्या विषय विशेषज्ञ निवृत्ती पाटील, संदीप पाटील उपस्थित होते.निवृत्ती पाटील यांनी टरबूज लागवडीपासून ते काढणीपर्यंत विविध तांत्रिक विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यामध्ये जमिनीची निवड, विविध सुधारित टरबुजाचे वाण, ठिबक संचाचा वापर, विद्राव्य खतांचा वापर, लागवड पद्धतीत प्रो स्ट्रे पद्धतीने टरबुजाची रोपे तयार करून पुनर्लागवड करणे, मल्चिंग पेपरचा वापर करून तण नियंत्रण व पाण्याची बचत करणे, रोग कीड नियंत्रणासाठी चिकट सापळे कामगंध सापळ्यांचा वापर, रासायनिक व सेंद्रिय खतांचा समतोल वापर करून जमिनीचे आरोग्य सुधारणे व विक्री पद्धतीत स्वतः सहभाग घेऊन शेतकरी जास्त नफा मिळवू शकतो, असे सांगितले.

संदीप पाटील यांनी टरबुजाचे वाण, बुरशीनाशके, संजीवके, कीटकनाशके यांचा कार्यक्षम वापर, रोग-किडीचे नियंत्रण व उपाय, तसेच येणाऱ्या हंगामातील विविध रोग व किडीविषयी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकिशोर थोरात यांनी केले, तर आभार भुजंगराव देशमुख यांनी मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com