पावसामुळे पेरणी लांबल्याने एकपीक पर्याय धोक्याचा

पावसामुळे पेरणी लांबल्याने एकपीक पर्याय धोक्याचा
पावसामुळे पेरणी लांबल्याने एकपीक पर्याय धोक्याचा

औरंगाबाद ः पावसाच्या अनियमिततेने शेतकऱ्यांचा एकपीक पर्यायाचा दोरखंड कापल्यात जमा आहे. त्यामुळे यंदा पीकनिहाय सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत अपेक्षित पेरणीचे क्षेत्र गाठण्याचे गणित अवघड झाले आहे.

यासंदर्भात अधिक माहितीनुसार पावसामुळे पेरणी लांबल्यास ७ जुलैपर्यंत खरिपातील कोणत्याही पिकाची पेरणी करणे व त्यामधून अपेक्षित उत्पादन मिळविणे शक्‍य आहे. परंतू ७ जुलैनंतरही पेरणी लांबल्यास काही पिकांना ब्रेक लावण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय उरत नाही. त्यामुळे पीकनिहाय प्रस्तावित केलेल्या पेरणी क्षेत्राचा टप्पा गाठणे शक्‍य होत नाही. तीच स्थिती यंदा आजघडीला उद्‌भवल्याचे चित्र आहे. मराठवाड्यात ऊस वगळता प्रस्तावित ४६ लाख ७२ हजार ५५४ हेक्‍टरच्या तुलनेत ९ जुलैअखेपर्यंत ३० लाख ९७ हजार ७२२ हेक्‍टवर अर्थात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ६६.३० टक्‍के क्षेत्रावर खरिपाची पेरणी उरकली आहे. अजूनही ३४ टक्‍के पेरणी राहिल्याचे कृषीचा अहवाल सांगतो.

आंतरपीक पेरणी कशी करावी ७ जुलैनंतर मात्र मूग, उडिदाची पेरणी टाळावी लागते. १५ जुलैनंतर पेरणीची वेळ आल्यास कापूस अधिक सोयाबीन (१:१), सोयाबीन अधिक तूर (४:२), तूर अधिक तीळ (१:२), बाजरी अधिक तूर (३:३), ज्वारी अधिक तूर (३:३) असे आंतरपीक कंसात दिलेल्या प्रमाणात पेरुन जोखीम कमी करण्याचा सल्ला राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प औरंगाबादचे सहयोगी संचालक संशोधन डॉ. सूर्यकांत पवार यांनी दिला. शिवाय कमी कालावधीची वाण घेण्याचाही सल्ला देत २० जुलैनंतर कापूस, सोयाबीनही नकोच, असेही डॉ. पवार म्हणाले.

पीकनिहाय सर्वसाधारण क्षेत्र व प्रत्यक्ष पेरणी व टक्‍का (हेक्‍टरमध्ये) (९ जुलैअखेर)
पीक सर्वसाधारण क्षेत्र प्रत्यक्ष पेरणी टक्‍का
भात २६९३२ २३५३  ८.७४
खरीप ज्वारी ४१७५१५ ७४२३६ १७.७८
मका २५३६६८ १६८२९६ ६६.३४
इतर तृणधान्य १७६०१ २०५८ ११.६९
तूर ५२०९४७ २८६२१६ ५४.९४  
मूग १६२००९   ११०७५६ ६८.३६
उडीद १६७३५१ ८२७३२ ४९.४४
कपाशी १७१७४५१ १०५६५२७

६१.५२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com